शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

बँकेमुळे शाळा, पतसंस्था, मंदिरासह ट्रस्टही अडचणीत; तब्बल ४७ कोटींच्या ठेवी अडकल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2024 18:04 IST

Yavatmal : २१२ कर्मचाऱ्यांच्या बँकेतील ठेवी पाठोपाठ बँकेतील हक्काची नोकरीदेखील गेली

रूपेश उत्तरवारलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : महिला बँकेमध्ये सर्वसामान्य नागरिकांनीच नव्हे तर मंदिर ट्रस्ट, शाळा, संस्था आणि पतसंस्थांनी पैसे गुंतविले होते. बँक अवसायनात निघाल्याने पतसंस्था आणि ट्रस्टच्या ४७ कोटींच्या ठेवी अडचणीत आल्या आहेत. या पतसंस्थांमधील ठेवीदारही यातून अडचणीत आले आहेत.

जिल्ह्यातील १२ पतसंस्थांचे ४२ कोटी रुपये महिला बँकेत अडकले आहेत. महिला बँकेने पाच वर्षांत दामदुप्पट योजना आणली होती. त्यावेळी ही महिला बँक अ वर्ग श्रेणीत होती. याशिवाय यापूर्वी पतसंस्थांनी १० ते १५ वर्षांपासून या ठिकाणी व्यवहार केला होता. यामुळे पतसंस्थांनी बिनधास्तपणे या ठिकाणी गुंतवणूक केली. अल्पावधीत पैसे दुप्पट होणार असल्याने सर्वांना ते सुरक्षित वाटले होते. यातूनच मोठ्या प्रमाणात पतसंस्थांच्या ठेवी बँकेत गेल्या. मात्र, बँक अवसायनात निघाल्यानंतर पतसंस्थांची कोंडी झाली. ठेवीदारांची संख्या मोठी असल्याने काही पतसंस्थांना फारशी झळ पोहोचली नाही. मात्र, बहुतांश पतसंस्थांचे व्यवहार प्रभावित झाले. पतसंस्थेला सावरण्यासह नफ्यावर त्याचा परिणाम झाला. पतसंस्थेच्या सभासदांना लाभांश मिळाला नाही. या प्रकरणानंतर अस्थितरतेचे वातावरण तयार झाले. यामुळे अनेक ठिकाणच्या ठेवीदेखील गेल्या. स्वयंमसेवी ट्रस्ट आणि शाळा महाविद्यालयाच्या ठेवींवरही त्याचा परिणाम झाला.

'अ' दर्जामुळे झाली गफलतबाबाजी दाते महिला बँक प्रकरणात पतसंस्थांनी पैसे अडकल्याचा विषय बाहेर आणला नाही. कारण यामुळे पतसंस्थांमधील ठेवी जाण्याचा धोका होता. 'अ' वर्ग दर्जा बँकेला मिळाल्याने अनेक पतसंस्थांनी कुठल्याही कायदेशीर बाबीचा विचार केला नाही. याच ठिकाणी पतसंस्थांची गफलत झाली. ती गफलतच सर्व पतसंस्थांच्या अंगलट आली.

कुटुंबाचा गाडा हाकायचा कसा?महिला बँकेच्या २० शाखा असून यातील १९ शाखा गैरकारभारामुळे बंद करण्यात आल्याने या बँकेमध्ये काम करणारे २१२ कर्मचारी अडचणीत आले आहेत. बहुतांश कर्मचाऱ्यांनी याच बँकेत ठेवी ठेवल्या आहेत. बँक अवसायनात गेली. पाठोपाठ बँकेतील हक्काची नोकरीदेखील गेली, यामुळे जवळ जमापुंजीच उरली नाहीं. अशा स्थितीत कुटुंबाचा गाडा हाकायचा असा प्रश्न या कर्मचाऱ्यांपुढे उभा आहे. 

टॅग्स :bankबँकfraudधोकेबाजीYavatmalयवतमाळ