शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
2
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
3
“शेतकऱ्यांना मोफत नको म्हणणाऱ्या अजित पवारांना फुकटात जमिनी लाटण्याचा भस्म्या”: काँग्रेस
4
एकनाथ शिंदेंचा अजितदादांना धक्का! २५ सरपंच, पदाधिकाऱ्यांसह बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश
5
राजस्थानमध्ये पकडला गेला 'ओसामा'; इंटरनेट कॉलिंगवर ४ वर्षांपासून होता अफगाणिस्तानातील दहशतवाद्यांच्या संपर्कात
6
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
7
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
8
अग्रलेख: लोकशाहीवरच प्रश्नचिन्ह! एच-फाईल्स अन् निवडणूक प्रक्रियेवरील विश्वासालाच तडा
9
गंगर कन्स्ट्रक्शनवर १०० कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल; एकच फ्लॅट दोघांना विकला!
10
हास्यास्पद खर्चमर्यादा अन् पैशांची उधळपट्टी... आगामी निवडणुकांमध्ये रंगणार वर्चस्वाची लढाई
11
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
12
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
13
तोपर्यंत 'त्या' नागरिकाला मतदानाचा अधिकार नाही; युवतीच्या अर्जावर ६ आठवड्यांत निर्णय घ्या!
14
नेरळ-माथेरान मिनी ट्रेनचे इंजिन पुन्हा धडधडले; मोठ्यांसह बच्चेकंपनी खूश; वेळापत्रकही जाहीर
15
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
16
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
17
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
18
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
19
येत्या ११ नोव्हेंबरला प्रभागात कोणाची लागणार लॉटरी? मुंबईकरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे लक्ष
20
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

शालेय पोषण आहार आता स्वयंपाक्यांच्या भरवशावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2018 11:03 IST

शाळेतल्या पोरांसाठी खिचडी शिजवायची अन् महिन्याची हजार रुपयांची मजुरी मिळवायची, हे काम करणाऱ्यांना आता शालेय पोषण आहार योजनेची संपूर्ण जबाबदारीच पेलावी लागणार आहे.

ठळक मुद्देसंचालनालयाने झटकले हात उरलेला तांदूळ वापरा अन् किराणाही तुम्हीच आणा

अविनाश साबापुरे।लोकमत न्यूज नेटवर्क।यवतमाळ : शाळेतल्या पोरांसाठी खिचडी शिजवायची अन् महिन्याची हजार रुपयांची मजुरी मिळवायची, हे काम करणाऱ्यांना आता शालेय पोषण आहार योजनेची संपूर्ण जबाबदारीच पेलावी लागणार आहे. ‘अन्न शिजविणाऱ्या’ यंत्रणेनेच धान्यादी माल आणून पोषण आहार शिजवावा, असे फर्मान राज्याच्या प्राथमिक शिक्षण संचालकांनी सोडले आहे. दर महिन्याची मजुरीच वेळेवर मिळण्याचे वांदे असलेले हे ‘स्वयंपाकी’ स्वत:च किराणा आणून पोरांना आहार देऊ शकतील का, हा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.भारतीय अन्न महामंडळाकडून शाळांपर्यंत तांदळाचा पुरवठा करणाऱ्या वाहतूकदाराचा कंत्राट संपलेला आहे. त्यामुळे डिसेंबर महिन्यासाठी शाळांपर्यंत तांदूळ पुरविण्याची समस्या निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे, नव्या कंत्राटासाठी शिक्षण संचालनालयाने आता कुठे ई-निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. ती पूर्ण होण्यास वेळ लागणार आहे.त्यामुळे १ डिसेंबर ते ३१ डिसेंबर या काळात पोषण आहाराची जबाबदारी शाळेतील स्वयंपाक्यावर लोटण्याचा प्रकार करण्यात आला आहे. याबाबत संचालकांनी परिपत्रक जारी केले आहे. जे स्वयंपाकी स्वत: धान्यादी माल खरेदी करून आणण्यास तयार असतील, त्यांचेच काम सुरू ठेवावे अन्यथा नव्या स्वयंपाक्यांना काम द्यावे, असे संकेत संचालकांनी दिले आहेत. नोव्हेंबर महिन्यातील उरलेला तांदूळ डिसेंबरमध्ये वापरण्याचे निर्देश आहेत. ज्या शाळांमध्ये असा तांदूळ उपलब्ध नसेल, त्यांनी इतर शाळेतून तांदूळ मिळविण्याचे परिपत्रकात म्हटले आहे. मात्र, अशा ऐनवेळी किती शाळांकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात तांदूळ उरलेला असेल, हा प्रश्न आहे. शिवाय, तेल, चटणी, हळद व इतर धान्यादी माल स्वत: स्वयंपाकी मंडळीने विकत आणायचा आहे. हे तुघलकी फर्मान शिक्षणाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचले आहे.केंद्राच्या समितीच्या धसक्याने लोटालोटीशालेय पोषण आहार योजनेची झाडाझडती घेण्यासाठी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाची सहा सदस्यीय समिती राज्यात येत आहे. ३ ते १० डिसेंबर या काळात समिती जिल्हानिहाय योजनेची अमलबजावणी तपासणार आहे. उरलेला तांदूळ वापरून, स्वत:च किराणा आणून स्वयंपाक्यांनीच शिजविलेला आहार या समितीला पाहता येणार आहे. त्यामुळे योजनेच्या अमलबजावणीत काही त्रृटी आढळलीच तर त्याचे खापर रोजमजुरी करणाऱ्या स्वयंपाक्यावर फोडणे संचालनालयाला, राज्याच्या शिक्षण सचिवालयाला सहज शक्य होणार आहे.

टॅग्स :Schoolशाळा