शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

शाळेतील मुलांचे दप्तर पुढच्या वर्षी होणार आणखी हलके

By अविनाश साबापुरे | Updated: July 19, 2023 06:25 IST

केंद्र सरकारने २०२० मध्ये घोषित केलेल्या नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाची अंमलबजावणी आता हळूहळू सुरू होत आहे

अविनाश साबापुरे

यवतमाळ : विद्यार्थ्यांचे दप्तर हलके करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने एकात्मिक पाठ्यपुस्तकांचा प्रयोग सुरू केला आहे. मात्र, पुढच्या वर्षी दप्तराचे ओझे आणखी कमी होणार असून, त्यासाठी राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्यात खास तरतूद करण्यात आली आहे. प्रत्येक धड्यानंतर शिक्षकांसाठी अध्यापनाच्या दृष्टीने दिल्या जाणाऱ्या सूचना पाठ्यपुस्तकातून वगळल्या जाणार आहेत. त्यामुळे पुस्तकाचा आकार जवळपास अर्धाच होणार आहे. 

केंद्र सरकारने २०२० मध्ये घोषित केलेल्या नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाची अंमलबजावणी आता हळूहळू सुरू होत आहे. धोरणानुसार देशभरात सारखीच शिक्षणपद्धती राबविण्यासाठी राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा तयार करण्यात आला आहे. ६२८ पानांच्या या आराखड्यात विद्यार्थी-शिक्षकांसाठी विशेष तरतुदी आहेत. 

‘अध्ययन, अध्यापन, अभ्यासक्रमाबाबतचा नवा दृष्टिकोन’ असे स्वतंत्र चॅप्टर देण्यात आले आहे. त्यात म्हटले आहे की, प्रत्येक वर्गाच्या प्रत्येक पुस्तकात धडा संपल्यानंतर एका पानावर शिक्षकांसाठी सूचना तसेच नोंदी दिलेल्या असतात. परंतु, या नोंदींमुळे पुस्तकाचा आकार अनावश्यकरीत्या वाढतो. या नोंदी वगळण्यात येऊन पुस्तकाचा आकार जवळपास अर्धा होण्याची शक्यता आहे.  

प्रत्येक पुस्तकाच्या दोन आवृत्त्या पुढच्या वर्षीपासून पाठ्यपुस्तके दोन स्वरूपांत छापली जातील. एक आवृत्ती विद्यार्थ्यांसाठी (टेक्स्ट बुक), दुसरी शिक्षकांसाठी (टेक्स्ट बुक प्लस) असेल. शिक्षक आवृत्तीमध्ये प्रत्येक धड्यानंतर सूचना, नोंदी, क्यूआर कोड असतील.   

डिजिटल वाचनावर भरसोशल मीडियातील मजकुराचे सुरक्षित आणि उपयुक्त वाचन कसे करावे, यासाठी अभ्यासक्रम आराखड्यात ‘बायलिट्रसी’ ही संकल्पना मांडण्यात आली आहे.  त्यासोबतच डिजिटल रायटिंग शिकविण्यासाठी विद्यार्थ्यांना ई-मेल, ब्लाॅग तसेच पोस्ट लिहिण्याबाबतही मार्गदर्शन केले जाणार आहे. त्यासाठी शिक्षकांनी चांगले ब्लाॅग, ई-मेल, पोस्ट विद्यार्थ्यांना दाखवाव्यात, अशीही सूचना आराखड्यात आहे.

टॅग्स :SchoolशाळाEducationशिक्षण