शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

अभियांत्रिकी काॅलेजची शिष्यवृत्ती अडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 05:00 IST

कोरोनाचा संकटकाळ असूनही शासकीय अभियांत्रिकीसह अन्य शासकीय महाविद्यालयातील प्राध्यापक मंडळींना नियमित वेतन मिळत आहे. मात्र त्याच तोडीचे किंबहुना त्या पेक्षाही अधिक काम करणाऱ्या खासगी महाविद्यालयातील प्राध्यापकांना अनियमित वेतनाचा सामना करावा लागत आहे. कारण तब्बल १६ महिन्यांपासून खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या शिष्यवृत्ती रकमा शासनाने रिलीज न केल्याने या महाविद्यालयांचे व्यवस्थापन आर्थिक संकटात आहे.

ठळक मुद्देदीड वर्षापासून प्रश्न : शासन दखल घेणार का?

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : अत्यंत अडचणीतून खासगी अभियांत्रिकी महाविद्यालये वाटचाल करीत आहेत. मात्र अशाही परिस्थिती शासनाने विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती गेल्या दीड वर्षापासून  अडवून ठेवल्या आहेत. त्यामुळे महाविद्यालयांपुढे अडचणींचा डोंगर वाढला आहे. कोरोनाचा संकटकाळ असूनही शासकीय अभियांत्रिकीसह अन्य शासकीय महाविद्यालयातील प्राध्यापक मंडळींना नियमित वेतन मिळत आहे. मात्र त्याच तोडीचे किंबहुना त्या पेक्षाही अधिक काम करणाऱ्या खासगी महाविद्यालयातील प्राध्यापकांना अनियमित वेतनाचा सामना करावा लागत आहे. कारण तब्बल १६ महिन्यांपासून खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या शिष्यवृत्ती रकमा शासनाने रिलीज न केल्याने या महाविद्यालयांचे व्यवस्थापन आर्थिक संकटात आहे. खासगी महाविद्यालयांच्या अडचणींकडे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री लक्ष देतील का, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. जिल्ह्यात तीन खासगी अभियांत्रिकी महाविद्यालये आहेत. यवतमाळसारख्या मागास जिल्ह्यात या महाविद्यालयांनी सर्वसामान्य कुटुंबातील होतकरू विद्यार्थ्यांसाठी स्वजिल्ह्यातच अभियांत्रिकीचे शिक्षण उपलब्ध करून दिले आहे. यवतमाळ येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालय, जगदंबा अभियांत्रिकी महाविद्यालय आणि पुसद येथील बाबासाहेब नाईक अभियांत्रिकी महाविद्यालयाने विद्यार्थ्यांना आधार दिला आहे. गेले वर्षभर कोरोनामुळे या खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयांपुढे आर्थिक अडचणी वाढल्या. शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांना प्रवेश दिल्यानंतर त्यांच्या शिष्यवृत्ती रकमेतून या महाविद्यालयांची प्रवेश शुल्काची भरपाई होते. परंतु, गेल्या वर्षभरापासून विद्यार्थ्यांच्या ईबीसी शिष्यवृत्तीच्या रकमा उच्च व तंत्र शिक्षण विभागाने रिलिज केलेल्या नाहीत. आता दुसरे सत्र सुरू झाले तरी या रकमा मोकळ्या न झाल्याने महाविद्यालये अडचणीत सापडली आहेत. हा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्रातील खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयांचा असून उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दखल घ्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

शासकीय अभियांत्रिकीत  ६८ पैकी ६७ पदे रिक्त यवतमाळ येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात ६८ पदे मंजूर असून त्यातील केवळ एक असिस्टंट प्रोफेसर हे पद भरले गेले. तर ६७ पदे अद्यापही भरलेली नाहीत. प्राध्यापक आणि प्राचार्यही नसताना या महाविद्यालयातील ९९३ विद्यार्थ्यांचे अभियांत्रिकी शिक्षणाचे भवितव्य मात्र अधांतरी झाले आहे. सिव्हील, मेकॅनिकल, इलेक्ट्रीकल, इलेक्ट्राॅनिक्स, काॅम्प्युटर या विद्याशाखांना प्राध्यापक नाही. 

 

टॅग्स :Scholarshipशिष्यवृत्तीcollegeमहाविद्यालय