शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

ती माझी आहे म्हणत, युवकाला आत्महत्येस केले प्रवृत्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2022 22:48 IST

तू ज्या मुलीसोबत विवाह केला ती माझी प्रेयसी आहे. तू आत्महत्या कर, नंतर मी तिच्याशी विवाह करतो, असे केले नाही तर तुला जिवानिशी ठार करतो, अशा  स्वरूपाच्या धमक्या आरोपी सुनील राठोड (२२, रा. आकोली, ता. उमरखेड) याच्याकडून देण्यात येत होत्या. सुनील अनंताला मोबाईलवर फोन करून, एसएमएस  करून सातत्याने धमकावत होता. त्यामुळे कंटाळलेल्या अनंताने १५ नोव्हेंबरच्या रात्री गळफास घेऊन आत्महत्या केली.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : ती माझी आहे, तू तिच्यासोबत लग्न केलेस, आता तू आत्महत्या कर नाही तर तुला ठार करतो, अशा धमक्या देऊन नवविवाहित युवकाला आत्महत्या करण्यास भाग पाडले. ही गंभीर घटना उमरखेड तालुक्यात ही घटना घडली. या प्रकरणी २२ वर्षीय युवकाविरुद्ध उमरखेड पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला.अनंता सुभाष खापरे (२४) असे या मृत युवकाचे नाव आहे. त्याचा काही महिन्यांपूर्वी विवाह झाला होता. मात्र, नंतर त्याला एका मोबाईलवरून वारंवार धमक्या मिळू लागल्या. तू ज्या मुलीसोबत विवाह केला ती माझी प्रेयसी आहे. तू आत्महत्या कर, नंतर मी तिच्याशी विवाह करतो, असे केले नाही तर तुला जिवानिशी ठार करतो, अशा  स्वरूपाच्या धमक्या आरोपी सुनील राठोड (२२, रा. आकोली, ता. उमरखेड) याच्याकडून देण्यात येत होत्या. सुनील अनंताला मोबाईलवर फोन करून, एसएमएस  करून सातत्याने धमकावत होता. त्यामुळे कंटाळलेल्या अनंताने १५ नोव्हेंबरच्या रात्री गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर सुभाष खापरे यांनी पोलिसांत तक्रार देऊन मुलाला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या युवकाविरुद्ध कारवाईची मागणी केली. पोलिसांनी कलम ३०६ भादंविनुसार गुन्हा दाखल केला असून घटनेचा तपास सुरू आहे. दरम्यान, तरुणाच्या या आत्महत्येच्या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून या घटनेमुळे एकाचा जीव गेला, तर दोघांचे आयुष्यही  उद्‌ध्वस्त झाले आहे. 

प्रेमासाठी वाट्टेल ते..- प्रेमासाठी कोण काय करेल, याचा नेम नाही. एकतर्फी प्रेमातून विवाहितेचा संसार मोडण्याचे काम युवकाने केले. आता तो स्वत: गंभीर गुन्ह्यात आरोपी झाला आहे. या विचित्र घटनेने उमरखेड तालुक्यात खळबळ उडाली आहे. नेमके काय साध्य केले, असा प्रश्न या घटनेनंतर उपस्थित केला जात आहे.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी