शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

सांगा मोदी साहेब, आम्ही जगायचे कसे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2019 22:24 IST

शासकीय धोरणामुळे भुकेचा भीषण प्रश्न निर्माण झाला. मोदी साहेब, सांगा आता आम्ही जगायचे कसे, असा जीवन मरणाचा प्रश्न घेऊन जिल्ह्यातील पारधी समाज बांधवांनी मारेगाव तालुक्यातील गोंड बुरांडा ते पांढरकवडा अशी पदयात्रा काढली.

ठळक मुद्देपारधी समाज बांधवांचा सवाल : गोंडबुरांडा ते पांढरकवडा पदयात्रा

नरेश मानकर।लोकमत न्यूज नेटवर्कपांढरकवडा (यवतमाळ) : शासकीय धोरणामुळे भुकेचा भीषण प्रश्न निर्माण झाला. मोदी साहेब, सांगा आता आम्ही जगायचे कसे, असा जीवन मरणाचा प्रश्न घेऊन जिल्ह्यातील पारधी समाज बांधवांनी मारेगाव तालुक्यातील गोंड बुरांडा ते पांढरकवडा अशी पदयात्रा काढली. पंतप्रधानांना भेटून आपल्या व्यथा त्यांच्यापुढे मांडण्याचा प्रयत्न मात्र सफल झाला नाही.शनिवारी पांढरकवडा येथे महिला बचतगटांचा महामेळावा पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी या मेळाव्यासाठी आले होते. या पार्श्वभूमीवर पारधी समाज संघटनेचे राज्याध्यक्ष मतिन भोसले यांच्या नेतृत्वात मारेगाव तालुक्यातील गोंड बुरांडा येथून शुक्रवारी पांढरकवडापर्यंत पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेत जिल्ह्यातील चारशेवर समाजबांधव सहभागी झाले होते. शासनाने शिकारीवर बंदी आणल्याने पारधी समाज बांधवांच्या जगण्याचा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे शिकारीला परवानगी देण्यात यावी, शिकारी बंद झाल्याने शासकीय जमिनीवर अतिक्रमण करून पोटाची भूक भागविण्याचा प्रयत्न केला. मात्र शासनाने त्या जमिनीही हिसकावून घेतल्या. आता आम्ही जगायचे कसे, असा या पारधी बांधवांचा सवाल आहे. शासनाने शिकारीची परवानगी द्यावी किंवा अतिक्रमणाची हिसकावून घेतलेली शेती परत करावी, अशी या समाजबांधवांची मागणी आहे.शनिवारी मेळावा सुरू होण्यापूर्वी मजल दरमजल करीत पदयात्रेद्वारे पारधी समाज बांधव कार्यक्रमस्थळी पोहोचले. मात्र पोलिसांनी सभास्थळी जाण्यास त्यांना मज्जाव केला. सभा होईस्तोवर हे समाजबांधव ताटकळत कार्यक्रमस्थळाच्या काही अंतरावर दूर उभे होते. आम्हाला मोदी साहेबांना भेटू द्या, अशी आर्जव ते पोलिसांना करीत होते. मात्र, शेवटपर्यंत त्यांना अडवून धरण्यात आले. मेळावा संपल्यानंतर मतिन भोसले व पारधी समाजबांधवांनी पालकमंत्री मदन येरावार यांची भेट घेऊन त्यांना आपली व्यथा सांगितली. ना. येरावार यांनी दोन दिवसानंतर यवतमाळला भेटून चर्चा करू, असे आश्वासन दिले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी