शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

डिजिटल स्वाक्षरीची मुदत संपल्याने सातबारा मिळेना

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2024 18:34 IST

शासनाचा महसूल बुडाला : जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार झाले ठप्प

लोकमत न्यूज नेटवर्क वणी : वणी उपविभागातील तलाठी साझांमध्ये डिजिटल स्वाक्षरीची मुदत संपल्याने शेतकऱ्यांना डिजिटल सातबाऱ्यासह इतरही दस्तऐवज मिळणे कठीण झाले आहे. याअभावी जमीन खरेदी-विक्रीचे कोट्यवधी रुपयांचे कामकाज थांबले आहे. उपविभागातील अनेकांची डिजिटल स्वाक्षरीची मुदत संपलेली आहे. काहींची मुदत येत्या दोन ते तीन दिवसांत संपण्याच्या मार्गावर असल्याने या समस्येत आणखीनच भर पडणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. दोन ते तीन आठवड्यांपासून या समस्येचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे. मात्र, याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे.

कोणत्याही प्रकारचे कर्ज काढण्यासाठी शेतकरी किंवा जमीनधारकांना सातबारा सादर करणे बंधनकारक आहे. सातबाऱ्याला ऑनलाइनची जोड देण्यात आली असून, तलाठी, आपले सरकार सेवा केंद्र किंवा सेतू केंद्रातून डिजिटल संगणकीकृत सातबारा दिला जातो. मात्र, वणी तालुक्यातील तलाठ्यांच्या डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट (डीएससी) ची कंत्राटाची मुदत संपल्याने डिजिटल सात-बारा मिळणे आता कठीण झाले आहे. शेतजमीन खरेदी-विक्री, बँक कर्ज, कार्यालयीन कामकाज आदी महत्त्वपूर्ण बाबींसाठी अत्यंत मौलिक असलेले सात-बारा, आठ-अ, फेरफार या दस्तऐवजांसाठी शेतकऱ्यांना तलाठी कार्यालय किंवा सेतू केंद्राचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. तलाठी कार्यालयातूनही शेतकऱ्यांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात येत असून, शेतकरी व खरेदीदार यांना सातबारापासून वंचित राहावे लागत आहे. एकीकडे जिल्हाधिकाऱ्यांनी तलाठ्यांना हस्तलिखित सातबारा देण्यास बंदी घातलेली आहे, तर दुसरीकडे तलाठ्यांच्या डीएससीची मुदत संपल्याने सातबारा मिळत नाहीत, अशी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे शेतकऱ्यांपुढे पेच निर्माण झाला आहेत. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे. 

दोन आठवड्यांचा कालावधी लोटलावणी तालुक्यासह संपूर्ण परीसरात खरेदी-विक्रीची कामे मंदावली आहेत. असंख्य गावांमध्ये डिजिटल सात-बारा मिळणे तूर्त बंद झाले. दोन आठवड्यांपेक्षा अधिक कालावधीपासून ही समस्या तलाठी सजांमध्ये आणि त्याअंतर्गत गावांमध्ये भेडसावत आहे. या स्थितीला निवडणुकीचाही हातभार लागला आहे. तालुक्यात जमीन खरेदी-विक्रीची संख्या खूप मोठी आहे. ती ठप्प झाल्याने सरकारला मोठ्या महसुलालाही मुकावे लागणार आहे.

"वणी तालुक्यातील महसूल अधिकाऱ्यांची डीएससीची मुदत संपल्याची मला कल्पना नाही. या प्रकाराची कोणती तक्रार ही नाही. माहिती घेऊन काय अडचणी आहेत. त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार आहे." - निखिल धुळधर, तहसीलदार, वणी.

टॅग्स :YavatmalयवतमाळAgriculture Sectorशेती क्षेत्र