यवतमाळच्या सारिका शाह ठरल्या ‘मिसेस दिवा ऑफ इंडिया’च्या विजेता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2019 01:38 PM2019-07-26T13:38:40+5:302019-07-26T13:39:39+5:30

दिल्ली येथे झालेल्या ‘मिस अँड मिसेस दिवा ऑफ इंडिया इंटरनॅशनल २०१९’ या स्पर्धेत येथील डॉ. सारिका शाह यांनी ‘मिसेस’ कॅटेगरीतून विजेतपदाचा मान पटकावला.

Sarika Shah of Yavatmal becomes the winner of 'Mrs Diva of India' | यवतमाळच्या सारिका शाह ठरल्या ‘मिसेस दिवा ऑफ इंडिया’च्या विजेता

यवतमाळच्या सारिका शाह ठरल्या ‘मिसेस दिवा ऑफ इंडिया’च्या विजेता

Next
ठळक मुद्देदेश-विदेशातील स्पर्धकांवर मात : पाच दिवस विविध फेऱ्यांतून गुणवत्ता केली सिद्ध

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : दिल्ली येथे झालेल्या ‘मिस अँड मिसेस दिवा ऑफ इंडिया इंटरनॅशनल २०१९’ या स्पर्धेत येथील डॉ. सारिका शाह यांनी ‘मिसेस’ कॅटेगरीतून विजेतपदाचा मान पटकावला. देश-विदेशातील स्पर्धकांना मागे टाकत त्यांनी आपली गुणवत्ता सिद्ध केली.
ही स्पर्धा व्हायरस फिल्म अँड एन्टरटेन्मेंटच्या वतीने दिल्लीच्या हॉटेल ओसिन पर्ल रिट्रीटमध्ये पार पडली. सतत पाच दिवस चाललेल्या स्पर्धेत देश-विदेशातील ५० पेक्षा अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला. प्रत्येक दिवशी विविध सत्र आणि उपस्पर्धांमधून स्पर्धकाला स्वत:ला सिद्ध करावे लागले. १४ जुलै रोजी झालेल्या अंतिम फेरीसाठी अभिनेत्री शाहजान पदमसी, प्रसिद्ध आहारतज्ज्ञ डॉ. वरुण कट्याल, डिझायनर अनुज हे पंच होते. अंतिम पाच स्पर्धकांमध्ये प्रश्नोत्तराची फेरी घेण्यात आली. यात सुंदर आणि योग्य उत्तरे देऊन डॉ. सारिका शाह यांनी प्रेक्षकांची मने जिंकून घेत विजेतेपद पटकावले. या स्पर्धेत केवळ बाह्य सौंदर्य न पाहता स्पर्धकाच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध गुण तपासण्यात आले. फिटनेस राउंड, टॅलेंट राउंड, रॅम्प वॉक, इंट्रोडक्शन राउंड, वेस्टर्न राउंड, गाउन राउंड अशा विविध फेºया घेण्यात आल्या.
मनात जिद्द असली आणि मेहनत करण्याची तयारी असली तर माणूस काहीही करू शकतो. या स्पर्धेत मिळालेला क्राउन समाजाच्या चांगल्या कामासाठी वापरणार असल्याचे मत डॉ. सारिका शाह यांनी व्यक्त केले. त्यांनी आपल्या यशाचे श्रेय पती डॉ. महेश शाह व आपल्या कुटुंबीयांना दिले आहे. यापूर्वी त्यांनी ‘मिसेस इंडिया वर्ल्ड’मध्ये फर्स्ट रनरअप्, ‘गृहसहेली मिसेस इंडिया’मध्ये सेकंड रनरअप्चा मान पटकावला. या स्पर्धेत मुंबई येथील ग्रूमिंग अकॅडमीचे संचालक अंजुशा भट्टाचार्य आणि मंजुशा रावत यांनी मार्गदर्शन केले. कोरिओग्राफर म्हणून सन्मान गावडा व संजय कन्नन यांनी काम पाहिले.
५०० मुलींचे सक्षमीकरण
डॉ. शाह पॅथालॉजिस्ट असून विविध सामाजिक कार्यात त्यांचा सहभाग असतो. ऑर्गन कोऑर्डिनेटर म्हणून मोहन फाउंडेशन आशियासोबत त्या काम करतात. अवयवदानाबाबत जनजागृतीचे काम करतात. त्या उत्तम गायिका असून अवयवदानाबाबत नुकतेच त्यांचे एक गाणेही रिलिज झाले आहे. त्यासाठी पारितोषिकही पटकावले. सामाजिक कार्यासाठीही त्यांनी विविध राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार पटकावले आहे. विविध मासिकांच्या मुखपृष्ठासाठी त्यांनी मॉडलिंग केले. विविध ‘फॅशन विक’मध्ये मॉडलिंग आणि रॅम्प वॉक केले आहे. सध्या त्या भारतीय जैन संघटनेतर्फे आयोजित ‘स्मार्ट गर्ल’ कार्यशाळेच्या ट्रेनर म्हणून काम करीत आहेत. कार्यशाळेच्या माध्यमातून आतापर्यंत त्यांनी ५०० पेक्षा अधिक मुलींच्या सक्षमीकरणाचे काम केले आहे.

Web Title: Sarika Shah of Yavatmal becomes the winner of 'Mrs Diva of India'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :fashionफॅशन