शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

दारव्हा येथे संजय राठोड यांचा नागरी सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2020 06:00 IST

कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष उत्तमराव शेळके, जिल्हा परिषदेतील शिवसेनेचे गटनेते श्रीधर मोहोड, नगराध्यक्ष बबनराव इरवे, पंचायत समिती सभापती सुनीता राऊत आदींसह लोकप्रतिनिधी, पदाधिकारी उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली.

लोकमत न्यूज नेटवर्कदारव्हा : राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांचा महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्ष, स्थानिक स्वराज्य संस्था, विविध सामाजिक संघटना व नागरिकांतर्फे शनिवारी येथील एका मंगल कार्यालयात नागरी सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष उत्तमराव शेळके, जिल्हा परिषदेतील शिवसेनेचे गटनेते श्रीधर मोहोड, नगराध्यक्ष बबनराव इरवे, पंचायत समिती सभापती सुनीता राऊत आदींसह लोकप्रतिनिधी, पदाधिकारी उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. त्यानंतर आयोजक तसेच विविध स्थानिक स्वराज्य संस्था, राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, धार्मिक संस्थान व नागरिकांतर्फे ना. राठोड यांचा नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांची लाडू तुला करण्यात आली.सत्काराला उत्तर देताना ना.संजय राठोड यांनी वाढलेल्या जबाबदारीचे आपल्याला भान असून जनतेची कामे अधिक जोमाने करण्यासाठी बळ मिळाल्याचे सांगितले. वन्यप्राण्यांपासून होणारे शेतीचे नुकसान टाळण्यासाठी योग्य योजना राबविण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. नागरी सत्कार केल्याबद्दल त्यांनी नागरिकांचे आभार व्यक्त केले. यावेळी उत्तमराव शेळके, श्रीधर मोहोड यांनीही विचार व्यक्त केले. कार्यक्रमाला जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, तालुक्यातील नागरिक उपस्थित होते.

टॅग्स :Sanjay Rathodसंजय राठोड