शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

एकाच शेत जमिनीची चार जणांना विक्री !

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2024 18:34 IST

Yavatmal : चौघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड : २१ वर्षांपूर्वी एकच जमीन तीन जणांना व्यवहार करीत विक्री केली होती. त्यानंतर तीच जमीन चौथ्या व्यक्तीस विक्री करण्यात आली. मात्र या व्यक्तीस या व्यवहाराबाबत शंका आल्यानंतर त्यांनी थेट उमरखेड पोलिस ठाणे गाठून फिर्याद दिली. त्यावरून चार जणांविरुद्ध उमरखेड पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीमध्ये एका ८० वर्षीय महिलेचा समावेश आहे.

या प्रकरणातील फिर्यादी विनोद परसराम आलंट यांची बेलखेड शेतशिवारामध्ये शेत सर्व्हे नंबर ६३/२ अही शेती आहे. त्याच्या शेत जमिनीला लागून असलेली शेती सन २००३ पूर्वी अशोक रामराव धोपटे (वय ५२), मारोती रामराव धोपटे (वय ६०), भगवान गंगाराम धोपटे (वय ६२) आणि सुभद्राबाई गंगाराम धोपटे (वय ८०) चौघेही रा. विडूळ ता. उमरखेड यांच्या मालकीची व ताब्यात होती. सदर शेती बाळाजी विठ्ठल शिंदे रा. बेलखेड, तारूसिंग उत्तमसिंग बयास रा. बेलखेड, रमेश आंबाजी फटींग रा. बेलखेड यांना वेगवेगळ्या नोंदणीकृत दस्ताद्वारे विकण्यात आली.

सदर शेत विक्री करताना वरील चारही आरोपींनी खोटे दस्त तयार करून त्याची दुय्यम निबंधक कार्यालय उमरखेड येथे नोंदणी केली आणि शासनाची फसवणूक व दिशाभूल करून शेत विक्री केले. माझ्या शेतावर बाळाजी विठ्ठल शिंदे, तारूसिंग उत्तमसिंग बयास, रमेश आंबाजी फटींग यांनी अतिक्रमण केल्याने त्यांच्याविरुद्ध विनोद आलट यांनी न्यायालयात याचिका दाखल केली. याचिका दाखल करण्यासाठी आलट यांनी २०२३ मध्ये वरील संबंधित खरेदी खताच्या प्रमाणित प्रती दुय्यम निबंधक कार्यालयातून काढल्यानंतर फसवणुकीचा प्रकार लक्षात आला. त्यानंतर ७ जुलै रोजी विनोद परसराम आलट यांनी लेखी तक्रार दिली.

सखोल चौकशी होणारउमरखेडचे ठाणेदार संजय सोळंके यांनी भादंवि कलम ४६९/२०४, ४२०, ४६५, ४६७, ४६८, ४७१, १२० (ब) ३४ आयपीसी अन्वये चौघांविरुद्ध गुन्हे दाखल केले. सदर प्रकरणाचा तपास पोलिस प्रशासनाने सुरू केला आहे. दरम्यान, मला उमर- खेडला रुजू होऊन एक वर्ष झाले आहे. हे प्रकरण जुने आहे. त्यामुळे सखोल चौकशी केल्यानंतरच याबाबत बोलता येईल, असे दुय्यम निबंधक, जी. टी. रणमले यांनी सांगितले. 

टॅग्स :fraudधोकेबाजीYavatmalयवतमाळ