शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

पुसदच्या शिरपेचात मानाचा तुरा; कॉमनवेल्थमध्ये साक्षीला रौप्यपदक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2019 14:45 IST

वेटलिफ्टिंग स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व; पहिला दिवस भारतीय खेळाडूंनी गाजवला

- नीलेश भगतयवतमाळ : जिल्ह्यातील पुसद येथील साक्षी प्रकाश मस्केने आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकदार कामगिरी करून जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. आफ्रिका खंडातील सामोआ देशात सुरू असलेल्या कॉमनवेल्थ ज्युनियर अँड युथ वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व करीत साक्षीने ४५ किलो वजनगटात रजत पदक पटकावले.८ जुलैपासून सुरू झालेल्या या स्पर्धेचा पहिलाच दिवस भारतीय संघाने गाजवला. पहिल्या दिवशी भारताने ५ पदके पटकावली. १४ जुलैपर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेत भारताच्या २३ खेळाडूंच्या संघाने सहभाग घेतला आहे. त्यात पुसद येथील साक्षी प्रकाश मस्केचाही समावेश आहे. साक्षीने पहिल्याच दिवशी ४५ किलो वजनगटात स्नॅच प्रकारात ५८ किलो तसेच क्लिन एंड जर्क प्रकारात ७२ किलो असे एकूण १३० किलो वजन उचलून भारतासाठी रौप्यपदक पटकावले.पुसद तालुक्यातील श्रीरामपूर हे साक्षीचे मूळ गाव आहे. तिने पुसदच्या गुणवंतराव देशमुख विद्यालयात आठवी ते अकरावीपर्यंत शिक्षण घेतले. सध्या ती पुण्याच्या क्रीडा प्रबोधिनीत वेटलिफ्टिंगचे प्रशिक्षण घेत आहे. यापूर्वीही तिने राज्य स्तरावर एक सुवर्ण, एक रौप्य आणि तीन कांस्य पदके मिळविली. तर राष्ट्रीय स्पर्धेतही २ सुवर्ण पदकांची कमाई केली आहे. साक्षीचे वडील केटरिंगचा व्यवसाय करतात. आंतराष्ट्रीय स्तरावरील या यशात प्रशिक्षक विजय शर्मा, उज्ज्वला माने, पुसद येथील आनंद हेल्थ क्लबचे प्रशिक्षक आनंद करडे, गोपाल चव्हाण, गुणवंतराव देशमुख विद्यालयाचे शारीरिक शिक्षक अविनाश कराळे यांचा मोठा वाटा असल्याचे साक्षीने सांगितले. 

टॅग्स :Weightliftingवेटलिफ्टिंग