शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

शारीरिक शिक्षकांच्या बहिष्काराचा पुरता फज्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2017 01:42 IST

अन्यायकारक असलेले २८ एप्रिलचे परिपत्रक मागे घ्यावे, या मागणीसाठी संपूर्ण महाराष्ट्रात क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्यावतीने शालेय स्पर्धेवर बहिष्कार आंदोलन सुरू केले आहे.

ठळक मुद्देदहा संघांचा सहभाग : सुब्रतो मुखर्जी जिल्हास्तर शालेय फुटबॉल स्पर्धा

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : अन्यायकारक असलेले २८ एप्रिलचे परिपत्रक मागे घ्यावे, या मागणीसाठी संपूर्ण महाराष्ट्रात क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्यावतीने शालेय स्पर्धेवर बहिष्कार आंदोलन सुरू केले आहे. यवतमाळ जिल्ह्यात मात्र या आंदोलनाचा पुरता फज्जा उडाला. शुक्रवारपासून नेहरू स्टेडियम येथे शासनाच्यावतीने सुरू झालेल्या जिल्हास्तरीय सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेत दहा शालेय संघांनी उत्साहाने सहभाग घेतला आहे.शिक्षण आयुक्त पुणे यांनी २८ एप्रिल २०१७ रोजी परिपत्रक काढून शारीरिक शिक्षण विभागाच्या तासिका कमी केल्या. परिणामी या परिपत्रकामुळे शारीरिक शिक्षण शिक्षकांवर अतिरिक्त होण्याची वेळ आली आहे. या अन्यायकारक परिपत्रकाविरूद्ध राज्यातील सर्व शारीरिक शिक्षक व महासंघाने एकजुटीने आवाज उठविला. शासनाच्या शालेय क्रीडा स्पर्धेवर असहकार पुकारून बहिष्काराचे शस्त्र उगारले.यवतमाळ जिल्ह्यातही शारीरिक शिक्षक संघटना, क्रीडा संघटना यांच्यावतीने प्रभारी जिल्हा क्रीडा अधिकाºयांना २०१७-१८ च्या शालेय क्रीडा स्पर्धेवर बहिष्काराचे निवेदन देण्यात आले होते. दरवर्षी जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेची सुरुवात सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेने होत असते. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाने बहिष्कार आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर स्पर्धा आयोजनाची जय्यत तयारी केली. जिल्ह्यातील सर्व शाळांना स्पर्धेत सहभागाचे आवाहन करून शालेय संघाची स्पर्धापूर्व नोंदणी न करता मैदानावरच नोंदणी करण्याची योजना आखली. याचा परिणाम २८ जुलैपासून सुरू झालेल्या जिल्हास्तर सुब्रतो मुखर्जी स्पर्धेत १४ वर्षाआतील मुलांच्या गटात दहा शालेय संघांनी सहभाग घेतला.सकाळी १०.३० वाजता स्पर्धा संयोजक तथा क्रीडा अधिकारी संतोष विघ्ने, राहुल तपाळकर, राज्य क्रीडा मार्गदर्शक सचिंद्र मिलमिले, किशोर चौधरी, शारीरिक शिक्षक प्रवीण कळसकर, संजय सातारकर, अविनाश भनक, गुणवंत सोनटक्के यांच्या उपस्थितीत स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.या स्पर्धेत यवतमाळ पब्लिक स्कूल, संस्कार इंग्लिश स्कूल, पोदार इंटरनॅशनल स्कूल, के.डी. विद्यालय पुसद, स्वर्णलीला स्कूल, लायन्स स्कूल वणी, महर्षी विद्या मंदिर, अँग्लो हिंदी हायस्कूल, जवाहरलाल दर्डा इंग्लिश मीडियम स्कूल, सेंट अलॉयसिअस स्कूल या शालेय संघांनी सहभाग नोंदविला.पोदार, जेडी संघ उपांत्य फेरीत१४ वर्षाआतील मुलांच्या उपउपांत्य फेरीत जवाहरलाल दर्डा इंग्लिश मीडियम स्कूल विरूद्ध के.डी. स्कूल पुसद संघादरम्यान रोमहर्षक सामना झाला. निर्धारित वेळेत गोल न झाल्याने तब्बल ११ वेळा सामना ट्रायब्रेकरमध्ये गेला. शेवटी पेनॉल्टी शूट आऊटवर सामन्याचा निकाल लागला. यात जेडी संघाने तीन विरूद्ध दोन गोलने विजय साजरा करीत उपांत्य फेरीसाठी पोदार संघाने वायपीएस संघाचा १ विरूद्ध ० गोलने पराभव करून उपांत्य फेरीत धडक दिली. पहिल्या उपांत्य फेरीत महर्षी विद्या मंदिर संघाने स्वर्णलीला पुसद संघाचा पराभव करून अंतिम फेरीत थाटात प्रवेश केला.खेळाडूंमध्ये प्रचंड उत्साहशारीरिक शिक्षकांच्या बहिष्कारानंतरही या स्पर्धेत शाळांनी सहभाग नोंदविला. मैदानावर उतरलेल्या खेळाडूंमध्ये प्रचंड उत्साह होता. पाऊस असतानाही त्यांच्यातील जिद्द कायम होती. प्रत्येकजण आपल्या संघाला विजय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत होता. क्रीडा प्रेमींकडूनही त्यांना चांगली दाद मिळत होती.