शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

राळेगावातील ग्रामीण रस्ते बिघडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2020 05:00 IST

खैरी ते करणवाडी हा मार्ग गड्ड्यांचा मार्ग म्हणून ओळखला जावू लागला आहे. खैरी फाटा ते आष्टोना, मंगी, दहेगाव मार्ग ग्रामस्थांची परीक्षा घेणारा ठरत आहे. येवती-चहांद-खडकी रस्ता बांधून फार वर्षे झालेली नाहीत. तरी स्थिती वाईट झाली आहे. किन्ही फाटा ते चाचोरा रस्ता झाडगाव-झरगड रस्त्यांना आता नवनिर्माणाची प्रतीक्षा आहे.

ठळक मुद्देस्थिती शोचनीय : चिखल, खड्ड्यातील मार्गापासून मुक्ती कधी? गुजरी, परसोडा, रानवड, रावेरी, खैरी रस्त्यांची

लोकमत न्यूज नेटवर्कराळेगाव : तालुक्यातील ग्रामीण रस्त्यांची अनेक ठिकाणी वाट लागली आहे. चिखल आणि खड्ड्यातून जवळपासच्या गावात ये-जा करण्यात ग्रामस्थांना चांगलीच कसरत करावी लागत आहे. बिघडलेले रस्ते कधी दुरुस्त होतील, याबाबत ग्रामस्थ लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांना वारंवार विचारणा करीत आहे.काही ठिकाणी रस्त्यांची कामे मंजूर झाली. त्यातील काही कामे सुरू झाली. अनेक अद्यापही अपूर्ण आहेत. अनेक कामे सुरूच झालेली नाही. जिल्हा परिषद सदस्य मंजूर झालेल्या कामाबद्दल माहिती देत असताना बांधकाम अभियंते त्यास दुजोरा देत नाही. कृषी हंगाम सुरू झाला आहे. पुढे सर्वच महत्त्वाचे सण समोर आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांनी आता बिघडलेले रस्ते सुयोग्य करण्यास वेगवान हालचाल करणे अपेक्षित आहे.राळेगाव, गुजरी, नागठाणा, परसोडा रस्त्याचे हाल अत्यंत वाईट आहे. गुजरी-परसोडा रस्ता मंजूर असूनही कामास सुरुवात झालेली नाही. राळेगाव-गुजरी रस्त्याचे खड्डे ग्रामस्थांनी श्रमदानाने मागच्या महिन्यात भरून रस्ता थोडाफार वाहतुकीयोग्य केला. रानवड ते पिंपळगाव रस्ता दोन महिन्यांपासून जैसे थेच आहे. राळेगाव-मोहदा मार्गावरील रावेरी-पिंपळखुटी-वरूड-मोहदा रस्त्याची स्थिती आणखी शोचनीय झाली आहे.खैरी ते करणवाडी हा मार्ग गड्ड्यांचा मार्ग म्हणून ओळखला जावू लागला आहे. खैरी फाटा ते आष्टोना, मंगी, दहेगाव मार्ग ग्रामस्थांची परीक्षा घेणारा ठरत आहे. येवती-चहांद-खडकी रस्ता बांधून फार वर्षे झालेली नाहीत. तरी स्थिती वाईट झाली आहे. किन्ही फाटा ते चाचोरा रस्ता झाडगाव-झरगड रस्त्यांना आता नवनिर्माणाची प्रतीक्षा आहे. धानोरा ते रोहिणी रस्ता दुरुस्तीची मागणी करून ग्रामस्थ थकले आहे. उंदरी ते आदिवासी समाजाची पंढरी असलेल्या जागजई रस्त्याची स्थिती अत्यंत वाईट झाली आहे. अनेकदा अधिकारी व लोकप्रतिनिधींना निवेदने देण्यात आली, पण दुर्लक्ष केले जात आहे. या प्रश्नाकडे गांभिर्याने लक्ष देण्याची मागणी होत आहे.राष्ट्रीय महामार्गावर अपघाताची मालिकाराष्ट्रीय महामार्ग असलेला वडकी-करंजी चारपदरी मार्ग दोन वर्षांच्या आतच खड्डेमय झाल्याने दररोज लहान-मोठे अपघात होवू लागले आहे. देखभाल दुरुस्तीच्या काळात खालावलेले रस्ते ठेकेदाराकडून पुन्हा दुरुस्त करून घेण्यास विभागांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे.

टॅग्स :Socialसामाजिक