लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोरोनामुळे जिल्ह्यातील शाळा अद्यापही सुरू झालेल्या नाहीत. मात्र गोरगरीब विद्यार्थ्यांच्या गणवेशाचा पैसा मंजूर झाला आहे. जिल्ह्यात तब्बल ९ कोटी २८ लाख ७० हजार ४०० रुपयांचा निधी सोमवारी मंजूर झाला.सोळाही पंचायत समितीमधील मागील वर्षीच्या पटसंख्येनुसार शिक्षण विभागाने गणवेश निधीची मागणी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेकडे नोंदविली होती. परंतु, लॉकडाऊन कालावधीत परिषदेचे २०२०-२१ या वर्षाचे अंदाजपत्रक तयार असले तरी मंजूर झालेले नव्हते. त्यामुळे २६ जून रोजी म्हणजे मिळणाऱ्या शालेय गणवेशाबाबत जुलै संपत आला तरी संभ्रम होता. अखेर हे बजेट आता मंजूर झाले असून परिषदेने यवतमाळ जिल्ह्यातील १ लाख ५४ हजार ७८४ विद्यार्थ्यांसाठी सव्वा नऊ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.यातून पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी दोन गणवेशांसाठी ६०० रुपयांचा निधी मिळणार आहे. परंतु, गणवेशाबाबत निधी खर्चाचे संपूर्ण अधिकारी संबंधित शाळा व्यवस्थापन समित्यांना देण्यात आले आहे. त्याबाबत परिषदेने मार्गदर्शक सूचनाही जारी केल्या आहेत. आठवडाभरात हा निधी जिल्ह्याला प्राप्त होणार असून तो तातडीने शाळा व्यवस्थापन समित्यांच्या खात्यावर वर्ग केला जाईल, अशी माहिती शिक्षण विभागातून देण्यात आली.विद्यार्थ्यांची मापे घेऊन तयारसमग्र शिक्षा अभियान कक्षाने फेब्रुवारीतच सर्व शाळांना विद्यार्थ्यांच्या गणवेशासाठी मापे घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. ही मापे तयार असून आता शाळा व्यवस्थापन समितीला केवळ निधीची प्रतीक्षा आहे.
शालेय गणवेशाचे नऊ कोटी रुपये आठवडाभरात येणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2020 05:00 IST
सोळाही पंचायत समितीमधील मागील वर्षीच्या पटसंख्येनुसार शिक्षण विभागाने गणवेश निधीची मागणी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेकडे नोंदविली होती. परंतु, लॉकडाऊन कालावधीत परिषदेचे २०२०-२१ या वर्षाचे अंदाजपत्रक तयार असले तरी मंजूर झालेले नव्हते. त्यामुळे २६ जून रोजी म्हणजे मिळणाऱ्या शालेय गणवेशाबाबत जुलै संपत आला तरी संभ्रम होता.
शालेय गणवेशाचे नऊ कोटी रुपये आठवडाभरात येणार
ठळक मुद्देशाळा बंद तरी योजनेला मंजुरी : दीड लाख विद्यार्थ्यांना लाभ