शहरं
Join us  
Trending Stories
1
आषाढी एकादशी सोहळा; मुख्यमंत्र्यांची शासकीय महापूजा; नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
2
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
3
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
4
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
5
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
6
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
7
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
8
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
9
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
10
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
11
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
12
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
13
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
14
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
15
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
16
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
17
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
18
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
19
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
20
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...

वेअरहाऊसवरील छत उडाले, पीक उद्ध्वस्त

By admin | Updated: February 28, 2016 02:31 IST

वादळ, पाऊस आणि गारांमुळे रबी पिकांचे मोठे नुकसान झाले. रस्त्यावर झाडे कोसळल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती.

घरांना हानी पोहोचली : दाभा पहूर येथे १० मिनिटे गारांचा पाऊसयवतमाळ : वादळ, पाऊस आणि गारांमुळे रबी पिकांचे मोठे नुकसान झाले. रस्त्यावर झाडे कोसळल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती. गहू, हरभरा, पपई आदी पिकांना फटका बसला. काही ठिकाणी घराचेही मोठे नुकसान झाले आहे. दाभा येथे १० मिनीट गारांचा पाऊस झाला. पांढुर्णा केदारलिंग येथील केशवराव काईट यांच्या घराची भिंत कोसळली. तसेच टिनपत्रे उडून गेले. उमरखेड तालुक्यातही याच सुमारास जोरदार वादळ आणि पाऊस झाला. शहरात १५ मिनिटे गारांचा वर्षाव झाला. शहरातील ढाणकी मार्गावरील विनोद कन्नावार यांच्या गोदामाचे छत उडून गेले. या गोदामात असलेला शेकडो क्ंिवटल हरभरा ओला झाला. तर आपला जीन प्रेसचेही छत उडाले. अनेक घरावरील टीनपत्रे उडून गेली. शहरातील विश्रामगृहासमोर बाभळीचे मोठे झाड कोसळल्याने नागपूर-बोरी-तुळजापूर राज्य मार्गावरील वाहतूक दीड तास ठप्प झाली होती. तालुक्यातील विडूळ आणि बंदी भागात मोठ्या प्रमाणात गारपीट झाल्याची माहिती आहे. विडूळ ते दिघडी आणि ढाणकी रस्त्यावर वृक्ष कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली होती. महागावातील बिजोरा, कोठारी, बेलदरी, नांदगव्हाण, हिंगणी, राजुरा, काळीदौलत, सेनद, मोरथ परिसरात तुरीच्या आकाराची गारपीट झाली. सर्वाधिक तडाखा केळी पिकाला बसला. दिग्रस तालुक्यात दोन तास रिमझिम पाऊस बरसला. सिंगद, मांडवा या भागात चांगलाच पाऊस झाला. नेर तालुक्यातील माणिकवाडा, गोंडगव्हाण, दाभापहूर परिसरात लिंबाच्या आकाराची गार झाल्याची माहिती आहे. बाभूळगाव तालुक्यात दहा मिनिटे बोराच्या आकाराची गारपीट झाली. (लोकमत चमू)अचानक आलेल्या वादळाने जनजीवन विस्कळीतहरभराचे प्रचंड नुकसानसध्या हरभरा काढणीला आला असून अनेक शेतकऱ्यांनी हरभऱ्याची कापणी करून ढिग लावले आहे. मात्र शनिवारी सायंकाळी झालेल्या पावसाने काढलेल्या हरभरा पिकाचे प्रचंड नुकसान झाले. शेतकरी हरभरा झाकण्यासाठी धावपळ करताना दिसत होते. हरभऱ्यासोबतच गहू पिकाचेही मोठे नुकसान झाले. केळी, संत्रा आणि पालेभाज्यांना मोठा फटका बसला. वीज पुरवठा खंडित वादळी पावसामुळे अनेक ठिकाणी वीज तारा तुटल्या असून पुसद शहरासह अनेक गावांचा वीज पुरवठा सायंकाळी खंडित झाला होता. वृत्त लिहेस्तोवर वीज पुरवठा सुरळीत झाला नव्हता. तसेच अनेक भागात वृक्ष कोसळले. तसेच दूरध्वनी सेवाही खंडित झाली. बाजार समितीत तूर ओलीपुसद येथील ग्रेन मार्केटमध्ये शनिवारी तुरीची खरेदी सुरू होती. सायंकाळी अचानक आलेल्या वादळी पावसाने मार्केटमधील हजारो क्ंिवटल तूर ओली झाली. सदर प्रतिनिधीने बाजार समितीचा फेरफटका मारला असता बाजार समितीच्या शेडचे टीनपत्रे उडाली. तसेच शेडमध्ये पाणी शिरल्याने तूर, हरभरा ओला झाला. यावेळी शेतकरी हतबल झाले.