शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

‘एसटी’ चालक-वाहक कारकुनाच्या भूमिकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2018 23:28 IST

‘एसटी’च्या उत्पन्नाचा मुख्य आधार असलेला वाहक कारकुनाच्या भूमिकेत दिसत आहे. प्रामुख्याने यवतमाळ आगारात सुरू असलेली ही परंपरा महामंडळाच्या नुकसानीला कारणीभूत ठरत आहे. एकीकडे वाहक तुटवड्याचा कांगावा केला जातो, तर दुसरीकडे त्यांचा वापर इतर विभागात होत आहे.

ठळक मुद्देतुटवड्याचा कांगावा : मुंबईपर्यंत पोहोचली माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : ‘एसटी’च्या उत्पन्नाचा मुख्य आधार असलेला वाहक कारकुनाच्या भूमिकेत दिसत आहे. प्रामुख्याने यवतमाळ आगारात सुरू असलेली ही परंपरा महामंडळाच्या नुकसानीला कारणीभूत ठरत आहे. एकीकडे वाहक तुटवड्याचा कांगावा केला जातो, तर दुसरीकडे त्यांचा वापर इतर विभागात होत आहे. ही माहिती महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालकांपर्यंत पोहोचली असून यावर कारवाईच्या हालचाली सुरू झाल्याची माहिती आहे.यवतमाळ आगारात मागील सात वर्षांपासून तिकीट वितरण शाखेत वाहकांचा वापर केला जात आहे. प्रत्यक्षात या आगारात पुरेसा कारकून वर्ग आहे. तरीही वाहकांची ड्यूटी का लावली जाते, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. आरक्षणासाठी दोन खिडक्या व दोन कारकुनांची मंजूरी आहे. तिथेही तिसरा वाहक दिला जात आहे. मागील पाच वर्षांपासून हा प्रकार सुरू आहे. हजेरीपत्रक बनविणे, पी मस्टर भरणे यासाठी वाहकांचा वापर होत आहे. वास्तविक ही जबाबदारी अलोकेशन पर्यवेक्षकाची आहे. अलोकेशनमध्ये एटीएस, टीआय, एटीआय, दोन चालक आणि वाहकांचा वापर केला जातो. तेही ठराविक लोकांनाच ही कामगिरी दिली जात आहे. अनुभवी लोकांचा फायदा इतरांना व्हावा यासाठी हा प्रकार केला जात असल्याचे उत्तर दिले जाते.या प्रकाराला प्रतिबंध बसावा यासाठी मध्यवर्ती कार्यालयाने परिपत्रक काढले. हा प्रकार सोयीनुसार ड्यूटी करणाऱ्यांना पचणी पडला नाही. १९ मे रोजी तिकीट वितरण शाखेत अनुभव नसलेल्या कारकुनाची प्रथम पाळीत कामगिरी लावण्यात आली. सकाळी निघणारे अनेक शेड्यूल योग्यवेळी योग्य मशीन वाहकांना न मिळाल्याने निघू शकले नाही. या दिवशी सुमारे ५० हजार रुपयांचे नुकसान महामंडळाला सहन करावे लागल्याचे सांगितले जाते. याठिकाणी अनुभवी कारकुनाची कामगिरी लावली असती तर नुकसान टळले असते, असे करण्यात आलेल्या तक्रारीत म्हटले आहे.अतिकालीक भत्त्याचा कमी दर असलेल्या चालक-वाहकांनाच दुहेरी कामगिरीवर पाठवावे, असे महामंडळाचे निर्देश आहे. तरीही ३०० ते ३५१ रुपये दर असलेल्या आणि ठराविक चालक-वाहकांना अशी कामगिरी दिली जात आहे. ८० ते २०० रुपये दर असलेले जवळपास १५० चालक-वाहक आगारात असताना जादा दराचे चालक-वाहक पाठविण्यामागे वरिष्ठ अधिकाºयांचा काय हेतू असावा, असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला आहे.

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळ