शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

पाच महिन्यांपासून रस्त्याचे काम रखडले; नागरिक त्रस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2024 18:09 IST

अपघाताची भीती : दगडाच्या ढिगामुळे वाहतुकीला अडथळा

लोकमत न्यूज नेटवर्क पुसद : नगर परिषद हद्दीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून ते नेताजी सुभाषचंद्र बोस चौकापर्यंत गेल्या पाच ते सहा महिन्यांपूर्वी रस्त्याचे काम सुरू करण्यात आले. हे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण होणे गरजेचे होते. परंतु संबंधित विभागाने या रस्त्याच्या विकास कामाकडे दुर्लक्ष केले. यामुळे कंत्राटदाराने रस्त्याचे काम धिम्यागतीने सुरू केले. निधी मंजूर असतानाही काम होत नसल्याने सणासुदीच्या दिवसात शहरवासीयांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. 

शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून ते नेताजी सुभाषचंद्र बोस चौकापर्यंत मुख्य रस्त्याचे काम गेल्या सहा महिन्यांपूर्वी सुरू करण्यात आले. त्यावेळी पेरणीचे दिवस असताना हे काम सुरू केल्याने व्यापारी, शेतकरी व नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागला. हा रस्ता शहरातील मुख्य रस्ता असल्याने या नेहमी रहदारी असते. या रस्त्यावर अनेक कृषी केंद्र, दवाखाने, हार्डवेअर, बँका, ग्रेन मार्केट, कापड दुकाने आदी दुकाने आहेत. यामुळे या मार्गावर कायम वर्दळ असते. संबंधित कंत्राटदाराने ऐन सणासुदीच्या दिवसात पुन्हा या रस्त्याच्या कामास सुरुवात केली आहे. रस्त्यावर मोठ मोठे दगडाचे ढीग डंपर मधून आणून व्यापाऱ्यांच्या दालनासमोर टाकले आहे. दगडाचे ढीग रस्त्यावर पडल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे. या रस्त्यातून मार्ग काढताना दुचाकी आणि चारचाकी चालकांना तारेवरची कसत करावी लागत आहे. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याकडे नगरपरिषदेने वेळेत लक्ष देणे गरजेचे असून संभाव्य अपघात झाल्यास याला जबाबदार कोण असा प्रश्न निर्माण झाला. यापूर्वी या रस्त्याच्या कामामुळे नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. या रस्त्याच्या विकासाकडे दुर्लक्ष केल्याने पावसाळ्यापूर्वी अपेक्षित खडीकरण व अंतिम टप्प्यातील काम पूर्ण झाले नाही. याचा त्रास या भागातील नागरिकांना सोसावा लागत आहे.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूकroad safetyरस्ते सुरक्षाYavatmalयवतमाळ