शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

दहा हजार कोटींच्या रस्त्यांवर रोड इंजिनिअरची नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2019 10:59 IST

‘हायब्रीड अ‍ॅन्यूईटी’ अंतर्गत राज्यात दहा हजार कोटी रुपयांचे रस्ते बांधले जात आहे. या रस्त्यांच्या गुणवत्तेवर आता सार्वजनिक बांधकाम खात्याच्या गुणवत्ता नियंत्रण विभागाऐवजी खासगी कन्सलटंटचे रोड इंजिनिअर (अथॉरिटी इंजिनिअर्स) नजर ठेवणार आहेत.

ठळक मुद्दे‘हायब्रीड अ‍ॅन्यूईटी’खासगी कन्सलटंट तपासणार दर्जाबांधकामच्या ‘क्वॉलिटी कंट्रोल’वर अविश्वास

राजेश निस्ताने।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : ‘हायब्रीड अ‍ॅन्यूईटी’ अंतर्गत राज्यात दहा हजार कोटी रुपयांचे रस्ते बांधले जात आहे. या रस्त्यांच्या गुणवत्तेवर आता सार्वजनिक बांधकाम खात्याच्या गुणवत्ता नियंत्रण विभागाऐवजी खासगी कन्सलटंटचे रोड इंजिनिअर (अथॉरिटी इंजिनिअर्स) नजर ठेवणार आहेत.‘हायब्रीड अ‍ॅन्यूईटी’मधून ३० हजार कोटींच्या रस्त्यांचे नियोजन आहे. पहिल्या टप्प्यात दहा हजार कोटींचे रस्ते बांधले जात आहे. बड्या कंत्राटदारांना ही कामे देण्यात आली आहे. बांधकामांच्या दर्जा व गुणवत्तेवर नजर ठेवण्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या गुणवत्ता नियंत्रण (क्वॉलिटी कंट्रोल) विभागाकडे आहे. परंतु ‘हायब्रीड अ‍ॅन्यूईटी’तील रस्त्यांच्या गुणवत्ता तपासणीचे अधिकार क्वॉलिटी कंट्रोलवर अविश्वास दाखवित त्यांच्याकडून काढून घेण्यात आले आहे. त्याऐवजी खासगी कन्सलटंटकडे ही जबाबदारी सोपविण्यात आली. त्यांचे रोड इंजिनिअर या रस्त्यांची गुणवत्ता तपासणार आहे. अर्थात हे इंजिनिअर शासन व कंत्राटदार यांच्यात दुवा म्हणून काम करणार आहे. बिल बनविणे, मोजमाप घेणे ही कामेही ते करणार आहेत.

‘कन्सलटंट’वर शेकडो कोटींची उधळपट्टीखासगी कन्सलटंटकडे गुणवत्ता तपासणीची जबाबदारी दिल्याने दहा हजार कोटींच्या रस्त्यांचा दर्जा खरोखरच सांभाळला जाणार का याबाबत साशंकता आहे. कारण शासनाच्या क्वॉलिटी कंट्रोल विभागातील अभियंत्यांना कारवाईची, नोकरी जाण्याची भीती असते, यामुळे ते क्वॉलिटीसोबत शंभर टक्के तडजोड करीत नाही. या उलट स्थिती खासगी कन्सलटंटच्या इंजिनिअरची राहू शकते. या कन्सलटंट व इंजिनिअरवर ५०० कोटी पेक्षा अधिक रक्कम शासनाच्या तिजोरीतून खर्च केली जाणार असल्याची माहिती आहे. ‘हायब्रीड अ‍ॅन्यूईटी’च्या सर्वेक्षणावरही अशाच पद्धतीने ५०० ते ७०० कोटी रुपये खर्च केले गेले होते.

निवृत्त बांधकाम अभियंतेच कन्सलटंटकडेसार्वजनिक बांधकाम खात्यातून निवृत्त झालेल्या अभियंत्यांचाच कन्सलटंटकडे भरणा आहे. एकीकडे ‘हायब्रीड अ‍ॅन्यूईटी’च्या नावाने बांधकाम खात्याकडील कामे कमी केली, तर दुसरीकडे बांधकाम खात्याचेच अभियंते खासगी कन्सलटंटसाठी तीच कामे करीत आहे. आजच्या घडीला बांधकाम खात्याच्या क्वॉलिटी कंट्रोलकडे फारसे काम उरलेले नाही. बहुतांश जबाबदारी खासगी कन्सलटंटच्या रोड इंजिनिअरकडे देण्यात आली आहे. असे असताना पुन्हा राज्य लोकसेवा आयोगामार्फत बांधकाम व सिंचन विभागासाठी ४०० अभियंत्यांची नोकरभरती केली जात असल्याने आश्चर्य व्यक्त केले जाते.‘बीग बजेट’ कामांमुळे सर्वच खूष‘हायब्रीड अ‍ॅन्यूईटी’त खासगी कन्सलटंट बजेट वाढवून देत असल्याने शासनाच्या तिजोरीवर बोझा वाढत असला तरी राजकीय पदाधिकारी मात्र आपल्या मतदारसंघात मोठ्या रकमेचे काम आले म्हणून खूश असतात. शिवाय बजेटनुसार ‘मार्जीन’ही वाढत असल्याने सर्व संबंधितांची त्याला मूकसंमती असते.करारनाम्यात दडपले गैरप्रकार‘हायब्रीड अ‍ॅन्यूईटी’च्या करारनाम्यातच अनेक गैरप्रकार दडपले गेले आहे. हे करारनामे कुणी वाचले नाही किंवा या कामांचे प्रशिक्षण दिले गेले नाही. वास्तविक करारनामे योग्य आहे की नाही याची तपासणी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयांमार्फत होणे अपेक्षित होते.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूक