लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी पांढरकवडा नगर पालिकेच्या सभागृहात विविध विषयांचा आढावा घेतला. यावेळी आमदार राजू तोडसाम, आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, नगराध्यक्ष वैशाली लहाणे, सहाय्यक जिल्हाधिकारी भुवनेश्वरी, अण्णासाहेब पारवेकर, पंचायत समिती सभापती मेसेवार, उपसभापती बोडेवार, सदस्य शीला मेश्राम, राकेश नेमणवार, संतोष चिंतावार, शंकर सामृतवार आदी उपस्थित होते.ना. अहीर म्हणाले, शासनाने पाच ब्रास रेती देण्याचा निर्णय घेतला आहे. प्रशासनाने जप्त केलेली रेती घरकूल योजनेकरिता वापरण्यात येत आहे. पालिका क्षेत्रात विद्युत खांब कनेक्शनसाठी बाकी आहे, असे नगराध्यक्षांनी सांगितले. मार्च २०१८ पर्यंतचे सर्व कनेक्शन पूर्ण करण्यात येतील. तसेच ज्या गावांनी प्रथम डिमांड भरली आहे, त्या गावाला प्राधान्याने प्रथम कनेक्शन द्यावे, अशा सुचना त्यांनी विद्युत विभागाच्या अधिका-यांना केल्या.प्रधानमंत्री कृषी संजीवनी योजनेमध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांना सिंचनाची सोय उपलब्ध करून द्यावी. कृषी विभाग तसेच इतर योजनांबाबत पंचायत समितीच्या पदाधिकाºयांना संबंधित विभागाने माहिती द्यावी, अशा सूचनाही हंसराज अहीर यांनी केल्या. यावेळी बांधकाम विभागाचा आढावा घेण्यात आला. तालुकास्तरावर किती पाणीपुरवठा योजना सुरू आहे व किती बंद आहे, याबाबत विचारणा केली असता बंद असलेल्या सर्व योजना तात्काळ सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले. यावेळी विविध विषयांचा आढावा घेण्यात आला. बैठकीला झरी जामणी, पांढरकवडाचे गटविकास अधिकारी, तहसीलदार, तालुक्यातील सरपंच, तलाठी, ग्रामसेवक आदी उपस्थित होते.
पांढरकवडात कृषी, वीज व सिंचनाचा आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2019 23:46 IST
केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी पांढरकवडा नगर पालिकेच्या सभागृहात विविध विषयांचा आढावा घेतला. यावेळी आमदार राजू तोडसाम, आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, नगराध्यक्ष वैशाली लहाणे, सहाय्यक जिल्हाधिकारी भुवनेश्वरी, अण्णासाहेब पारवेकर, .....
पांढरकवडात कृषी, वीज व सिंचनाचा आढावा
ठळक मुद्देहंसराज अहीर यांनी घेतला लेखाजोखा : बंद पाणीपुरवठा योजना तत्काळ सुरू करण्याचे दिले निर्देश