शहरं
Join us  
Trending Stories
1
एकत्रित लढू अन् सत्ताबदल करू; महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांनी व्यक्त केला निर्धार!
2
T20 WC, AUS vs SCO : सुपर-८ साठी चुरस! ऑस्ट्रेलियाची बेक्कार धुलाई; इंग्लंडची धाकधुक वाढली
3
आजचे राशीभविष्य, १६ जून २०२४ : मिथुनसाठी काळजीचा अन् वृश्चिकसाठी आनंदाचा दिवस
4
वादाची ठिणगी पडली; महायुतीत आम्हीच मोठे भाऊ असल्याचा शिंदेसेनेचा दावा 
5
मुख्य, हार्बर मार्गावर मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक; आज घराबाहेर पडण्यापूर्वी वेळापत्रक बघा!
6
आई ओरडल्यानं तरूणीची नदीत उडी! प्रियकरानेही उचललं टोकाचं पाऊल; मच्छिमार बनले देवदूत
7
धक्कादायक! वायकरांच्या नातेवाइकाने वापरला ईव्हीएम अनलॉक करणारा फोन
8
हिजाब बंदीविरोधात विद्यार्थी कोर्टात राज्य, केंद्र सरकार प्रतिवादी; १९ जूनला सुनावणी
9
अण्णा, आमच्या दादांना तुम्ही क्लीनचिट दिली की नाही..?
10
५९ देश, ६१ भाषांतील ३१४ चित्रपटांची मेजवानी
11
“लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला सर्वाधिक बळ महाराष्ट्राने दिले”; जयंत पाटील स्पष्टच बोलले
12
Raju Shetty : 'महाविकास आघाडीच्या नेत्यांनी माझी फसवणूक केली'; राजू शेट्टींचा गंभीर आरोप
13
सरकारकडून अद्यापपर्यंत उपोषणाची दखल का नाही : लक्ष्मण हाके
14
विराट कोहली कोणत्या गोष्टीवरून चिडलेला दिसला? IND vs CAN सामन्याबाबत महत्त्वाचे अपडेट्स
15
“मी म्हणालो होतो, आम्हाला भाजपामुक्त राम हवा, अयोध्यावासीयांनी करुन दाखवले”: उद्धव ठाकरे
16
इंटरनेटवर पाहून केलेलं डाएटिंग ठरू शकतं जीवघेणं; तुम्हीही करताय का 'ही' चूक?
17
शुबमन गिलने खरंच इंस्टाग्रामवर रोहितला अनफॉलो केले का? राखीव खेळाडूवर शिस्तभंगाची कारवाई?
18
'मविआ'मध्ये छोटा, मोठा भाऊ कुणीही नाही, लवकरच जागावाटप करणार'; पृथ्वीराज चव्हाणांनी चर्चांना दिला पूर्णविराम
19
"आता यांच्यामध्ये बसून..."; भाजपसोबत जाण्यावर उद्धव ठाकरेंचं शरद पवारांसमोर सूचक विधान
20
विधानसभेला तरी प्रकाश आंबेडकरांना सोबत घेणार का? उद्धव ठाकरेंचे एका वाक्यात उत्तर, म्हणाले...

कर्ज पुनर्गठन करा, नवीन सभासदांना कर्ज द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 10:06 PM

संपूर्ण जिल्हा दुष्काळाच्या छायेत आहे. यामुळे कर्जाची परतफेड न करता आलेल्या शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठन करण्यात यावे, वनटाईम सेटलमेंट करणाऱ्या शेतकऱ्यांना तत्काळ कर्ज देण्यात यावे आणि नवीन सभासदांना कर्ज देण्यासाठी बँकांनी पुढाकार घ्यावा, अशा सूचना मंगळवारी बँकर्स कमिटीच्या बैठकीत देण्यात आल्या.

ठळक मुद्देबँकर्स कमिटीला निर्देश : जिल्हा बँकेचे अर्धे सभासद राष्ट्रीयकृत बँकेकडे वळते करण्याच्या सूचना

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : संपूर्ण जिल्हा दुष्काळाच्या छायेत आहे. यामुळे कर्जाची परतफेड न करता आलेल्या शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठन करण्यात यावे, वनटाईम सेटलमेंट करणाऱ्या शेतकऱ्यांना तत्काळ कर्ज देण्यात यावे आणि नवीन सभासदांना कर्ज देण्यासाठी बँकांनी पुढाकार घ्यावा, अशा सूचना मंगळवारी बँकर्स कमिटीच्या बैठकीत देण्यात आल्या.वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांच्या अध्यक्षतेखाली बँकर्स कमिटीची आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत कर्जमाफीस पात्र ठरलेले शेतकरी आणि रखडलेल्या याद्यांचा मुद्दा मांडण्यात आला. यावेळी जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरविंद देशपांडे यांच्याखेरीज राष्ट्रीयकृत बँकांच्या प्रतिनिधींना उत्तर देताना चांगलीच कसरत करावी लागली.राष्ट्रीयकृत बँकांकडे कर्जवाटपाचे सर्वाधिक उद्दिष्ट आहे. यानंतरही बँकांच्या बाहेर कर्जवाटपासाठी फ्लेक्स लागले नाही. यामुळे शेतकºयांना अद्यापही कर्जवाटपाची माहिती मिळाली नाही. कर्जवाटपास पात्र शेतकºयांच्या याद्या दडविण्यात आल्या, असा गंभीर आरोप शेतकरी स्वावलंबन मिशनच्या अध्यक्षांनी केला.संपूर्ण जिल्ह्याची पैसेवारी ५० टक्केच्या आत आहे. तरी थकीत कर्जाचे पुनर्गठन झाले नाही. तसे पत्र बँकांना का गेले नाही, याचा जाब तिवारी आणि प्रभारी जिल्हाधिकारी चंद्रकांत जाजू यांनी विचारला. दीड लाखापेक्षा जास्त कर्ज असणाºया शेतकºयांना कर्ज भरताच नवीन कर्ज तत्काळ देण्यात यावे, अशा सूचना बँकांना देण्यात आल्या.कर्ज वितरित करण्यासाठी जिल्हा बँकेला ८०० कोटींची गरज असताना ५०० कोटी रूपये वळते झाले. १०० कोटीची आणखी रक्कम वळती होईल. यानंतरही २०० कोटीचा तुटवडा भासणार आहे. यामुळे २०० कोटीच्या कर्ज वितरणासाठी सभासदांना राष्ट्रीयकृत बँकेकडे वळते करण्यात यावे, त्यासाठी त्यांना एनओसी देण्यात यावी, अशा सूचना यावेळी देण्यात आल्या. यावर्षी ६० हजार नवीन सभासदांना कर्ज वितरित करण्यात यावे, अशा सूचनाही देण्यात आल्या.