शहरं
Join us  
Trending Stories
1
Sydney Shooting: पाकिस्तानातून ऑस्ट्रेलियात कसे पोहोचले सिडनी बीचवर गोळीबार करणारे सैतान? दहशतवादी 'पिता-पुत्रां'संदर्भात अनेक दावे
2
मेस्सी राष्ट्रवादीच्या नेत्याला भेटायला जाणार, ते शरद पवार नाहीत; दिल्लीत कंपन्यांनी एका 'हँडशेक'साठी मोजले १ कोटी...
3
सुपरहिरो! "मी मरणार आहे, कुटुंबाला सांगा...", गन हिसकावली, दहशतवाद्यांशी भिडला अहमद
4
IND vs SA: टी२० मध्ये सुपरफास्ट ४००० धावा, तिलक वर्माचा नवा विक्रम, विराटलाही टाकलं मागं!
5
Pune Crime: कोचिंगमध्ये रक्तरंजित संघर्ष! शिक्षक शिकवत असतानाच विद्यार्थ्यांवर हल्ला; एकाचा मृत्यू; हल्ला करणारा विद्यार्थी फरार
6
"खूप गोष्टी आहेत त्या मी बोलू शकत नाही..."; भाजपात प्रवेश करताच तेजस्वी घोसाळकरांनी मांडली व्यथा
7
तत्कालीन CJI ने मोजक्या कर्मचाऱ्यांना दिलं होतं सहा-सहावेळा इन्क्रीमेंट; आता सुप्रीम कोर्टाने निर्णय मागे घेतला
8
"स्वप्नातही विचार केला नव्हता..."; ४ वेळा आमदार राहिलेल्या नितीन नबीन यांना भाजपाचं 'सरप्राइज'
9
बाजाराची नकारात्मक सुरुवात! सेन्सेक्स-निफ्टी लाल निशाणीवर; 'या' समभागांना मोठा फटका
10
Priyanka Gandhi Prashant Kishor: बिहार निकालाने झटका! प्रशांत किशोरांनी अचानक घेतली प्रियंका गांधींची भेट
11
Health Tips: हृदय विकाराच्या 'या' सात सूक्ष्म संकेतांकडे दुर्लक्ष करू नका, वेळीच करा उपाय!
12
जीएसटी कपातीचा आनंद संपल्यात जमा...! नवीन वर्षात ‘महागाईचा झटका’! टीव्ही, कार, स्मार्टफोनच्या किंमती १० टक्क्यांनी वाढणार
13
Kandivali Crime: कांदिवलीत गुंडांचा माज! कॉलर पकडली, वर्दी खेचत पोलिसांना मारहाण; कशामुळे झाला राडा?
14
सिडनी हल्ल्याला नवं वळण, पाकिस्तानी कनेक्शन आलं समोर; दहशतवादी बाप-लेकानं मिळून केला गोळीबार
15
'धुरंधर' अक्षय खन्नाच्या सावत्र आईची प्रतिक्रिया; म्हणाली, "मी कधीच त्याची आई झाले नाही कारण..."
16
काऊंटडाऊन सुरू, उरले १०३ दिवस! वैभव सुर्यवंशीला टीम इंडियात येण्यापासून कोणी रोखू शकणार नाही... कसे...
17
विद्यार्थ्यांना शारीरिक अन् मानसिक शिक्षा देण्यावर बंदी; शिक्षण विभागाने जारी केली नवी नियमावली
18
"वेदनेतून घेतलेला निर्णय, तुमच्या विश्वासाला..."; तेजस्वी घोसाळकरांचं शिवसैनिकांना भावनिक पत्र
19
आज एक चमकणारी एसयुव्ही लाँच होणार; इंटरनेट कनेक्टेड, मोठी टचस्क्रीन सह बरेच काही मिळणार...
20
Viral Video: लग्नाआधी तरुणी एक्स बॉयफ्रेंडला जाऊन भेटली, व्हिडीओ सोशल मीडिया तुफान व्हायरल; पण गोष्ट खरी आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

अयोध्येतील राम मंदिराच्या धर्तीवर सीता मंदिराचा जीर्णोद्धार; राळेगाव येथील सभेत देवेंद्र फडणवीस यांचं आश्वासन

By विशाल सोनटक्के | Updated: April 21, 2024 21:51 IST

देशातील एकमेव असलेल्या राळेगाव तालुक्यातील रावेरी येथील सीता मंदिराचा विकास करू, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी रात्री दिली. ते यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांच्या प्रचारार्थ राळेगाव येथे आयोजित सभेत ते बोलत होते. 

यवतमाळ : अयोध्येत राम मंदिराचा ज्याप्रमाणे जीर्णोद्धार झाला, त्याच धर्तीवर देशातील एकमेव असलेल्या राळेगाव तालुक्यातील रावेरी येथील सीता मंदिराचा विकास करू, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी रात्री दिली. ते यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांच्या प्रचारार्थ राळेगाव येथे आयोजित सभेत ते बोलत होते. कापूस, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना आज कमी भाव मिळाला असला, तरी पुढील काळात दरामधील तफावत भरून काढली जाईल. आचारसंहिता संपताच रक्कम त्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाईल. पुढील कार्यकाळ महिला बचत गटाचा राहील. महिलांचे बचतगट अधिक सक्षम करण्यासाठी देशातील महिलांना उद्योजक बनविण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न आहे. रेल्वे स्थानक, बसस्थानक आदी महत्त्वाच्या ठिकाणी महिलांच्या बचत गटांना उद्योगासाठी संधी दिली जाईल, असेही देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांचेही यावेळी भाषण झाले. महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांनी आपल्या भाषणात रावेरीतील सीता मंदिराचा जीर्णोद्धार केल्याशिवाय स्वस्थ बसणार नसल्याचे सांगितले. सभेचे प्रास्ताविक आमदार प्राचार्य डॉ. अशोक उईके यांनी केले, तर सूत्रसंचालन स्वप्नील राऊत यांनी केले. यावेळी खासदार हेमंत पाटील, आमदार डॉ. संदीप धुर्वे, रमेश अगरवाल, वसंत घुईखेडकर, तारेंद्र बोर्डे, हरिहर लिंगनवार, पराग पिंपळे, देवा चव्हाण, राजू उंबरकर, कीर्ती काकडे, चित्तरंजन कोल्हे, प्रफुल्ल चव्हाण, मनोज भोयर, डॉ. कुणाल भोयर, संतोष कोकुलवार, किशोर जुनुनकर आदी उपस्थित होते.माहेर अन् सासर दोन्ही घरे महिलांची राजश्री पाटील या बाहेरच्या नाहीत. त्यांचे माहेर यवतमाळ जिल्ह्यातील आहे. नेहमी माहेरवासीयांचे लक्ष आपल्या माहेरकडील लोकांकडे असते. त्यामुळे राजश्री पाटील यांचे लक्ष यवतमाळ जिल्ह्याकडे अधिक राहील, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीवर खरपूस टीका केली. आघाडीवाले बारामतीमध्ये सुनेला, तर यवतमाळमध्ये लेकीला बाहेरची म्हणतात, असे कसे चालेल. महिला उमेदवाराच्या बाबतीत माहेर आणि सासर असा भेद व्हायला नको, ही दोन्ही घरे तिचीच असल्याचेही त्यांनी सांगितले. उदय सामंत यांच्या कारची काच फुटलीराळेगाव येथील सभेसाठी उद्योगमंत्री उदय सामंत उपस्थित होते. सभा संपल्यानंतर ते आपल्या कारकडे गेले. त्यावेळी त्यांना त्यांच्या कारची काच फुटली असल्याचे लक्षात आले. हा प्रकार नेमका कोणी केला, याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.

टॅग्स :maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपा