शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठ्यांचे वादळ मुंबईत धडकले, 'एक मराठा लाख मराठा'च्या घोषणांनी वाशी टोल नाका दणाणला
2
Manoj Jarange Patil Morcha Update Live: मराठ्यांचं भगवं वादळ मुंबईत दाखल; हजारो आंदोलकांसोबत मनोज जरांगे आझाद मैदानाकडे
3
आजचे राशीभविष्य, २९ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, प्रवास संभवतो, गोड बोलून काम पूर्ण करू शकाल
4
२८०० वाहनांमधून आंदोलक मुंबईत १५ दिवसांचा शिधा घेऊन आलोय; गावनिहाय बांधव मुंबईत, गाडीत राहण्यासह जेवणाची सोय
5
गणेशमूर्ती अर्धवट सोडून पळालेल्या डोंबिवलीतील 'त्या' मूर्तिकाराला अखेर अटक
6
आज लोकसभेच्या निवडणुका झाल्यास कोण बाजी मारणार? भाजपा की काँग्रेस? सर्व्हेतून धक्कादायक आकडेवारी समोर  
7
जरांगेंच्यां आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आझाद मैदानावर १५०० हून अधिक पोलिसांची फौज
8
मोदींच्या आईबद्दल अवमानकारक भाषा, काँग्रेस बनला शिवीगाळ करणारा पक्ष; भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांची खरमरीत टीका
9
गुरुजींसाठी नवे वेळापत्रक; गुणवत्ता वाढवा; प्रशासकीय जबाबदाऱ्याही घ्या
10
आंदोलकांची नवी मुंबईत सोय आंदोलकांना मुंबई बाजार समितीचा आधार, दोन मार्केटमध्ये सुविधा, महिलांची स्वतंत्र सोय
11
शक्तिपीठ महामार्गाच्या वर्धा-सांगली टप्प्याला अखेर राज्य शासनाची मान्यता
12
भाजपचे डॅमेज कंट्रोल; फडणवीस यांच्या समर्थनार्थ लागले बॅनर
13
अमेरिकने कितीही दम दिला, तरी उत्पादनात भारताची झेप
14
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
15
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
16
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
17
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
18
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
19
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
20
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना

यवतमाळ जिल्ह्यातील वसंत साखर कारखान्याच्या संचालक मंडळाचा राजीनामा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2019 12:29 IST

सुमारे १२० कोटींचे कर्ज असलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील पोफाळी येथील वसंत सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाने राजीनामा दिला आहे. यामुळे सहकार क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देपुनर्गठनाचे शासन स्तरावर केलेले प्रयत्न निष्फळ

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : सुमारे १२० कोटींचे कर्ज असलेल्या उमरखेड तालुक्यातील पोफाळी येथील वसंत सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाने राजीनामा दिला आहे. यामुळे सहकार क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.पाच तालुक्यांत विस्तार असलेल्या पोफाळी येथील वसंत सहकारी साखर कारखान्याचे चाक मागील तीन हंगामापासून फिरले नाही. त्यामुळे सहकारी तत्वावर चालणारा विदर्भातील एकमेव साखर कारखाना ही वसंतची ओळख आता मिटली आहे. तीन वर्षांपूर्वी २०१६ मध्ये शेतकरी सभासदांनी सर्व राजकीय मतभेद बाजूला सारुन अविरोधपणे संचालक मंडळाची निवड केली होती. त्यानंतर कारखाना अध्यक्ष व माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. त्यांच्या जागी भाजपचे अ‍ॅड.माधवराव माने यांची वर्णी लागली होती. भाजप सहकार आघाडीचे जिल्हाध्यक्ष असल्याने अ‍ॅड.माने यांनी कारखान्याच्या भवितव्यासाठी अनेक प्रयत्न केले. सर्वपक्षीय संचालक मंडळाने देखील त्यांना सहकार्य केले. मात्र कारखाना सुरू होऊ शकला नाही.१२० कोटींपैकी बँकेच्या २० कोटींच्या कर्जाचे पुनर्गठन करण्यासाठी संचालक मंडळाने सहकार मंत्र्यांशीही चर्चा केली. मुंबईला जाऊन या कर्जाचे पुनर्गठन करण्याची मागणी केली. सहकार मंत्र्यांनी या कर्जमुक्तीचा प्रस्ताव पाठविण्याचे निर्देशही दिले होते. त्यानुसार कारखान्यातर्फे १५ ऑगस्ट रोजी कर्जमाफीचा प्रस्ताव शासनाकडे दाखल केला. मात्र त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाल्यामुळे आगामी हंगामात कारखाना सुरू होण्याच्या सर्व शक्यता मावळल्या. त्यामुळे कारखान्याचे अध्यक्ष अ‍ॅड.माधवराव माने, उपाध्यक्ष कृष्णा देवसरकर व सर्व संचालकांनी आपले राजीनामे कार्यकारी संचालक अरूण भालेराव यांच्याकडे सोपविले. आता कारखान्यावर प्रशासक मंडळाची नेमणूक होण्याची शक्यता आहे. कारखाना सुरू होणार नसल्याने त्याचे पडसाद या विधानसभा निवडणुकीत उमटण्याची शक्यता राजकीय गोटात वर्तविली जाते.युती सरकार शेतकरी विरोधी - मानेकारखान्याच्या कर्जाचे पुनर्गठन न करणारे राज्यातील भाजप-शिवसेनेचे युती सरकार शेतकरी विरोधी आहे, असा आरोप कारखान्याचे अध्यक्ष तथा भाजपच्या सहकार आघाडीचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. माधवराव माने यांनी करून भाजपला घरचा अहेर दिला आहे. सरकारच्या या निर्णयाने आम्ही हताश झालो अशी प्रतिक्रिया माने यांनी नोंदविली.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखाने