अर्चना धर्मे : राळेगाव येथे संस्काराचे मोती स्पर्धेचे बक्षीस वितरणराळेगाव : विद्यार्थ्यांनी शालेय अभ्यासक्रमासोबतच सहशालेय उपक्रम स्पर्धा परीक्षा, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा अशा विविध स्पर्धांमध्ये सहभागी होवून आपले व्यक्तिमत्त्व विकसित करा, असे मत न्यू एज्युकेशन सोसायटीच्या सचिव अर्चना भाऊरावजी धर्मे यांनी व्यक्त केले.लोकमत वृत्तपत्र समूहातर्फे घेण्यात आलेल्या संस्काराचे मोती स्पर्धेचे बक्षीस वितरण येथील न्यू इंग्लिश हायस्कूलमध्ये करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या. शाळेतील यशस्वी स्पर्धक अश्विनी अजय सावसाकळे, आस्था प्रफुल्ल कोरडे, नम्रता नंदकिशोर मसराम, सिद्धेश्वर गजानन दुमोरे, अंकित दादाराव डहाळकर, श्रृती बंडूजी शिवणकर, भाविक राजेशराव ठाकरे, प्रज्वल गणेश कुमरे, श्रावणी मोहन खारकर, निशा संतोषराव भोयर यांना प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात आले. प्रथम क्रमांकाचे बक्षीस गौरव रमेश चव्हाण, द्वितीय अवंतिका अतुल देशमुख तर तृतीय क्रमांकाचे बक्षीस पीयूष गजाननराव पिसे यांना देण्यात आले. यावेळी प्राचार्य बाळकृष्ण नहाते, पर्यवेक्षक सुरेंद्र ताठे, लोकमत तालुका प्रतिनिधी कैलास वर्मा आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
सहशालेय उपक्रमात सहभाग नोंदवा
By admin | Updated: April 18, 2017 00:16 IST