शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
2
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
3
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
4
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ
5
मिठी नदी धोका पातळीपर्यंत; रहिवाशांचा गोंधळ; गर्दी नियंत्रित करताना यंत्रणेच्या नाकीनऊ
6
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
7
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
8
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश
9
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
10
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
11
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
12
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
13
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
14
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
15
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
16
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
17
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
18
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
19
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
20
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली

वसुली व गळतीचे आव्हान

By admin | Updated: June 20, 2017 01:17 IST

कोट्यवधी रुपयांची थकबाकी वसूल करणे आणि वीजेची गळती रोखणे हे आपल्या पुढील मुख्य आव्हान असल्याचे ...

रामेश्वर माहुरे : थकबाकीमुळे वीज महावितरण अडचणीतलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोट्यवधी रुपयांची थकबाकी वसूल करणे आणि वीजेची गळती रोखणे हे आपल्या पुढील मुख्य आव्हान असल्याचे प्रतिपादन वीज वितरण कंपनीचे अधिक्षक अभियंता रामेश्वर माहुरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले. काही दिवसांपूर्वीच यवतमाळ वीज वितरण कार्यालयाच्या अधिक्षक अभियंता पदाची सुत्रे स्वीकारल्यानंतर माहुरे यांनी सर्वप्रथम विजेची दिवसेंदिवस वाढत चाललेली वसुली आटोक्यात आणण्याचे प्रयत्न आरंभिले असल्याचे ते म्हणाले. सर्वप्रथम जिल्ह्यातील घरगुती, व्यापारी आणि औद्योगिक वीज देयकांच्या वसुलीवर त्यांनी लक्ष केंद्रीत केले आहे. जिल्ह्यात एक लाख ८२ हजार ४०६ घरगुती वीज ग्राहकांकडे २० कोटी ७४ लाख ६ हजार ८९७ रुपये थकबाकी आहे. व्यापारी ग्राहक १२ हजार ६४४ असून त्यांच्याकडे चार कोटी ३६ लाख ९७ हजार रुपये थकबाकी आहे. तर औद्योगिक वीज ग्राहकांची संख्या २४८७ असून त्यांच्याकडे १ कोटी ३५ लाख आठ हजार १४४ रुपये थकबाकी आहे, या तीन प्रकारच्या वसुलीकडे लक्ष देणार असल्याचे ते म्हणाले. कृषी पंपाचीसुद्धा थकबाकी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आहे. ७२३ कोटी ७८ लाख २० हजार ८७६ रुपये कृषी पंपाची थकबाकी आहे. वसुली शिवाय वीज गळती कमी करण्याचेही मोठे आव्हान पुढील काळात महावितरणसमोर असणार आहे. सोबतच दिनदयाल उपाध्याय ग्रामज्योती व इंट्रिगेटेड पावर डेव्हलपमेंट स्किम या दोन महत्वाकांक्षी योजनांचेही काम सुरू झाले आहे. कृषीपंपाचेही हजारो अर्ज सध्या पेंडिग आहेत, या सर्व कामांना गती देण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे रामेश्वर माहुरे म्हणाले. विद्युत मीटरचा तुटवडा नाहीघरगुती ग्राहकांसाठी वीज मीटरचा कोणताही तुटवडा नाही. तसेच नवीन वीज जोडणी घेताना पोलवर चढून केबल जोडणी करणे आणि सबंधित व्यक्तीच्या घरात मीटर फिट करणे, ही सर्व जबाबदारी महावितरणच्या सबंधित लाईनमनचीच आहे. याबाबत कोणत्याही तक्रारी असल्यास त्या महावितरणच्या जिल्हा कार्यालयात कराव्या किंवा मुंबई मुख्यालयातील हेल्पपाईन नागरिकांसाठी जाहिर करण्यात आल्या आहेत, त्यावरसुद्धा या संदर्भातील तक्रारी कराव्या, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.