शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात सहा नवीन सहा खुल्या कारागृहांना मान्यता 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2018 13:57 IST

शिक्षा झालेल्या कैद्यांमध्ये परिवर्तन घडविण्यासाठी गृह विभागाकडून खुल्या कारागृहांची संकल्पना राबविली जात आहे. सध्या अशी १३ कारागृहे कार्यरत आहेत. आता नव्याने सहा खुल्या कारागृहांना मान्यता देण्यात आली आहे.

ठळक मुद्देयवतमाळ, वर्धा, धुळे, लातूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांचा समावेश

सुरेंद्र राऊत।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शिक्षा झालेल्या कैद्यांमध्ये परिवर्तन घडविण्यासाठी गृह विभागाकडून खुल्या कारागृहांची संकल्पना राबविली जात आहे. सध्या अशी १३ कारागृहे कार्यरत आहेत. आता नव्याने सहा खुल्या कारागृहांना मान्यता देण्यात आली आहे.गंभीर गुन्ह्यात शिक्षा झालेल्यांना सुधारण्याची एक संधी दिली जाते. शिक्षेच्या काळात गुन्हेगाराचे वर्तन बघून त्याला खुल्या कारागृहात हलविले जाते. या खुल्या कारागृहात कैद्याकडून विविध स्वरूपाचे व्यवसाय व दैनंदिन काम करून घेतले जाते. रात्रंदिवस कारागृहाच्या दगडी भिंतीत राहण्याऐवजी शिक्षा झालेल्या कैद्यांना त्यांच्या वर्तनावरून मोकळ्या जागेत काम दिले जाते. यातून अनेक सकारात्मक परिणाम पुढे आले आहे.सध्या राज्यात १३ खुले कारागृह आहे. आता गृह विभागाने सहा नवीन खुल्या कारागृहांना मान्यता दिली आहे. यात यवतमाळ, धुळे, वर्धा, लातूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा समावेश आहे. बहुतांश कारागृहाकडे स्वत:ची शेतजमीन आहे. या शेतजमिनीवर बंद्यांना मजुरीचे काम दिले जाते. काही कारागृहात उद्योगही उभारण्यात आले आहे. या उद्योगांमध्ये कामगार म्हणून त्यांचा वापर केला जातो. खुल्या कारागृहातून शासनाला दुहेरी उद्देश साध्य करता येतो. कैद्याकडून कामही करून घेतले जाते. त्यातून प्रशासनाला आर्थिक उत्पन्न मिळते. शिवाय खुल्या वातावरणात गुन्हेगाराचे मत परिवर्तन करण्यात यश प्राप्त होते. कैदी शिक्षा पूर्ण होऊन बाहेर पडल्यानंतर तो एक सामान्य नागरिक म्हणून जीवन जगू शकतो.यवतमाळात पाच एकर जमीन उपलब्धयवतमाळ कारागृहाकडे पाच एकर शेती शहराच्या मध्यभागी आहे. याठिकाणी किमान १५ कैद्यांना खुल्या कारागृहात ठेवणे शक्य आहे. शेतीसोबतच शेळी पालन किंवा इतर पूरक व्यवसाय याठिकाणी करता येऊ शकतो, तसा प्रस्ताव कारागृह अधीक्षक कीर्ती चिंतामणी यांनी गृह विभागाकडे दिला होता. त्याला मान्यता मिळाली आहे.

टॅग्स :jailतुरुंग