शासकीय योजना शेवटच्या घटकांपर्यंत पोहचवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 11:33 PM2018-01-17T23:33:16+5:302018-01-17T23:33:31+5:30

शासन आणि प्रशासन या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहे. शासनाने घेतलेल्या लोकोपयोगी निर्णयाची प्रशासनाने प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. तसेच या योजना शेवटच्या घटकांपर्यंत पोहचविण्याचे आवाहन पालकमंत्री मदन येरावार यांनी येथे केले.

Reach the government plan to the last element | शासकीय योजना शेवटच्या घटकांपर्यंत पोहचवा

शासकीय योजना शेवटच्या घटकांपर्यंत पोहचवा

Next
ठळक मुद्देमदन येरावार : पुसद येथे उपविभागीय आढावा बैठक, प्रभावी अंमलबजावणीचे प्रशासनाला निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्क
पुसद : शासन आणि प्रशासन या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहे. शासनाने घेतलेल्या लोकोपयोगी निर्णयाची प्रशासनाने प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. तसेच या योजना शेवटच्या घटकांपर्यंत पोहचविण्याचे आवाहन पालकमंत्री मदन येरावार यांनी येथे केले.
येथील उपविभागीय कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार मनोहरराव नाईक, उपविभागीय अधिकारी नितीनकुमार हिंगोले, तहसीलदार संजय गरकल, माजी राज्यमंत्री संजय देशमुख उपस्थित होते. पालकमंत्री येरावार म्हणाले, पुसद तालुका हा जिल्ह्यात सर्वात मोठा असल्याने येथे उद्दिष्टही मोठे आहे. पुसदचा परिणाम जिल्ह्यावर होत असतो. त्यासाठी अधिका-यांनी शासकीय नोकरीत नवनवीन कल्पना राबवाव्या व कामासाठी स्वत: पुढाकार घ्यावा, अशी सूचना त्यांनी केली. शासकीय, अनुदानित आश्रमशाळेत मुला-मुलींचे स्वतंत्र शौचालय, सॅनेटरी नॅपकीन मशीन, बायोमेट्रीक हजेरी मशीन, वॉटर फिल्टर या सुविधांचा अहवाल सादर करण्याचे त्यांनी निर्देश दिले. राहणार नाही, याची काळजी घ्यावी, नगर परिषदेने अपंगांच्या कल्याणासाठी तीन टक्के निधी राखून ठेवावा. त्यांच्यासाठी वेगळा कक्ष निर्माण करावा. तसेच अपंगांच्या याद्या अपडेट कराव्यात, असे सांगितले.
यावेळी आदिवासी विभाग, वनविभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, रस्ते विकास योजना, मागेल त्याला शेततळे, जलयुक्त शिवार, दलित वस्ती सुधार योजना, तांडा वस्ती सुधार योजना, अंगणवाडी इमारत, दिग्रस-दारव्हा-कारंजा महामार्ग भुसंपादन, पाणीटंचाई आदींचा आढावा घेतला. बैठकीला लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता स.म.निवल, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी राजीव चव्हाण, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.आशिष पवार, आदिवासी विभागाचे प्रकल्प अधिकारी इवनाथे उपस्थित होते.

Web Title: Reach the government plan to the last element

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.