शहरं
Join us  
Trending Stories
1
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
2
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
3
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
4
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
5
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
6
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
7
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
8
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
9
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
10
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
11
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
12
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
13
या ठिकाणी अचानक पडले ७०० मोठे खड्डे, जमिनीत गाडला जातोय संपूर्ण परिसर, कारण काय?
14
“साधूसंत झाडावर राहणार का? एक दिवस लोक सरकारला ‘चले जाव’ म्हणतील”; अण्णा हजारे संतापले
15
मैत्रिणींचा सोनमला वाचवण्याचा प्रयत्न? राजा रघुवंशीच्या भावाचा खळबळजनक आरोप
16
राहुल गांधींसोबतच्या बैठकीला शशी थरूर अनुपस्थित, चर्चांना उधाण, पक्षाने दिली अशी माहिती 
17
टाटा-हिंडाल्कोसह 'या' शेअर्समध्ये बंपर तेजी! बाजारात सलग दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांची चांदी
18
Numerology: एकसारखे नंबर वारंवार दिसणे केवळ योगायोग नाही, तर उज्ज्वल भविष्याचे शुभ संकेत!
19
अजबच! घटस्फोट झाला, पण पत्नीने ना पोटगी मागितली ना... , उलट लग्नातल्या बांगड्याही केल्या परत, कोर्टही अवाक्   
20
नवा सिक्सर किंग! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीचा कहर! १४ षटकार ठोकत मोडला १७ वर्षांपूर्वीचा जागतिक विक्रम
Daily Top 2Weekly Top 5

रेमंडची २५ वर्षे यवतमाळला समृद्ध करणारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2021 05:00 IST

तत्कालीन उद्योगमंत्री जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांचे यवतमाळमध्ये मोठे प्रकल्प यावेत, यासाठी प्रयत्न सुरू होते. मागासवर्गीय, आदिवासीबहुल असलेल्या या जिल्ह्यात या उद्योगामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळेल, याबरोबरच रोजगार निर्मितीही होईल, अशी बाबूजींची यामागे दूरदृष्टी होती. त्यांच्याच प्रयत्नातून यवतमाळ येथे उभारलेल्या औद्योगिक वसाहतीत १९९६ मध्ये इटालियन डेनिम मेजरच्या सहकार्याने अत्याधुनिक डेनिम फेब्रिक उत्पादन सुविधेसह हा मोठा प्रकल्प सुरू झाला.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : लांब धाग्याच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेल्या यवतमाळची पांढरे सोने पिकवणारा जिल्हा अशी राज्यभरात ओळख आहे. मात्र, विक्रमी कापूस उत्पादन होऊनही पूरक व्यवसाय नसल्याने शेतकऱ्यांना कवडीमोल भावाने कापूस विकावा लागत होता. २५ वर्षांपूर्वी रेमंड कंपनीने यवतमाळमध्ये पाऊल ठेवले. आज या उद्योगाद्वारे जवळपास तीन हजारांहून अधिक जणांना थेट रोजगार उपलब्ध झाला असून, या कंपनीमुळे यवतमाळच्या अर्थव्यवस्थेलाही बळकटी मिळाली आहे.विदर्भातील कोरडे हवामान आणि काळी कसदार जमीन कापसासाठी पोषक असल्याने या भागात मोठ्या प्रमाणात उत्पादन होते. यातही यवतमाळ जिल्ह्याचा वाटा मोठा आहे. त्यामुळे कापूसपूरक उद्योग जिल्ह्यात यावा, यासाठी तत्कालीन उद्योगमंत्री तथा पालकमंत्री जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी प्रयत्नशील होते. त्यांच्या पुढाकारातूनच यवतमाळ येथे औद्योगिक वसाहतीची उभारणी झाली. या वसाहतीत जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रयत्नातून ‘रेमंड’ हा पहिला मोठा उद्योग सुरू झाला. २५ वर्षांपूर्वी व्यवस्थापनासह अवघ्या ४०० कर्मचाऱ्यांवर सुरू झालेल्या या उद्योगात आज तीन हजारांहून अधिकजण थेट रोजगारात आहेत. तर कापूस उत्पादकांसह कित्येकपट अधिक लोकांना या प्रकल्पाचा अप्रत्यक्षपणे लाभ होत आहे. कापूस उत्पादक शेतकरी, कामगार, कर्मचाऱ्यांच्या बळावरच रेमंडने १९९६ मध्ये ८० लाख मीटरवर असलेली कापड उत्पादन क्षमता आज चार कोटी २० लाख मीटरवर पोहोचवली आहे. विशेष म्हणजे, यातील ६० टक्के उत्पादन निर्यात केले जाते. आज रेमंड सर्वोत्तम श्रेणीतील डेनिम उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. याच  कंपनीने भारतात सर्वप्रथम रिंग डेनिम सुरू केली. सध्या ती जगभरातील अग्रगण्य जीन्स ब्रँडना सेवा देते. ही बाबही यवतमाळसाठी गाैरवास्पद आहे. मध्यंतरीच्या काळात कामगार युनियनच्या संपामुळे यवतमाळातील ओरिएंट सिन्टेक्स आणि हिंदुस्तान लिवर हे उद्योग बंद पडले. त्यामुळे हजारो तरुणांना बेरोजगार व्हावे लागले. असाच संप रेमंडमध्येही करण्याचा प्रयत्न झाला. मात्र, रेमंड बंद पडल्यास अनेकांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण होईल, हे लक्षात आणून दिल्यानंतर तोडगा निघाला आणि रेमंडचा प्रवास पूर्ववत सुरू राहिला.एकूणच रेमंडचा मागील २५ वर्षांचा इतिहास या भागाला समृद्ध करणारा आहे. स्थानिक उपलब्ध साधनसामुग्रीचा योग्य वापर केल्यास संबंधित भागाच्या विकासाला दिशा देता येऊ शकते. उद्योगाच्या माध्यमातून शेतकरी, कामगार, कर्मचाऱ्यांचे आयुष्य फुलवता येऊ शकते, हे रेमंडने यवतमाळमध्ये सिद्ध करून दाखवले आहे. आगामी काळातही हा उद्योग समूह या भागाच्या विकासाला नव्या उंचीवर घेऊन जाण्याची साक्ष     मिळते.राज्यात ३८ लाख क्विंटलहून अधिक कापसाचे उत्पादन होते. त्यात यवतमाळचा वाटा मोठा आहे. आज ही कंपनी दरवर्षी एक लाख २५ हजारहून अधिक कापूसगाठी वापरते. यातील बहुतांश कापूस हा यवतमाळात स्थानिक स्तरावर खरेदी केला जातो. त्यामुळे शेतकऱ्यांनाही मोठा आधार मिळाला आहे. दुसरीकडे रेमंडने उत्पादन वाढवतानाच उद्योगाला आधुनिकतेची जोड दिली आहे. यूसीओची शाश्वत डेनिम श्रेणी ‘द ग्रीन लाईन’ तयार केली असून, कमी पाणी आणि मीठमुक्त डाईंगसारख्या कमी प्रभावी डाईंग तंत्राचा वापर करण्यासाठी व्हर्जिन कच्च्या मालाचा वापर कमी करण्यावर या श्रेणीचा भर आहे. हे उत्पादन तरुणाईला आकर्षित करत आहे.

एमआयडीसीतील पहिला मोठा प्रकल्प ठरला ‘रेमंड’तत्कालीन उद्योगमंत्री जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांचे यवतमाळमध्ये मोठे प्रकल्प यावेत, यासाठी प्रयत्न सुरू होते. मागासवर्गीय, आदिवासीबहुल असलेल्या या जिल्ह्यात या उद्योगामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळेल, याबरोबरच रोजगार निर्मितीही होईल, अशी बाबूजींची यामागे दूरदृष्टी होती. त्यांच्याच प्रयत्नातून यवतमाळ येथे उभारलेल्या औद्योगिक वसाहतीत १९९६ मध्ये इटालियन डेनिम मेजरच्या सहकार्याने अत्याधुनिक डेनिम फेब्रिक उत्पादन सुविधेसह हा मोठा प्रकल्प सुरू झाला. त्यानंतर २००६ मध्ये रेमंडने बेल्जियम डेनिम प्रमुखसह संयुक्त उपक्रम हाती घेत जगभरात आपले उत्पादन पोहोचविण्यास सुरुवात केली. पुढे रेमंडचे गाैतम सिंघानिया यांच्याशी असलेल्या ऋणानुबंधातून तत्कालीन राज्यसभा सदस्य तथा लोकमत एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा यांनी रेमंडने यवतमाळात वाढीव उत्पादन घ्यावा असा आग्रह धरला आणि त्यानुसार गाैतम सिंघानिया यांनी यवतमाळातील उद्योगाचा विस्तार केला. आज या उद्योगामुळे हजारो कुटुंबीयांना हक्काची रोजीरोटी मिळाली असून, शेतकऱ्यांच्या कापसालाही बाजारपेठ उपलब्ध झाली आहे. 

पर्यावरण सुरक्षेतही रेमंडचे नाणे खणखणीत- मागील चार वर्षांमध्ये रेमंडने ताज्या पाण्याचा वापरही सुमारे ४० टक्क्याने कमी केला आहे. कारखाना परिसरात ७५ हजाराहून अधिक वृक्षांची लागवड करण्यात आली. कार्बन फुटप्रिंट कमी करण्याचा हा प्रयत्न आहे. त्यामुळेच गेल्या तीन वर्षात ६५ मेट्रिक टन ग्रीन हाऊस गॅस उत्सर्जन कमी होऊ शकले. या सर्व उपक्रमांची राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरही दखल घेण्यात आली. केंद्र सरकारचा राष्ट्रीय जल अभियान, पर्यावरण व्यवस्थापनासाठी राज्य प्रदूषण मंडळाच्या पुरस्कारासह पर्यावरण उत्कृष्टतेसाठी दिला जाणारा सुवर्ण मयुर पुरस्कारही कंपनीने तब्बल चारवेळा मिळविला आहे. आज रजत जयंती महोत्सव सोहळा- रेमंडच्या २५ वर्षांनिमित्त शनिवार, २३ ऑक्टोबर रोजी रेमंड इको डेनिम प्रा. लि. गेस्ट हाऊस, लोहारा येथे दुपारी २ वाजता रजत जयंती महोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. लोकमत एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन, राज्यसभेचे माजी सदस्य विजय दर्डा, रेमंडचे गाैतम सिंघानिया यांची यावेळी प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

 

टॅग्स :Jawaharlal Dardaजवाहरलाल दर्डाRaymondरेमंड