शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

रेशनच्या तांदळावर होते घातक केमिकलची प्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2021 05:00 IST

काल्याने अवैधपणे थाटलेल्या राईस मिलमध्ये घातक प्रयोग केले जातात. हा तांदूळ प्रक्रिया करून गोंदियाला पाठविण्यात येतो. तेथे त्याची भेसळ होते. वाहनांवर कारवाई होऊ नये यासाठी कागदोपत्री सोपस्कार पूर्ण केले जातात. वर्धेतही नागपूर बायपासवर काल्याने गोदाम थाटले आहे. तेथे वर्धा तालुक्यातील रेशनचा तांदूळ गोळा केला जातो. वाहतुकीसाठी गोंदिया येथील राईस मिलचे बिल सोबत बाळगले जाते. काल्याने या व्यवसायात स्वत:सोबतच भाच्यांनाही उतरविले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शहरातील रेशनच्या दुकानातून तांदूळ खरेदी करुन काळ्या बाजारात त्याची विक्री केली जाते. हा तांदूळ जमा करण्यासाठी रेशन माफिया काल्याने दोन दहाचाकी ट्रक, दोन मेटॅडोअर, बोलेरो पीकअप अशी वाहने खरेदी केली आहे. शहरात त्याच्या पंटरने जमा केलेला तांदूळ थेट प्रक्रियेसाठी नेला जातो. या तांदळावर घातक रसायनाचा प्रयोग करण्यात येतो जेणे करून हा तांदूळ चांगल्या दर्जाच्या तांदळात भेसळ करण्यासाठी याचा वापर होतो. यातून मोठी आर्थिक रसद रेशन माफियाला मिळत आहे. काल्या या काळ्या धंद्यातील एक कडी आहे. त्याच्या मागचे नेटवर्क बरेच मोठे असून तो प्रशासकीय यंत्रणेलाही जुमानत नसल्याची भाषा उघडपणे बोलतो. काल्याने अवैधपणे थाटलेल्या राईस मिलमध्ये घातक प्रयोग केले जातात. हा तांदूळ प्रक्रिया करून गोंदियाला पाठविण्यात येतो. तेथे त्याची भेसळ होते. वाहनांवर कारवाई होऊ नये यासाठी कागदोपत्री सोपस्कार पूर्ण केले जातात. वर्धेतही नागपूर बायपासवर काल्याने गोदाम थाटले आहे. तेथे वर्धा तालुक्यातील रेशनचा तांदूळ गोळा केला जातो. वाहतुकीसाठी गोंदिया येथील राईस मिलचे बिल सोबत बाळगले जाते. काल्याने या व्यवसायात स्वत:सोबतच भाच्यांनाही उतरविले आहे. स्थानिक यंत्रणेला दावणीला लावल्याने त्याला कुणाचीही भीती नाही. रेशनच्या तांदळाचा काळ्या बाजार करणाऱ्याला अभय देणारी यंत्रणा स्वत:चाच घात करीत आहे. घातक रसायन लावलेले तांदूळ सुगंधित म्हणून भेसळ केले जाते. हा तांदूळ अनावधानाने आपणही सेवन करतो. त्यातील फरक ओळखता येत नाही. समाजाच्या स्वास्थ्यासाठी रेशनच्या तांदुळाचा काळा बाजार थांबणे गरजेचे झाले आहे. घातक रसायनामुळे कॅन्सरसारखे दुर्धर आजार सातत्याने वाढत आहे. त्याला रेशनचा तांदळाचा काळा बाजार व त्याची होणारी भेसळ हेही पूरक ठरत आहे. 

काळ्या बाजाराचे कनेक्शन गुजरातपर्यंत- रेशनचा काळा तांदूळ मिसळ करून त्याचे ट्रक गुजरातपर्यंत पाठविले जातात. मध्यंतरी या प्रकरणात एक ट्रक परस्पर विकल्या गेला हेाता. तांदळाचा काळा बाजार फोफावत असून त्यामध्ये रेशनचा तांदूळ स्वस्त दरात उपलब्ध होत असल्याने तो विविध राज्यांमध्ये भेसळ करून पाठविला जातो. याचाही शोध घेणे गरजेचे झाले आहे. 

काल्याचा करवीता धनी कोण ?- संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा मॅनेज करण्यात काल्याला कुणाची साथ लाभते हे खरी शोधण्याची गरज आहे. काल्याचा करवीता धनी कोण हे रेकॉर्डवर आल्यावरच रेशनच्या काळ्या बाजाराचा चिठ्ठाबट्टा बाहेर येणार आहे. यवतमाळ शहराच्या बायपास परिसरात वाहनातून रेशनचा तांदूळ उतरवून माफियाच्या वाहनांमध्ये भरला जातो. यावर नियंत्रण आणणे आवश्यक आहे.

 

टॅग्स :Healthआरोग्यmafiaमाफिया