शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
2
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
3
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
4
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
5
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
6
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
7
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
8
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
9
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
10
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
11
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
13
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
14
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
15
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
16
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
17
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
18
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
19
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
20
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन

रानडुकरांची वनखात्यालाही डोकेदुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2019 00:16 IST

झुडपी जंगल आणि वेकोलिच्या खाणी, यामुळे लपण्यासाठी पुरेशी सुरक्षित जागा असल्याने या भागात रानडुकरांची संख्या झपाट्याने वाढत आहे. याचा सर्वाधिक उपद्रव शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. सोबतच डुकरांची वाढती संख्या वनविभागासाठीदेखिल मनस्ताप देणारी ठरत आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांना लाखोंचा फटका : कायद्याची किचकट प्रक्रिया ठरते बंदोबस्तात अडसर

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : झुडपी जंगल आणि वेकोलिच्या खाणी, यामुळे लपण्यासाठी पुरेशी सुरक्षित जागा असल्याने या भागात रानडुकरांची संख्या झपाट्याने वाढत आहे. याचा सर्वाधिक उपद्रव शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. सोबतच डुकरांची वाढती संख्या वनविभागासाठीदेखिल मनस्ताप देणारी ठरत आहे.कायद्याच्या किचकट प्रक्रियेमुळे शेतकऱ्यांना रानडुकरांचा बंदोबस्त करता येत नाही. रानडुकरांना शूट करण्याचे आदेश देण्याचा अधिकार केवळ आरएफओला आहे. परवानगी न घेता डुकराला ठार मारल्यास शेतकऱ्यांना कारवाईला सामोरे जावे लागते. परवानगी घेतल्यानंतरही शस्त्र परवानाधारकाकडूनच रानडुकरांना ठार मारता येते. तत्पूर्वी रानडुकरांमुळे होणोर नुकसान शेतकऱ्यांना वनविभागापुढे सिद्ध करावे लागते. या साऱ्या प्रक्रियेनंतर वनविभाग रानडुकरांना ठार मारण्याची परवानगी बहाल करतो.अलीकडे वणी परिसरात रानडुकरांची संख्या झपाट्याने वाढत असून शेतपिकांमध्ये या रानडुकरांचा प्रचंड धुमाकूळ सुरू आहे. सध्या तुरीची कापणी सुरू असून रात्रीच्यावेळी रानडुकरांचे कळप शेतात शिरून तुरीच्या गंजी उद्ध्वस्त करित आहे. खाणे कमी आणि नुकसानच जास्त, असा प्रकार सुरू आहे. यामुळे शेतकरी कमालीचे वैतागले आहे. रानडुकरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकºयांकडून सातत्याने केली जाते. पण वनविभागाच्या पातळीवर कोणतीही कारवाई केली जात नाही. रानडुकरांचा बंदोबस्त शेतकऱ्यांनी परवानगी घेऊन स्वबळावर करावा, असा कायदा म्हणतो.रानडुक्कर हे शेड्युल्ड तीनमध्ये येतात. त्यामुळे कायद्याने रानडुकरांना संरक्षण दिले आहे. जास्तच उपद्रव होत असेल, तर वनविभागाने रानडुकरांना ठार मारण्याची परवानगी देतो. शेतकरी आपापल्या पातळीवर रानडुकरांचा बंदोबस्त करतात. पिकाच्या सभोवताल छोटेखानी ताराचे कुंपण करून त्यात बॅटरीद्वारे करंट सोडला जातो. मात्र अलिकडे या उपाययोजनेलाही रानडुकरे जुमानत नसल्याचे चित्र दिसत आहे. या कुंपणाची उंची कमी राहत असल्याने रानडुकरांची पिले ताराखालून तर मोठी डुकरे तारांवर उडी मारून शेतात शिरतात. अनेक शेतकरी थिमेटचाही वापर करतात. मात्र सरावलेली ही रानडुकरे थिमेटकडेही दुर्लक्ष करून पिकांचे नुकसान करित आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.आठ वर्षांपूर्वी आणला होता हैदराबादवरून शूटरवणी परिसरातील रानडुकरांची संख्या लक्षात घेता, आठ वर्षांपूर्वी या डुकरांचा बंदोबस्त करण्यासाठी हैदराबादवरून शार्प शूटर आणण्यात आला होता. काही दिवस या शुटरने रानडुकरांना मारलेही. मात्र डुकरांची संख्या पाहून वैतागलेला हा शार्प शूटर काही दिवसातच परत गेला.

टॅग्स :forest departmentवनविभागwildlifeवन्यजीव