शहरं
Join us  
Trending Stories
1
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
2
आजचे राशीभविष्य- ४ ऑक्टोबर २०२५: पैशांच्या गुंतवणुकीवर लक्ष द्या, कमी वेळात जास्त लाभ घेण्याची लालसा सोडा
3
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
4
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
5
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
6
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
7
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
8
नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचेच नाव; नामकरणासाठी पंतप्रधान मोदी सकारात्मक : मुख्यमंत्री 
9
अमेरिकेच्या टॅरिफ संकटात भारतासह युरोपियन देशांची भूमिका मोलाची; स्वेन ओस्टबर्ग यांचे मत
10
संपादकीय : आता खरी लढाई! मेळावे झाले, घोषणा झाल्या... आता सीमोल्लंघन कधी?
11
पाणंद रस्ते मोकळे करा,  तरच मिळेल सरकारी लाभ; प्रस्ताव विचाराधीन
12
सोमवारपासून परतीच्या सरी; चक्रीवादळ 'शक्ती'मुळे महाराष्ट्रात पुन्हा पाऊस? हवामान खात्याचा नेमका अंदाज काय?
13
डोनाल्ड ट्रम्प आता सिनेमावाल्यांवर का भडकले?
14
मनोज जरांगेंचा १९९४ च्या जी. आर. विरोधात एल्गार! 'या' दोन मोठ्या जातींच्या आरक्षणावर बोलले
15
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
16
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
17
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
18
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
19
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
20
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश

पावसामुळे पणन महासंघाला अडीचशे कोटींचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2020 12:41 IST

राज्यभरातील ८५ केंद्र आणि १७० जिनिंग फॅक्टरीमध्ये या कापसाची खरेदी करण्यात आली. राज्यात अनेक केंद्रांवर कापूस खरेदीसाठी ताण वाढला. काही ठिकाणी दबावही आला. अशात उघड्यावर पडलेला कापूस, रूईगाठी आणि सरकीचे अडीचशे कोटींचे नुकसान झाले.

ठळक मुद्दे अध्यक्षांची यवतमाळात माहिती ५०० कोटींचे चुकारे अडले३० जूनपर्यंत १५ लाख क्ंिवटल कापूस खरेदीचे आव्हान

रूपेश उत्तरवार ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : मान्सूनपूर्व पावसाच्या हजेरीने पणन महासंघाचा अडीचशे कोटी रुपयांचा कापूस ओला झाला. यामध्ये रुईगाठी आणि सरकीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या स्थितीत ३० जूनपर्यंत आणखी १५ लाख क्विंटल कापूस खरेदी करण्याचे आव्हान उभे आहे, अशी माहिती पणन महासंघाचे अध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांनी दिली.ते येथील जिल्हाधिकारी कार्यालयात एका बैठकीसाठी आले असता ‘लोकमत’शी बोलत होते. अध्यक्ष देशमुख म्हणाले, पणन महासंघाने आतापर्यंत राज्यभरात ७४ लाख क्विंटल कापसाची खरेदी केली असून १५ लाख गाठी तयार केल्या आहेत. राज्यभरातील ८५ केंद्र आणि १७० जिनिंग फॅक्टरीमध्ये या कापसाची खरेदी करण्यात आली. राज्यात अनेक केंद्रांवर कापूस खरेदीसाठी ताण वाढला. काही ठिकाणी दबावही आला. अशात उघड्यावर पडलेला कापूस, रूईगाठी आणि सरकीचे अडीचशे कोटींचे नुकसान झाले.

४० लाख क्विंटल कापूस विक्रीसाठी पडूनसंपूर्ण राज्यभरात एक लाख ४७ हजार शेतकऱ्यांनी कापूस विक्रीसाठी पणन महासंघाकडे नोंद केली आहे. या शेतकऱ्यांकडे ४० लाख क्विंटल कापूस आजच्या घडीला विक्रीसाठी पडून आहे. यातील किमान १५ लाख क्विंटल कापूस एफएक्यू दर्जाचा असल्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला. हा कापूस खरेदी करण्यासाठी ३० जूनपर्यंतचे नियोजन आहे.

पणनला तारीख वाढवावी लागणारनिर्धारित कालावधीमध्ये हा कापूस खरेदी होणे अशक्य आहे. यामुळे पणनला आणखी तारीख वाढवावी लागणार आहे. राज्यभरात आतापर्यंत चार हजार कोटी रुपयांचा कापूस खरेदी झाला. तर साडेतीन हजार कोटी रुपयांचे चुकारे शेतकऱ्यांना अदा करण्यात आले.अद्याप ५०० कोटी रुपयांचे चुकारे बाकी आहे. याकरिता ८० कोटी रुपयांची तरतूद पणन महासंघाने केली. लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे वळते होतील, असेही राजाभाऊ देशमुख यांनी स्पष्ट केले.

पणनची पाचशे रूपये दरवाढीची मागणीकेंद्र शासनाने कापसाचे हमी दर नुकतेच जाहीर केले आहे. गतवर्षीच्या दरापेक्षा त्यामध्ये २६० रुपयांची वाढ केली आहे. लांब धाग्याच्या कापसाला यामुळे ५८१० रुपये क्विंटलचा दर मिळणार आहे. तर आखुड धाग्याच्या कापसाला ५६०० रुपयांचा दर राहणार आहे. हे दर शेतकऱ्यांना परवडणारे नाही. यामुळे पणन महासंघाने ५०० रुपये क्ंिवटल दरवाढ करण्याची शिफारस करणार आहे.

दहा टक्के नोंदणी संशयास्पदराज्यभरात एक लाख ४७ हजार शेतकऱ्यांकडे कापूस पडून असल्याचे सांगितले जाते. त्याचे वास्तव जाणून घेण्यासाठी घरोघरी सर्वेक्षण पार पडले. यावेळी नोंदणी झालेल्या कापसापैकी १० टक्के नोंदणी संशयास्पद आढळल्या असल्याचेही देशमुख यांनी सांगितले.

टॅग्स :cottonकापूस