शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

पुसदच्या ३० गावांतून रेल्वे ट्रॅक

By admin | Updated: July 12, 2017 01:07 IST

शेतकरी आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्याच्या विकासात मैलाचा दगड ठरणाऱ्या वर्धा-यवतमाळ-नांदेड हा रेल्वे प्रकल्प

उपविभाग : वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे, भूसंपादनाचा १४ जुलैपासून मोबदला प्रकाश लामणे । लोकमत न्यूज नेटवर्क पुसद : शेतकरी आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्याच्या विकासात मैलाचा दगड ठरणाऱ्या वर्धा-यवतमाळ-नांदेड हा रेल्वे प्रकल्प पुसद उपविभागातील ३० गावांमधून जाणार आहे. त्यासाठी ४३७.७७ हेक्टर आर. जमिनीचे अधिग्रहण करण्यात आले असून, येत्या १४ जुलैपासून मोबदला वाटपास सुरूवात होणार असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी नितीनकुमार हिंगोले यांनी दिली. लोकमतच्या एडिटोरीयल बोर्डचे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा यांच्या परिश्रमातून वर्धा-यवतमाळ-नांदेड हा रेल्वे प्रकल्प साकारला जात आहे. २७० किलोमीटर लांबीच्या या प्रकल्पाला २००७ साली मान्यता मिळाली होती. यवतमाळ येथे तत्कालिन रेल्वे मंत्री लालूप्रसाद यादव यांच्या हस्ते २००९ मध्ये या रेल्वे प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले होते. केंद्राचा ६० टक्के तर राज्याचा ४० टक्के वाटा या प्रकल्पात आहे. महत्वाकांक्षी रेल्वे प्रकल्पांतर्गत यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस आणि पुसद तालुक्यातील सर्वाधिक ३० गावांमधून हा रेल्वे प्रकल्प जाणार आहे. एक हजार ४६७ शेतकऱ्यांची ४३७.७७ हेक्टर आर. जमीन अधिग्रहित करण्यात येत आहे. पुसद उपविभागात रेल्वेची लांबी ५८.३१ किलोमीटर आहे. येत्या आॅगस्टपर्यंत यावर सुनावनी पूर्ण होईल तर चार गावातील जमिनींचा प्रारूप निवाडा तयार करून जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आला. एका गावातील जमिनीचे सिमांकन झाले नसल्याने संयुक्त मोजणीसाठी प्रलंबित आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी दोन गावच्या प्रारूप निवाड्यास मंजूरी दिली असल्याने तेथील शेतकऱ्यांना त्यांच्या अधिग्रहित जमिनीचा मोबदला येत्या आठ दिवसात दिला जाणार असल्याचे रेल्वे भूसंपादन अधिकारी तथा पुसदचे उपविभागीय अधिकारी नितीनकुमार हिंगोले यांनी सांगितले. या महत्वाकांक्षी रेल्वे प्रकल्पामुळे वर्धा आणि नांदेड ही दोन शहरे जोडली जाणार असल्याने यवतमाळ जिल्ह्याच्या विकासाला गती मिळणार आहे. अशी आहेत रेल्वेमार्गात येणारी गावे $$्रिपुसद तालुक्यातील भूसंपादन होणाऱ्या गावांमधून पुसद खंड -२, बेलगव्हाण, कोप्रा बु., चिलवाडी, मोहा ई., लोणी, हर्षी, खर्षी, बिबी, शेलू बु., ज्योतीनगर, कृष्णनगर, वरवट, शिवानगर, शिळोणा, बाळवाडी, वेणी खु. आदी १७ गावे तर दिग्रस तालुक्यातील भूसंपादन होणाऱ्या गावांमध्ये साखरा, नांदगव्हाण, दोनद, दिग्रस, गांधीनगर, सिंगद, वसंतपूर, सेवानगर, रुई तलाव, काटी, रामनगर, ईसापूर, हरसूल आदी १३ गावांचा समावेश आहे. एकूण ३० गावांपैकी २३ गावांमध्ये भूसंपादन सुनावनीसाठी शेतकऱ्यांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत.