शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा-शिवसेनेचा दिग्रस येथे राडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2019 22:07 IST

भाजपा-शिवेसेनेचे पक्षश्रेष्ठी युती करून निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी सज्ज झालेले असताना, दिग्रसमध्ये मात्र या दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी एकमेकांविरुद्ध प्रचंड राडेबाजी केली. पुलाच्या लोकार्पणावरून चक्क सेनेचे महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांच्यासमक्ष हा राडा झाला.

ठळक मुद्देपुलाचा वाद: काळे झेंडे दाखवत घोषणाबाजी

लोकमत न्यूज नेटवर्कदिग्रस : भाजपा-शिवेसेनेचे पक्षश्रेष्ठी युती करून निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी सज्ज झालेले असताना, दिग्रसमध्ये मात्र या दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी एकमेकांविरुद्ध प्रचंड राडेबाजी केली. पुलाच्या लोकार्पणावरून चक्क सेनेचे महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांच्यासमक्ष हा राडा झाला. ना. राठोड यांना भाजपा कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवून घोषणाबाजीही केल्याने तणाव निर्माण झाला होता.दिग्रस-पुसद मार्गावरील बहुप्रतीक्षित पुलाचे बांधकाम नुकतेच पूर्ण झाले. त्याच्या लोकार्पण सोहळ्याच्या पत्रिका शहरात वाटण्यास सुरुवात होताच राजकीय पुढाऱ्यांमध्ये कुजबूज सुरू झाली. कारण पत्रिकेवर ना. सजंय राठोड यांच्या व्यतिरिक्त पालकमंत्री मदन येरावार, खासदार भावना गवळी व दिग्रसच्या नगराध्यक्ष सदफजहा जावेद पहेलवान यांच्यापैकी कोणाचीच नावे नव्हती. एवढेच नव्हेतर ‘विनित’ म्हणूनही सार्वजनिक बांधकाम विभागाऐवजी शिवसेना व शिवसेनेच्या इतर शाखांची नावे होती. त्यामुळे हा पूल शासकीय निधीतून झाला की शिवसेनेने बांधला, असा प्रश्न करत नगराध्यक्षासह विरोधी नगरसेवकांनी सायंकाळी शंकर टॉकीजसमोर प्रचंड राडा केला.ना. संजय राठोड येताच त्यांचे वाहन थांबविण्याचा प्रयत्न करण्यात आला. काळे झेंडे दाखवत त्यांच्या व शिवसेनेच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. शिवसेना व भाजपाचे कार्यकर्ते समोरासमोर आल्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे पुढील अनर्थ टळला, अशी चर्चा आहे. ना. राठोड यांना ठरल्यानुसार शहीद भगतसिंग यांच्या पुतळ्याचे पूजन करायचे होते. पण या राड्यामुळे त्यांना थेट लोकार्पण सोहळ्याकड़े जावे लागले. नगराध्यक्ष सदफजहा, माजी नगराध्यक्ष व भाजपचे शहराध्यक्ष रवींद्र अरगडे, विविध कार्यकारी संस्थेचे सभापती बाबूसिंग जाधव, नगरसेवक जावेद पहेलवान, रुस्तम पप्पूवाले, सैयद अकरम, भाजपचे बबलू ओसवाल, प्रज्योत अरगडे, विजय सरदार, साहील जयसवाल, मनीष मुनी, विजय अंबुरे, शिल्पा खंडारे, डॉ. अजय शिंदे, प्रशांत गौरकर, हरीश सांखला यांच्यासह माजी मंत्री संजय देशमुख यांचे समर्थक व भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.नेत्यांची युती, कार्यकर्त्यांचे काय?भाजप-सेनेत नुकतीच राष्ट्रीय स्तरावर युती झाली. मात्र, दिग्रसमध्ये युतीच्या घोषणेच्या दुसऱ्याच दिवशी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. ते पाहता, ही फक्त नेत्यांमधील युती असून जोपर्यंत कार्यकर्त्यांची दिलजमाई होत नाही, तोपर्यंत युतीचे देऊळ पाण्यातच राहणार असल्याचे दिसते.

टॅग्स :BJPभाजपाShiv Senaशिवसेना