शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिका रिटर्न नवरदेवासह नवरीला केले क्वॉरंटाईन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2020 06:00 IST

अमेरिकेतील बोस्टन प्रांतात नोकरीला असलेल्या वराचा विवाह यवतमाळात गुपचूप पार पडला. त्याने यासंदर्भात जिल्हा प्रशासनाला माहिती दिली नव्हती. आरोग्य विभागाच्या पथकाने शुक्रवारी या कुटुंबाकडे भेट दिली. विदेशातून आलेल्या वराला आणि वधूला होम क्वारंटाईन करण्यात आले, अशी माहिती जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी दिली.

ठळक मुद्देतेलंगणा सीमेवर जिल्हाधिकाऱ्यांची पाहणी : कोरोना रोखण्यासाठी आता केशकर्तनालय, प्रवासी वाहतुकीवरही निर्बंध

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : विदेशातून येऊन जिल्हा प्रशासनाला सूचना न देता यवतमाळात लग्न करणाºया एका वरासह वधूला शुक्रवारी आरोग्य यंत्रणेने क्वारंटाईन केले. जिल्ह्यातील कोरोना प्रतिबंधासाठी सुरू असलेल्या उपाययोजना आणखी कठोर करण्यात आल्या आहेत. सील केलेल्या तेलंगणा सीमेवर प्रवाशांची तपासणी कशी सुरू आहे, याची शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांनी स्वत: पाहणी केली.दरम्यान, जिल्ह्यात होम क्वारंटाईन केलेल्या कोरोना संशयितांची संख्या १३० वर पोहोचली आहे. विलगीकरण कक्षातील दोघांची सुटका झाली असली तरी त्यांना पुढील १४ दिवस क्वारंटाईन ठेवण्यात आले आहे. तीन पॉझिटिव्ह रूग्णांवर उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले.अमेरिकेतील बोस्टन प्रांतात नोकरीला असलेल्या वराचा विवाह यवतमाळात गुपचूप पार पडला. त्याने यासंदर्भात जिल्हा प्रशासनाला माहिती दिली नव्हती. आरोग्य विभागाच्या पथकाने शुक्रवारी या कुटुंबाकडे भेट दिली. विदेशातून आलेल्या वराला आणि वधूला होम क्वारंटाईन करण्यात आले, अशी माहिती जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी दिली. तेलंगणा सीमा सील करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. शुक्रवारी या ठिकाणी वाहनांची तापासणी करण्यात आली. जिल्हाधिकाºयांनी स्वत: या ठिकाणी जाऊन पाहणी केली.संसर्ग टाळण्यासाठी शुक्रवारी जिल्ह्यातील केश कर्तनालय, गेम पार्लर, मनोरंजन केंद्र ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. यासोबतच मंदिर, मशिद, गुरूद्वारा, गिरीजाघर, बुद्धविहार आणि इतर धार्मिक ठिकाणी पाचपेक्षा अधिक नागरीक एकत्र जमण्यास मनाई करण्यात आली आहे. हॉटेल, ढाबा, बेकरी, स्विट मार्ट, चाट भंडार या ठिकाणी गर्दी न करण्याचे आदेश आहे. दोन टेबलमधील अंतर तीन फुट असावे. एका टेबलवर दोन ते तीन जणांचीच व्यवस्था करण्याच्या सूचना आहेत. हॉटेलमध्ये सॅनिटायझर, साबन अथवा हँडवॉश ठेवण्याच्या सूचना आहेत. जिल्ह्यातील बँक, पोस्ट आॅफिसमध्ये प्रवेशद्वारावर सुरक्षारक्षक नेमण्याच्या सूचना आहेत. कामकाज चालू असलेल्या ठिकाणी एकावेळी एकच ग्राहक येण्याच्या सूचना आहेत. सर्व खासगी वाहने, ट्रॅव्हल्समध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशांना नेऊ नये अशा सूचना आहेत. त्याचप्रमाणे प्रवाशांमध्ये सुरक्षित अंतर ठेवण्याचे आदेश आहेत. परदेशातून आलेल्यांनी स्वत:हून नियंत्रण कक्षाला माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस