शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

गुणवत्तेचा कणा मोडू नय एवढीच अपेक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2017 22:50 IST

अत्यंत गुणवान असूनही परिस्थितीने अडवून ठेवलेल्या एका गुणवान पोरीची ही दर्दभरी कहाणी आहे.

ठळक मुद्देउमरखेडच्या तरुणीची करुणकथा : मातृछत्र हरवले, भाऊही गेला, स्वत:ही दवाखान्यात

अविनाश खंदारे।लोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड : अत्यंत गुणवान असूनही परिस्थितीने अडवून ठेवलेल्या एका गुणवान पोरीची ही दर्दभरी कहाणी आहे. तिच्या संघर्षाची सुरुवात होते उमरखेडसारख्या दुर्गम तालुक्यात अन् ती पोहोचते विद्येच्या माहेरघरात.. पुण्यात. पण नियती काही तिची पाठ सोडायला तयार नाही. घरातल्या दारिद्र्याला न जुमानता ती स्पर्धा परीक्षेतून अधिकारी बनण्यासाठी पुण्यात गेली पण अपघाताने तिला पुन्हा दवाखान्यात जखडून ठेवलेय. आॅपरेशन करायचे आहे, पण दहा लाखांची रक्कम हवी... या लेकीला, उद्याच्या भविष्याला देणार कुणी मदतीचा हात?अपेक्षा संजय मुनेश्वर ही साखरा येथील कोरडवाहू तीन एकराच्या कास्तकाराची हुशार कन्या. ती चार वर्षांची होती तेव्हाच म्हणजे १९९७ मध्ये तिची आई प्रगती यांचा मृत्यू झाला. बालपणीच मोठा आघात झाला. वडील संजय यांनी शेतीत काबाडकष्ट उपसून एक मुलगी आणि दोन मुलांचे शिक्षण केले. मोठा मुलगा वैभवच आता शेती पाहू लागला. पण संकटं संपलेली नव्हती. शेतीत काहीच पिकेना. शेवटी हताश वैभवने २०१४ मध्ये आत्महत्या केली. आईनंतर भावाचेचही असे निघून जाणे अपेक्षासाठी मोठे धक्कादायक ठरले. पण लवकरच ती सावरली. अधिकारी बनण्याचे स्वप्न उराशी बाळगून संकटांना नमवू लागली.उमरखेडच्या गो. सी. गावंडे महाविद्यालयात बीएससी झाल्यावर स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी अपेक्षा पुण्यातील सदाशिव पेठेतील स्वामी विवेकानंद अभ्यासिकेत दाखल झाली. अपेक्षाला तिथे पाठविण्याएवढी घरची परिस्थिती नाहीच. पण तिची हुशारी पाहून गोंदियाची मैत्रिण मौसमी कटरे हिनेच अपेक्षाच्या राहण्याची व्यवस्था केली. शिक्षणासाठी तिनेच मदत केली. आता केवळ अभ्यास करणे, परीक्षा देणे, अधिकारी होणे एवढेच ध्येय जवळ दिसू लागले होते. पण पुन्हा नियतीने खोडा घातला.५ सप्टेंबरला मैत्रिणीसोबत दुचाकीवर जात असताना गाडी स्लिप झाली आणि अपेक्षाला गंभीर दुखापत झाली. पाठीचा कणा पूर्णपणे मोडून गेला. छात्रीच्या हाडांचीही मोडतोड झाली. त्याही अवस्थेत मैत्रीणच धावून आली. मौसमीने अपेक्षाला तातडीने खेड येथील शिवापूरच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले. डॉक्टरांनी आॅपरेशनकरिता १० लाखांचा खर्च सांगितला आहे. घरी पैशांची काहीच तजविज नाही. मौसमीने सोशल मिडियातून मदतीची मागणी केली. स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी धावून आले. त्यांनी आपापसात वर्गणी करून २ लाख गोळाही केले. गेल्या महिन्याभरातील उपचार या पैशांतूनच सुरू आहे. आता कोणत्याही अवस्थेत ५ आॅक्टोबरला आॅपरेशन करणे आवश्यक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. उमरखेड तालुक्याच्या या हुशार विद्यार्थिनीसाठी जिल्ह्यातील दानशूर माणसांनी पुढे यावे, एवढीच अपेक्षा!मौसमी बनली अपेक्षाची सावलीमहिनाभरापासून दवाखान्यात असलेल्या अपेक्षाला आई नाही. पण मौसमी नावाच्या मैत्रिणीने तिला आईची कमतरता भासू दिलेली नाही. ती दररोज तिची सेवासुश्रृशा करतेय. रात्रन्दिवस सावलीसारखी ती अपेक्षासोबत आहे. सतत सोशल मिडियातून मदतीचे आवाहनही करत आहे. मैत्रीचे नाते अबाधीत ठेवण्यासोबतच एका होतकरू मुलीचे भवितव्य उज्ज्वल करण्यासाठी तिची धडपड आहे. तिला समाजातील दानशूरांनी हातभार लावणे गरजेचे आहे.