शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Blast: २ वर्षांपासून सुरू होता स्फोटकं जमवण्याचा जीवघेणा खेळ; डॉ शाहीन शाहिदची कबुली
2
प्रशांत किशोर यांची भविष्यवाणी खरी होणार? बिहार निवडणुकीच्या एक्झिट पोलने केले शिक्कामोर्तब!
3
Tata घराण्यात मोठा बदल, नोएल टाटांच्या मुलाला मिळाली मोठी जबाबदारी; परदेशातून घेतलंय शिक्षण
4
एके-47 ठेवणाऱ्या डॉ. शाहीनचे थेट महाराष्ट्राशी कनेक्शन; जैशच्या महिला विंगची निघाली मास्टरमाईंड
5
“जनतेची काम करतो म्हणून प्रत्येक समाज घटक ८-८ लाखाच्या फरकाने निवडून देतात”: अजित पवार
6
एकही रुपया न गुंतवता दरवर्षी कमावू शकता ₹२.८८ लाख; पाहा PPF च सीक्रेट, लोकही विचारतील कसं केलं?
7
धर्मेंद्र यांना रुग्णालयातून डिस्चार्ज; सनी देओलच्या टीमने दिलं स्टेटमेंट, 'त्यांचं तुमच्यावर..."
8
Govinda Hospitalised : ६१ वर्षीय गोविंदाची अचानक तब्येत बिघडली, झाला बेशुद्ध, जुहूच्या रुग्णालयात दाखल
9
ATP Finals 2025: खेळ पाहण्यासाठी आलेल्या दोन चाहत्यांचा मृत्यू, क्रीडाविश्वात शोक!
10
इंजिनीअरिंग, फार्मसी, एमबीएची सीईटी वर्षातून दोनदा, यंदा एप्रिलमध्ये पहिली, तर मेमध्ये दुसरी सीईटी परीक्षा
11
महायुतीच्या त्सुनामीमुळे विरोधकांत भीती, आशिष शेलार यांचा टोला
12
आजचे राशीभविष्य, १२ नोव्हेंबर २०२५: आजचा दिवस आनंदी; पण 'या' राशीला स्त्रीमुळे अडचणीचा धोका
13
पोस्टरमुळे समोर आला डॉक्टरांचा दहशतवादी कट; स्फोटकांचा तपास यशस्वी, पण दिल्लीत कशी झाली चूक?
14
Delhi Blast: दिल्ली बॉम्बस्फोटावर पाकिस्ताननं काय म्हटलं? तुर्कीनं तर हद्द ओलांडली!
15
Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज, डॉक्टरांनी दिले हेल्थ अपडेट
16
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
17
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
18
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
19
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
20
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त

भाजप-शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये राडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2020 05:00 IST

यवतमाळ पंचायत समितीमध्ये चार सदस्य असलेल्या सेनेने सभापती पदासाठी कांता कांबळे तर उपसभापती पदासाठी काँग्रेसच्या उज्ज्वला गावंडे यांचे नामांकन दाखल केले. त्यातच सेनेच्या नाराज सदस्य नंदा लडके यांनीसुद्धा सभापती व उपसभापती पदासाठी नामांकन भरले. किन्ही येथून भाजप पदाधिकाऱ्यांनी नंदा लडके यांना सोबत घेतले. तेव्हापासून त्या शिवसेनेच्या संपर्कात नव्हत्या. भाजप पदाधिकाऱ्यांनी लडके यांना बुधवारी पंचायत समितीत आणले.

ठळक मुद्देयवतमाळ पंचायत समिती : सेनेच्या सदस्याला फोडण्याचा प्रयत्न फसला

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : येथील पंचायत समितीत शिवसेनेकडे सर्वाधिक संख्याबळ आहे. त्यानंतरही भाजपने केवळ दोन सदस्यांच्या भरवशावर उलथापालथ घडविण्याचा प्रयत्न केला. सेनेतील नाराज सदस्याला स्वत:कडे वळविण्यासाठी एक दिवस अगोदरच ताब्यात घेतले. याच सदस्यावरून बुधवारी पंचायत समितीच्या आवारात भाजप व शिवसेना कार्यकर्ते भिडले.यवतमाळ पंचायत समितीमध्ये चार सदस्य असलेल्या सेनेने सभापती पदासाठी कांता कांबळे तर उपसभापती पदासाठी काँग्रेसच्या उज्ज्वला गावंडे यांचे नामांकन दाखल केले. त्यातच सेनेच्या नाराज सदस्य नंदा लडके यांनीसुद्धा सभापती व उपसभापती पदासाठी नामांकन भरले. किन्ही येथून भाजप पदाधिकाऱ्यांनी नंदा लडके यांना सोबत घेतले. तेव्हापासून त्या शिवसेनेच्या संपर्कात नव्हत्या. भाजप पदाधिकाऱ्यांनी लडके यांना बुधवारी पंचायत समितीत आणले. यावेळी सेनेच्या महिला आघाडीने लडके यांना चर्चेसाठी बाजूला बोलाविले. यावरूनच भाजप व सेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये राडा झाला. या पदाधिकाऱ्यांनी शिवसेना स्टाईलने भाजपच्या पदाधिकाऱ्यांचे मनसुबे उधळून लावले. यावेळी धक्काबुक्कीत नंदा लडके यांची प्रकृती खालावली. उपचारासाठी त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर सभापती, उपसभापती निवड सभेलाही त्या उपस्थित राहू शकल्या नाही. त्यामुळे भाजपचा डाव उधळला गेला. भाजपने शिवसेनेच्या नाराज सदस्याला सोबत घेऊन भाजपच्या सुनीता मडावी यांना उपसभापती बनविण्याची खेळी रचली होती. सेनेच्या कांता कांबळे पाच मते घेऊन सभापती पदी विजयी झाल्या. काँग्रेसच्या उज्ज्वला गावंडे चार मते घेऊन उपसभापती बनल्या. सभापती पदासाठी नामांकन दाखल केलेल्या सेनेच्या नाराज नंदा लडके स्वत:च गैरहजर राहिल्याने त्यांना शून्य मते मिळाली. भाजपच्या उपसभापती पदाच्या उमेदवार सुनीता मडावी यांना तीन मते मिळाली. राडा झाल्याने पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला होता. निवडीनंतर सेना व काँग्रेसच्या समर्थकांनी विजयाचा जल्लोष केला.सभापतिपदी सेनेच्या कांता कांबळेयवतमाळ पंचायत समितीमध्ये भाजप व सेना कार्यकर्त्यांमध्ये राडा झाल्यानंतर तणावपूर्व वातावरणात सभापती व उपसभापती पदाची निवडणूक प्रक्रिया पार पडली. त्यात दोन्ही पदावर अनुक्रमे शिवसेना व काँग्रेसने बाजी मारली. सभापतीपदी शिवसेनेच्या रूई गणाच्या सदस्या कांता कांबळे निवडून आल्या. उपसभापतीपदी काँग्रेसच्या येळाबारा गणाच्या उज्ज्वला गावंडे विजयी झाल्या. सत्तेसाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी फोडाफोडीचे राजकारण करून केलेला प्रयत्न फेल ठरला.काँग्रेसला दूर ठेवण्याची खेळी फसलीयवतमाळ पंचायत समितीमध्ये काँग्रेसच्या एकमेव सदस्य आहे. उपसभापती पदाची संधी काँग्रेसच्या सदस्याला मिळू नये यासाठी व्युहरचना आखण्यात आली होती. भाजपातील एका गटाला यात यशही मिळाले. भाजपकडे गेलेला सेनेच्या नाराज सदस्य ऐनवेळेवर बैठकीला गैरहजर राहिल्या. यामुळे काँग्रेसला पदापासून दूर ठेवण्याची खेळी फसली. शिवसेनेकडे चार, काँग्रेस एक असे पाचचे संख्याबळ होते. राष्ट्रवादीच्या सदस्याला गृहित धरुन भाजपने तयारी केल्याने डाव पलटला.

टॅग्स :Politicsराजकारण