भाजप-शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये राडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2020 05:00 AM2020-01-09T05:00:00+5:302020-01-09T05:00:27+5:30

यवतमाळ पंचायत समितीमध्ये चार सदस्य असलेल्या सेनेने सभापती पदासाठी कांता कांबळे तर उपसभापती पदासाठी काँग्रेसच्या उज्ज्वला गावंडे यांचे नामांकन दाखल केले. त्यातच सेनेच्या नाराज सदस्य नंदा लडके यांनीसुद्धा सभापती व उपसभापती पदासाठी नामांकन भरले. किन्ही येथून भाजप पदाधिकाऱ्यांनी नंदा लडके यांना सोबत घेतले. तेव्हापासून त्या शिवसेनेच्या संपर्कात नव्हत्या. भाजप पदाधिकाऱ्यांनी लडके यांना बुधवारी पंचायत समितीत आणले.

Put in BJP-Shiv Sena workers | भाजप-शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये राडा

भाजप-शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये राडा

Next
ठळक मुद्देयवतमाळ पंचायत समिती : सेनेच्या सदस्याला फोडण्याचा प्रयत्न फसला

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : येथील पंचायत समितीत शिवसेनेकडे सर्वाधिक संख्याबळ आहे. त्यानंतरही भाजपने केवळ दोन सदस्यांच्या भरवशावर उलथापालथ घडविण्याचा प्रयत्न केला. सेनेतील नाराज सदस्याला स्वत:कडे वळविण्यासाठी एक दिवस अगोदरच ताब्यात घेतले. याच सदस्यावरून बुधवारी पंचायत समितीच्या आवारात भाजप व शिवसेना कार्यकर्ते भिडले.
यवतमाळ पंचायत समितीमध्ये चार सदस्य असलेल्या सेनेने सभापती पदासाठी कांता कांबळे तर उपसभापती पदासाठी काँग्रेसच्या उज्ज्वला गावंडे यांचे नामांकन दाखल केले. त्यातच सेनेच्या नाराज सदस्य नंदा लडके यांनीसुद्धा सभापती व उपसभापती पदासाठी नामांकन भरले. किन्ही येथून भाजप पदाधिकाऱ्यांनी नंदा लडके यांना सोबत घेतले. तेव्हापासून त्या शिवसेनेच्या संपर्कात नव्हत्या. भाजप पदाधिकाऱ्यांनी लडके यांना बुधवारी पंचायत समितीत आणले. यावेळी सेनेच्या महिला आघाडीने लडके यांना चर्चेसाठी बाजूला बोलाविले. यावरूनच भाजप व सेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये राडा झाला. या पदाधिकाऱ्यांनी शिवसेना स्टाईलने भाजपच्या पदाधिकाऱ्यांचे मनसुबे उधळून लावले. यावेळी धक्काबुक्कीत नंदा लडके यांची प्रकृती खालावली. उपचारासाठी त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर सभापती, उपसभापती निवड सभेलाही त्या उपस्थित राहू शकल्या नाही. त्यामुळे भाजपचा डाव उधळला गेला. भाजपने शिवसेनेच्या नाराज सदस्याला सोबत घेऊन भाजपच्या सुनीता मडावी यांना उपसभापती बनविण्याची खेळी रचली होती. सेनेच्या कांता कांबळे पाच मते घेऊन सभापती पदी विजयी झाल्या. काँग्रेसच्या उज्ज्वला गावंडे चार मते घेऊन उपसभापती बनल्या. सभापती पदासाठी नामांकन दाखल केलेल्या सेनेच्या नाराज नंदा लडके स्वत:च गैरहजर राहिल्याने त्यांना शून्य मते मिळाली. भाजपच्या उपसभापती पदाच्या उमेदवार सुनीता मडावी यांना तीन मते मिळाली. राडा झाल्याने पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला होता. निवडीनंतर सेना व काँग्रेसच्या समर्थकांनी विजयाचा जल्लोष केला.


सभापतिपदी सेनेच्या कांता कांबळे
यवतमाळ पंचायत समितीमध्ये भाजप व सेना कार्यकर्त्यांमध्ये राडा झाल्यानंतर तणावपूर्व वातावरणात सभापती व उपसभापती पदाची निवडणूक प्रक्रिया पार पडली. त्यात दोन्ही पदावर अनुक्रमे शिवसेना व काँग्रेसने बाजी मारली. सभापतीपदी शिवसेनेच्या रूई गणाच्या सदस्या कांता कांबळे निवडून आल्या. उपसभापतीपदी काँग्रेसच्या येळाबारा गणाच्या उज्ज्वला गावंडे विजयी झाल्या. सत्तेसाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी फोडाफोडीचे राजकारण करून केलेला प्रयत्न फेल ठरला.

काँग्रेसला दूर ठेवण्याची खेळी फसली
यवतमाळ पंचायत समितीमध्ये काँग्रेसच्या एकमेव सदस्य आहे. उपसभापती पदाची संधी काँग्रेसच्या सदस्याला मिळू नये यासाठी व्युहरचना आखण्यात आली होती. भाजपातील एका गटाला यात यशही मिळाले. भाजपकडे गेलेला सेनेच्या नाराज सदस्य ऐनवेळेवर बैठकीला गैरहजर राहिल्या. यामुळे काँग्रेसला पदापासून दूर ठेवण्याची खेळी फसली. शिवसेनेकडे चार, काँग्रेस एक असे पाचचे संख्याबळ होते. राष्ट्रवादीच्या सदस्याला गृहित धरुन भाजपने तयारी केल्याने डाव पलटला.

Web Title: Put in BJP-Shiv Sena workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.