शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

पुसद एसडीओंची बाभूळगाव रेती घाटावर मध्यरात्री धाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2018 21:54 IST

यवतमाळचे एसडीओ व बाभूळगावच्या तहसीलदारांना भनकही लागू न देता पुसदच्या एसडीओंनी वाटखेड रेती घाटावर मध्यरात्री भली मोठी धाड यशस्वी केली. त्यात ३७ वाहने व रेती जप्त करण्यात आली.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांचे आदेश : ३७ वाहने जप्त, लाखोंची रेती, फौजदारीची तयारी

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ /बाभूळगाव : यवतमाळचे एसडीओ व बाभूळगावच्या तहसीलदारांना भनकही लागू न देता पुसदच्या एसडीओंनी वाटखेड रेती घाटावर मध्यरात्री भली मोठी धाड यशस्वी केली. त्यात ३७ वाहने व रेती जप्त करण्यात आली. मोजणीनंतर संंबंधितांवर थेट फौजदारी कारवाई करण्याची तयारी प्रशासनाकडून सुरू आहे.प्रशिक्षणाहून परतलेले जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या आदेशावरुनच ही आंतर उपविभागीय कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईने यवतमाळचे एसडीओ व बाभूळगाव तहसीलदारांच्या कर्तव्यदक्षतेवर प्रश्नचिन्ह लावले जात आहे. धाडीची खबर मिळाल्यानंतर बाभूळगाव तहसीलदार पहाटे ४ वाजता घटनास्थळी पोहोचल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले यांनी ‘लोकमत’ला दिली.बाभूळगाव तालुक्यातील वाटखेड-१ व वाटखेड - २ येथील रेती घाटावर मोठ्या प्रमाणात अवैध उत्खनन होत असल्याची तक्रार जिल्हा प्रशासनाकडे दाखल झाली. त्यावरून जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी पुसदचे उपविभागीय अधिकारी नितीन हिंगोले यांना याठिकाणी कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यावरून बुधवारी सायंकाळी पुसदचे एसडीओ नितीनकुमार हिंगोले, नायब तहसीलदार ढबाले, तलाठी कामराज चौधरी यांनी धाड मारली. रेती घाटाचे प्रतिनिधीही यावेळी रेती घाटावर नसल्याचे पुढे आले. या पथकाने ३७ वाहने जप्त केली.त्यात तीन बोट, चार ट्रेझर बोटी, दोन सक्शन पंप, एक जेसीबी, पोकलॅन्ड आणि ट्रक यांचा समावेश आहे.ही सर्व वाहने बाभूळगाव पोलीस ठाण्यात जमा करण्यात आली आहे. कारवाई गुरुवारी सकाळी बाभूळगावचे तहसीलदार दिलीप झाडे, नायब तहसीलदार डी.पी. बदकी व पोलीस यंत्रणेने दिवसभर रेती घाटाचे मोजमाप केले. वृत्तलिहिपर्यंत कारवाई सुरू होती. मोजमाप झाल्यानंतर संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल केले जाणार आहे.बाभूळगाव प्रमाणे इतर रेती घाटावरही महसूल विभागाला थेट कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. रेती माफियांवर कडक कारवाई केली जाणार आहे.- डॉ. राजेश देशमुखजिल्हाधिकारी, यवतमाळ.

टॅग्स :sandवाळू