शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
2
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
3
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
4
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
5
Iran-Israel Conflict: इस्त्रायल आकाराने लहान, लोकसंख्या अन् सैन्यातही इराणच्या मागे, तरीही युद्धात कसे पुढे? हे आहे कारण
6
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
7
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
8
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
9
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
10
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!
11
'टेस्ट चॅम्पियन' टेम्बा बवुमाचा चिमुरड्या लेकाला सोबत घेऊन 'विक्टरी वॉक', पाहा क्यूट Video
12
पुढील २४ तासांसाठी 'या' जिल्ह्यांना रेड तर ६ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; वीज पडून ८ जण दगावले
13
Bhushan Gavai: संविधान हा सतत विकसित होणारा दस्तऐवज- सरन्यायाधीश
14
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
15
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
16
Radhika Subramaniam : कमाल! भारताची पहिली AI ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर, देशाची सफर घडवणाऱ्या राधिकाला पाहिलंत का?
17
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
18
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
19
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
20
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा

पुसद वीज कर्मचारी वसाहतीची दैैना

By admin | Updated: March 7, 2017 01:27 IST

संपूर्ण शहराच्या वीज वितरणाची जबाबदारी असलेल्या वीज कर्मचारी वसाहतीची प्रचंड दुरवस्था झाली असून येथील कर्मचारी जीव मुठीत घेऊन राहतात.

देखभालीचा अभाव : तक्रार करूनही महावितरणच्या वरिष्ठांचे दुर्लक्षपुसद : संपूर्ण शहराच्या वीज वितरणाची जबाबदारी असलेल्या वीज कर्मचारी वसाहतीची प्रचंड दुरवस्था झाली असून येथील कर्मचारी जीव मुठीत घेऊन राहतात. वसाहत परिसरात घाणीचे साम्राज्य असून इमारतींची दारे व खिडक्याही तुटल्या आहेत. याबाबत येथील कर्मचाऱ्यांनी वरिष्ठांकडे वारंवार तक्रारी करूनही दखल मात्र घेतली नाही. पुसद येथील श्रीरामपूर ग्रामपंचायत क्षेत्रात वीज वितरणच्या विद्युत भवनजवळ कर्मचारी वसाहत आहे. दोन इमारतीत १६ गाळे असून या ठिकाणी वीज वितरणचे चतुर्थ श्रेणी कर्मचारी राहतात. १९८३ साली बांधलेल्या या गाळ्यांमध्ये एक हॉल, स्वयंपाकगृह, शौचालय आणि स्नानगृह आहे. परंतु गेल्या कित्येक वर्षांपासून देखभाल दुरुस्तीच करण्यात आली नाही. स्लॅबचे प्लास्टर उखडून पडत असून रंगरंगोटीही करण्यात आली नाही. काही कर्मचाऱ्यांनी आपल्या निवासस्थानातील आतील बाजूने रंगरंगोटी केली. परंतु पावसाळ्यात भिंतीला ओल येत असल्याने रंगरंगोटीही कुचकामाची ठरते. वसाहत परिसरही घाणीने माखलेला आहे. वसाहतीच्या एका कोपऱ्यात मोठा उकिरडा असून स्वच्छतेसाठी कोणत्याही उपाययोजना केल्या जात नाही. वीज वितरणच्या कर्मचाऱ्यांना रात्री बे रात्री कामावर जावे लागते. अशा परिस्थितीत या परिसरात सुरक्षा रक्षक असणे गरजेचे आहे. परंतु सुरक्षेची कोणतीही हमी नसते. दारे, खिडक्या तुटलेली असल्याने या निवासस्थानात राहणाऱ्या महिलांमध्ये कायम भीतीचे वातावरण राहते. अधिकाऱ्यांचे निवासस्थाने चांगले आणि चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची दुरवस्था येथे हे चित्र येथे दिसून येते. याबाबत अनेकदा वरिष्ठांकडे तक्रारी दिल्या. परंतु पारेषणने दुरुस्ती करावी की वितरणने, या घोळात डागडुजी अडकल्याचे येथील कर्मचाऱ्यांनी सांगितले. (कार्यालय चमू)नळाचे पाणी दूषित वीज कर्मचारी वसाहतीला जीवन प्राधिकरणाच्या पाईपलाईनने पाणी पुरविले जाते. परंतु या वसाहतीत येणारा पाईप शौचालयाच्या चेंबरजवळून आलेला आहे. तसेच ठिकठिकाणी हा पाईल लिकेज आहे. त्यामुळे घाण पाणी येत असून यामुळे आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक कर्मचारी कुलकेजचे पाणी विकत घेऊन आपली तहान भागवित असल्याचे दिसून येते.