शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

पुसद, वणी, झरीला वादळी पावसाने झोडपले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2022 05:00 IST

पुसद, वणी, झरी जामणी आणि केळापूर तालुक्यात शुक्रवारी व शनिवारीही विविध ठिकाणी पाऊस बरसला. महागाव तालुक्यातील सुधाकरनगर येथे पावसात अंगावर वीज कोसळल्याने पृथ्वीराज काजुलाल राठोड या १८ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. शनिवारी सायंकाळी घराकडे परतत असताना त्याच्या अंगावर वीज कोसळली. घटनेची माहिती मिळताच तलाठी एस.ए. राऊत यांनी पंचनामा करून तहसीलदारांना माहिती दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शुक्रवारपासून जिल्ह्यातील विविध भागात पाऊस सुरू आहे. पुसद तालुक्यासह वणी, झरी जामणी, केळापूरला वादळी पावसाने झोडपले असून, या पावसात वीज कोसळल्याने दोघांंचा मृत्यू झाला आहे. महागाव तालुक्यातील माळकिन्हीत वीज कोसळून गाय ठार झाली. शनिवारी सायंकाळीही जिल्ह्याच्या विविध भागात पावसाच्या सरी कोसळत होत्या. पुसद, वणी, झरी जामणी आणि केळापूर तालुक्यात शुक्रवारी व शनिवारीही विविध ठिकाणी पाऊस बरसला. महागाव तालुक्यातील सुधाकरनगर येथे पावसात अंगावर वीज कोसळल्याने पृथ्वीराज काजुलाल राठोड या १८ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. शनिवारी सायंकाळी घराकडे परतत असताना त्याच्या अंगावर वीज कोसळली. घटनेची माहिती मिळताच तलाठी एस.ए. राऊत यांनी पंचनामा करून तहसीलदारांना माहिती दिली. माळकिन्ही येथे रमेश देवराव कलाने यांची गाय वीज अंगावर पडल्याने दगावली. पांढरकवडा तालुक्यातही शनिवारी वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. तालुक्यातील जोगीनकवडा शेतशिवारात पाऊस सुरू झाल्याने झाडाखाली थांबलेल्या चंडकू भीमराव मेश्राम या ३० वर्षीय मजुराचा मृत्यू झाला. चंडकू मेश्राम हा राजू राठोड यांच्या शेतात टोबणीसाठी सारे पाडत होता. त्याचवेळी पाऊस सुरू झाल्याने त्याने शेजारीच असलेल्या पळसाच्या झाडाचा आसरा घेतला. मात्र झाडावर वीज कोसळल्याने त्याचा मृत्यू झाला. वर्षभरापूर्वीच चंडकू याचा विवाह झाला होता.

पुसद, वणीमध्ये प्रत्येकी १४ मीमी पाऊस- मागील २४ तासात जिल्ह्यात सरासरी ४.५ मीमी सरासरी पावसाची नोंद झाली आहे. वणी तालुक्यात सर्वाधिक १४.५ मीमी, पुसद १४ मीमी, झरीजामणी ११.७ मीमी, केळापूर १० मीमी, घाटंजी ८.१ मीमी, मारेगाव ५.९ मीमी तर महागाव तालुक्यात १.९ मीमी पावसाची नोंद झाली आहे. शनिवारीही जिल्ह्यात अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण असून मोठ्या पावसाची शक्यता आहे.

बेलोरा परिसरात वादळाने झाडे उन्मळली- पुसद तालुक्यातील माळपठारालाही शुक्रवारी सायंकाळी वादळी पावसाने तडाखा दिला. या पावसात बेलोरा परिसरातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील आठ झाडे उन्मळून पडली. या बरोबरच अनेकांच्या घरावरील टीनपत्रेही उडाले. शिवाजी विद्यालयाचे छप्पर उडून गेले. त्यावरील दगड अंगावर पडल्याने  देवानंद होडगीर हे जखमी झाले असून त्यांच्यावर पुसद येथील प्रथमोपचार करून अधिक उपचारासाठी नांदेड येथे हलविण्यात आले आहे. कैलास मारकड, भारत मारकड, आकाश सोडगीर आदींच्या घरावरील टीनपत्रेही उडाले. त्यामुळे घरात पाणी शिरल्याने अन्न धान्यासह संसारोपयोगी साहित्याचे नुकसान झाले.

खांब काेसळल्याने वीजपुरवठा खंडित- बेलोरा परिसराला वादळी पावसाने झोडपून काढले. विजेचे खांब कोसळल्याने परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे बेलोरासह वाघजळी,पन्हाळा ही गावे रात्रभर अंधारात होती. शनिवारी दुपारपर्यंत वीजपुरवठा सुरळीत झालेला नव्हता. खंडाळा येथील उपकेंद्रात बिघाड झाल्याने पुरवठा सुरळीत होण्यास वेळ लागण्याची शक्यता वीज वितरणच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. दरम्यान जिल्हा परिषदेचे माजी सभापती डी.जी. राठोड यांनी जखमी होडगीर यांच्या वडिलांची भेट घेऊन आर्थिक मदतीची ग्वाही दिली. सपरंच रुपाली पोले, माजी पंचायत समिती सदस्य कल्पना गडदे, धोंडबाराव पोले, जांबुवंत राठोड आदींनी नुकसानीची पाहणी केली. दरम्यान, शनिवारी रात्री यवतमाळ शहरासह जिल्ह्याच्या विविध ठिकाणी रिमझीम पाऊस सुरू होता. रविवारी जिल्ह्यात दमदार पाऊस कोसळण्याचा वेधशाळेचा अंदाज आहे.  

 

टॅग्स :Rainपाऊस