पुसद १९, दिग्रस तालुक्यात कोरोनाचे १३ बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2020 05:00 AM2020-09-07T05:00:00+5:302020-09-07T05:00:16+5:30

तालुक्यात गेल्या २० एप्रिलपासून कोरोनाची सुरुवात झाली. २ सप्टेंबरपर्यंत एकूण ५०३ नागरिकांना कोरोनाची लागण झाली. त्यात शहरातील ९९ रुग्णांचा समावेश आहे. सध्या अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १५१ झाली आहे. २५१ नागरिकांचे अहवाल अद्याप अप्राप्त आहे. याशिवाय काही रुग्णांवर यवतमाळात उपचार केले जात आहे. आतापर्यंत जवळपास ३४५ जणांनी कोरोनावर मात केली आहे.

Pusad 19, 13 victims of corona in Digras taluka | पुसद १९, दिग्रस तालुक्यात कोरोनाचे १३ बळी

पुसद १९, दिग्रस तालुक्यात कोरोनाचे १३ बळी

googlenewsNext
ठळक मुद्देरुग्णसंख्या वाढली : नागरिकांसह प्रशासनाची तारांबळ, हिवाळा जाणार कठीण

लोकमत न्यूज नेटवर्क
पुसद/दिग्रस : पुसद शहर व तालुका आणि दिग्रस शहर व तालुक्यात कोरोनाचा कहर सुरूच आहे. पुसद तालुक्यात आतापर्यंत १९, तर दिग्रस तालुक्यात कोरोनाने १३ जणांचे बळी घेतले आहे.
तालुक्यात गेल्या २० एप्रिलपासून कोरोनाची सुरुवात झाली. २ सप्टेंबरपर्यंत एकूण ५०३ नागरिकांना कोरोनाची लागण झाली. त्यात शहरातील ९९ रुग्णांचा समावेश आहे. सध्या अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १५१ झाली आहे. २५१ नागरिकांचे अहवाल अद्याप अप्राप्त आहे. याशिवाय काही रुग्णांवर यवतमाळात उपचार केले जात आहे. आतापर्यंत जवळपास ३४५ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तालुक्यातील इसापूर येथील कोविड सेंटरमध्ये १५१ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहे. तेथील विलगीकरण कक्षात २२७ नागरिक असून १५ नागरिक गृह विलगीकरणात आहे. आतापर्यंत तालुक्यातील १३ जणांचे बळी गेले आहे.
२९ ऑगस्ट ते २ सप्टेंबरपर्यंत जवळपास २५१ जणांचे स्वॅब घेण्यात आले. त्यांचे अहवाल अद्याप अप्राप्त आहे. तालुक्यात २ सप्टेंबरला सर्वाधिक ७१ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले होते. त्यामुळे नागरिक व प्रशासनाची तारांबळ उडत आहे. नागरिकांकडून काळजी घेतली जात नसल्याने प्रशासनही अडचणीत सापडले आहे. कोरोना नियंत्रण समितीचे अध्यक्ष तथा तहसीलदार राजेश वजीरे, मुख्याधिकारी शेषराव टाले, गटविकास अधिकारी राजेश खारोडे, ठाणेदार सोनाजी आमले, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.कृष्णा बानोत, कोविड सेंटरचे व्यवस्थापक डॉ.अभय गोविंदवार आदी कोरोना संसर्ग टाळण्यासाठी प्रयत्नरत आहे.
प्रशासनाला सहकार्य करावे
शहर व तालुक्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. तरीही नागरिक बिनधास्त वागत आहे. अनेक ठिकाणी गर्दी केली जात आहे. त्यामुळे नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ.कृष्णा बानोत यांनी केले आहे. फिजिकल डिस्टन्स पाळणे, मास्क वापरणे, हात स्वच्छ धुणे, गर्दी टाळणे आदी सूचना त्यांनी केल्या. तसेच सर्दी, ताप, खोकला आणि श्वास घेण्यास त्रास होत असल्यास तातडीने नजीकच्या रुग्णालयात किंवा कोविड सेंटरमध्ये तपासणी करून घेण्याचे आवाहनही डॉ.बानोत यांनी केले आहे.

पुसद तालुक्यात ८६ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण
तालुक्यात आतापर्यंत ६४५ जणांना कोरोनाची बाधा झाली. त्यापैकी ५४० जणांनी कोरोनावर मात केली. तूर्तास तालुक्यात ८६ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. रविवारी नव्याने ९५ जणांना सुटी देण्यात आली. रविवारी ५८ रॅपिड टेस्ट करण्यात आला. त्यात १२ पॉझिटिव्ह, तर ४६ जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आशीष पवार यांनी सांगितले. दरम्यान, रविवारी पुसदमधील आरटीपीसीआर चाचणीत ३३, तर रॅपिड अँटिजन टेस्टमध्ये १४ अशा ४७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. दिग्रसमध्येही १९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहे.

Web Title: Pusad 19, 13 victims of corona in Digras taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.