लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे चालू हंगामात कापूस पणन महासंघातर्फे उपविभागातील पाच हजार ५५० शेतकऱ्यांकडून तब्बल एक लाख २४ हजार ४१ क्ंिवटल एवढ्या विक्रमी कापसाची खरेदी करण्यात आली. मात्र सध्या ढगाळ वातावरणामुळे खेरदी बंद करण्यात आली आहे.कापूस पणन महासंघाने पुसद उपविभागातील पुसद, दिग्रस व उमरखेड तालुक्यातील पाच ५५० शेतकऱ्यांपैकी पुसद तालुक्यातील तीन हजार ८२१ शेतकऱ्यांकडून कोव्हीड-१९ पूर्वी ९१ हजार २२१ क्विंटल कापूस खरेदी केला. बाजार समितीमधील परवानाधारक व्यापाऱ्यांनी ६९५ शेतकऱ्यांकडून नऊ हजार ८४० क्विंटल, असा एकूण एक लाख एक हजार ६२ क्विंटल कापसाची खरेदी केली. कोव्हीड-१९ नंतरच्या काळात उमरखेड येथील ७३ व दिग्रस येथील ३५, तर पुसद येथील ९२६, अशा एकूण एक हजार ३४ शेतकऱ्यांकडून २२ हजार ९७८ क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला. आत्तापर्यंत एकूण पाच हजार ५५० शेतकऱ्यांकडून १ जूनपूर्वी तब्बल एक लाख २४ हजार ४१ क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली. यामध्ये दोन हजार ३९४ ही बाजार समितीकडे आॅनलाईन नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची संख्या आहे.येथील बाजार समितीच्यावतीने कापूस पणन महासंघ व बाजार समितीतील अनुज्ञप्तीधारक व्यापाºयांकडून परिसरातील शेतकऱ्यांकडून कोव्हीड-१९ पूर्वी व नंतर, अशा दोन टप्प्यात कापूस खरेदी करण्यात आली. मात्र आता पावसाचे वातावरण असल्यामुळे शेतकऱ्यांना त्रास होऊ नये म्हणून ३ जूनपासून कापूस खरेदी पुढील आदेशापर्यंत बंद राहणार असल्याची माहिती बाजार समितीचे सचिव व्ही.डी.पवार यांनी दिली.दरम्यान, पावसाने गेल्या तीन दिवसांपासून तालुक्यात हजेरी लावली आहे. तयामुळे शेतकरी खरीप हंगामाच्या लगबगीत आहे. बियाणे आणि गत खरेदीसाठी त्यांची धावपळ सुरू आहे. मात्र हातात पैसा नसल्याने अनेक शेतकऱ्यांना उधारीवर बियाणे घ्यावे लागत आहे. कापूस घरातच असल्याने त्यांच्यासमोर पैशाचा प्रश्न निर्माण झाला आहे.अद्यापही शेकडो क्विंटल कापूस घरातचबाजार समितीत एक लाख क्विंटलच्यावर कापसाची खरेदी झाली असली, तरी अद्याप अनेक शेतकऱ्यांकडे कापूस साठवून आहे. पुसद, उमरखेड आणि दिग्रस तालुक्यात अनेक शेतकऱ्यांच्या घरात कापूस साटवून आहे. वारंवार बंद होणाऱ्या खरेदीमुळे हा कापूस साटवून आहे. लॉकडाऊनमुळे अनेकदा खरेदी बंद होती. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे.
पुसदमध्ये सव्वालाख क्ंिवटल कापसाची खरेदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2020 05:00 IST
कापूस पणन महासंघाने पुसद उपविभागातील पुसद, दिग्रस व उमरखेड तालुक्यातील पाच ५५० शेतकऱ्यांपैकी पुसद तालुक्यातील तीन हजार ८२१ शेतकऱ्यांकडून कोव्हीड-१९ पूर्वी ९१ हजार २२१ क्विंटल कापूस खरेदी केला. बाजार समितीमधील परवानाधारक व्यापाऱ्यांनी ६९५ शेतकऱ्यांकडून नऊ हजार ८४० क्विंटल, असा एकूण एक लाख एक हजार ६२ क्विंटल कापसाची खरेदी केली.
पुसदमध्ये सव्वालाख क्ंिवटल कापसाची खरेदी
ठळक मुद्देआता खरेदी बंद : पुसद, उमरखेड, दिग्रसमधील ५१५० शेतकरी