शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सरपंच अवॉर्डसाठी प्रस्तावांचा ओघ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2019 22:06 IST

गतवर्षीच्या उदंड प्रतिसादानंतर पुन्हा एकदा ‘लोकमत सरपंच अवॉर्ड’चे दुसरे पर्व सुरु झाले आहे़ ‘लोकमत सरपंच अवॉर्ड’साठी सरपंचांकडून प्रस्तावांचा ओघ सुरु असून ७ फेबु्रवारीपर्यंत सरपंचांना त्यांचे प्रस्ताव ‘लोकमत’च्या जिल्हा कार्यालयात (पृथ्वीवंदन, गांधी चौक, यवतमाळ) सादर करता येणार आहेत.

ठळक मुद्दे‘लोकमत सरपंच अवॉर्ड’: ७ फेबु्रवारीपर्यंत प्रस्तावांची मुदत

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : गतवर्षीच्या उदंड प्रतिसादानंतर पुन्हा एकदा ‘लोकमत सरपंच अवॉर्ड’चे दुसरे पर्व सुरु झाले आहे़ ‘लोकमत सरपंच अवॉर्ड’साठी सरपंचांकडून प्रस्तावांचा ओघ सुरु असून ७ फेबु्रवारीपर्यंत सरपंचांना त्यांचे प्रस्ताव ‘लोकमत’च्या जिल्हा कार्यालयात (पृथ्वीवंदन, गांधी चौक, यवतमाळ) सादर करता येणार आहेत.‘लोकमत सरपंच अवॉर्ड’ हा बीकेटी टायर्स प्रस्तुत व पतंजली आयुर्वेद प्रायोजित ऐतिहासिक पुरस्कार ‘लोकमत’ने मागील वर्षापासून सुरु केला आहे. गतवर्षी अठरा जिल्ह्यात ही पुरस्कार योजना राबविण्यात आली होती़ त्यात पाच हजारहून अधिक गावांच्या सरपंचांनी सहभाग घेतला होता़ प्रत्येक कॅटेगरीबाबतचे निकष अर्जामध्ये नमूद केलेले असून, अधिक माहितीसाठी (०७२३२- २४५११९) या क्रमांकावर संपर्क साधावा़अठरा जिल्ह्यांचा समावेशअकोला, बुलडाणा, अमरावती, यवतमाळ, नागपूर, भंडारा, औरंगाबाद, लातूर, जालना, अहमदनगर, धुळे, जळगाव, नाशिक, कोल्हापूर, पुणे, सांगली, सातारा, सोलापूर या अठरा जिल्ह्यांत ही योजना राबविण्यात येत आहे.मागील वर्षी ज्या सरपंचांना पुरस्कार मिळाले आहेत, त्यांना या वर्षी त्याच कॅटेगरीमध्ये प्रस्ताव दाखल करता येणार नाही़पुरस्काराच्या कॅटेगरी आणि निकषजलव्यवस्थापन, वीजव्यवस्थापन, शैक्षणिक सुविधा, स्वच्छता, आरोग्य, पायाभूत सेवा, ग्रामरक्षण, पर्यावरण संवर्धन, प्रशासन / ई-प्रशासन / लोकसहभाग, रोजगार निर्मिती, कृषी तंत्रज्ञान, उदयोन्मुख नेतृत्व, सरपंच आॅफ द ईयर या १३ क्षेत्रात हे पुरस्कार दिले जाणार आहेत. या प्रत्येक क्षेत्रात सरपंचाने केलेले काम पाहून त्या-त्या क्षेत्रातील विजेते निवडले जातील. सरपंचांना ज्या विभागासाठी प्रवेशिका दाखल करावयाची आहे त्या कामांचा तपशील त्यांनी प्रवेशिकेसोबत जोडणे आवश्यक आहे. पुरस्कारासाठी २०१८ या एका वर्षात झालेली कामे विचारात घेतली जातील. १३ विभागांत नेमकी कोणती कामे अपेक्षित आहेत याचा तपशील प्रवेशिकेत नमूद आहे. प्रवेशिका ‘लोकमत’ कार्यालयात उपलब्ध आहेत.‘लोकमत’ पुरस्कार ही सरपंचांसाठी मोठी संधीग्रामविकासाला चालना देण्यात ‘लोकमत सरपंच अवॉर्ड’ची महत्वपूर्ण भूमिका आहे़ गेल्या वर्षी राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळाला़ चांगली कामे करणाऱ्या गावांचा मोठा सन्मान झाला़ त्यामुळे अनेक गावांना यातून प्रेरणा मिळत आहे़ चांगले काम करणाºया सरपंचांसाठी हा पुरस्कार मोठी संधी आहे़ सरपंचांना प्रोत्साहन, प्रेरणा देण्याचे जे काम सरकारकडून होणं अपेक्षित होतं, ते ‘लोकमत’ने हाती घेतले आहे़ -योगिता गायकवाड, नागपूर,मागील वर्षीच्या ‘लोकमत सरपंच अवॉर्ड’ विजेत्या़