शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
2
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
3
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
4
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
5
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
6
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
7
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
8
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
9
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
10
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
11
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
12
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
13
'आता तुझ्यासोबत राहायचं नाही'; पतीपासून वेगळं राहणाऱ्या 28 वर्षीय महिलेवर अनेकवेळा बलात्कार
14
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
15
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं
16
हैदराबाद विद्यापीठाच्या निवडणुकीत ABVP चा मोठा विजय; NSUI ला नोटापेक्षा कमी मते...
17
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
18
टॅरिफ, H1B व्हिसानंतर अमेरिकेचा आता भारतीय कोळंबीवर डोळा! मच्छीमारांवर संकट येणार?
19
पती, पत्नी आणि तो... वेगळचं प्रकरण! माहेर अन् सासरच्यांनी मिळून केलं विवाहितेचं अपहरण; पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...

तीन चौकांच्या नामकरणाचा प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2018 21:54 IST

शहरातील तीन प्रमुख चौकांच्या नामकरणासाठी नगपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत प्रस्ताव ठेवण्यात येणार आहे. देशपातळीवरून सुरू झालेले नामकरणाचे लोण यवतमाळ शहरातही पोहोचल्याचे दिसून येते. याशिवाय आठ विषयांवर सभेत चर्चा होणार आहे.

ठळक मुद्देयवतमाळ पालिकेची आज सभा : अस्वच्छता असतानाही स्वच्छतेचे रेटिंग

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शहरातील तीन प्रमुख चौकांच्या नामकरणासाठी नगपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत प्रस्ताव ठेवण्यात येणार आहे. देशपातळीवरून सुरू झालेले नामकरणाचे लोण यवतमाळ शहरातही पोहोचल्याचे दिसून येते. याशिवाय आठ विषयांवर सभेत चर्चा होणार आहे.बस्थानक परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या जागेला संविधान चौक असे नाव, बालाजी मंगल कार्यालयाजवळच्या चौकाला छत्रपती चौक नाव, धामणगाव रोडवरील पिंपळगाव चौकाला श्री अग्रसेन चौक नाव देण्याच्या प्रस्तावावर सभेत चर्चा होणार आहे.नगरपरिषदेला हागणदारीमुक्त अभियानामध्ये तीन वेळा प्लस असल्याचा दर्जा मिळविण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे. स्वच्छ सर्व्हेक्षण २०१९ अंतर्गत शहर कचरामुक्तीसाठी रेटींग ठरविण्यात येणार आहे. अमृत योजनेतून शहरातील भूमिगत गटारी योजनेच्या कामाची निविदा महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने बोलविल्या आहेत. त्यातील प्राप्त निविदेस सभेत मान्यतेसाठी ठेवले जाणार आहे. शहरात नव्याने आलेल्या भागातील आदिवासी बांधवांकरिता विकासनिधी मागविण्यासाठी प्रस्ताव तयार करून शासनाकडे पाठविण्यावर निर्णय घेण्यात येणार आहे. या बैठकीत शहरातील स्वच्छतेच्या मुद्यावरून घमासान होण्याची शक्यता आहे. अत्याधुनिक घंटागाड्या आॅगस्ट महिन्यापासून उभ्या आहेत. याच्या कंत्राटाबाबतही निर्णय झालेला नाही. यावरही विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरण्याची शक्यता आहे.भूमिगत गटार योजनेची निविदाशहरात अमृत योजनेतून पहिल्या टप्प्यातील दोनशे कोटींच्या भूमिगत गटार योजनेचे काम हाती घेतले आहे. यासाठी जीवन प्राधिकरणाने निविदा प्रक्रिया केली आहे. आता या निविदांना मंजुरीसाठी पालिका सभागृहात ठेवले जाणार आहे. आधीच यवतमाळ शहराला विकास कामांची ‘रिअ‍ॅक्शन’ आली आहे. आता त्यात पुन्हा गटारी योजनेसाठी जीवन प्राधिकरणचे खोदकाम यवतमाळकरांना धडकी भरविणारे आहे. नेमकी ही योजना शहरासाठी उपयोगी आहे का यावरच मतमतांतरे आहेत.