शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

प्रकल्प गुंडाळणार, ७८० जणांची नोकरी जाणार; कृषी संजीवनीची ३० जूनची डेडलाइन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2024 06:21 IST

सहा वर्षांपूर्वी सुरू करण्यात आलेला नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाची (पाेकरा) मुदत ३० जूनला संपत आहे.

सूरज पाटील, लोकमत न्यूज नेटवर्क, यवतमाळ: सहा वर्षांपूर्वी सुरू करण्यात आलेला नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाची (पाेकरा) मुदत ३० जूनला संपत आहे. त्यासंदर्भात प्रकल्प संचालकांचे पत्र धडकल्याने राज्यातील ७८० कंत्राटी कर्मचाऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे.

विदर्भ-मराठवाड्यातील १६ जिल्ह्यात प्रकल्पाची अंमलबजावणी २०१८ पासून सुरू झाली हाेती. या प्रकल्पाची मुदत सहा वर्षांसाठी हाेती. ही मुदत ३० जून २०२४ ला संपुष्टात येत आहे. प्रकल्पामार्फत उपलब्ध करून दिलेले कंत्राटी मनुष्यबळ ३० जूनपर्यंत त्यांच्या कार्यालयात उपलब्ध राहणार आहे. त्यानंतर त्यांची सेवा समाप्त हाेणार आहे. त्यामुळे नेमून दिलेली कामे विहित वेळेत पूर्ण करून प्राथमिक अहवाल प्रकल्प कार्यालयास १५ जूनपर्यंत सादर करण्याचे निर्देश प्रकल्प संचालक परिमल सिंह यांनी कृषी अधीक्षकांना दिले आहेत.

या जिल्ह्यात हाेता प्रकल्प

हा प्रकल्प राज्यातील १६ जिल्ह्यांत सुरू हाेता. यात यवतमाळ, अकाेला, वाशिम, बुलढाणा, अमरावती, वर्धा, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव, नांदेड, हिंगाेली, परभणी, जळगाव व नाशिकचा समावेश हाेता.

टॅग्स :YavatmalयवतमाळAgriculture Sectorशेती क्षेत्रUnemploymentबेरोजगारी