शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

भूसंपादनाच्या वाढीव मोबदल्याची प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना प्रतीक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2024 18:18 IST

१२५ कोटींची पूरक मागणी : बेंबळाच्या कालव्यासाठी घेतली जमीन

लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : बेंबळा प्रकल्पाचे कालवे तयार करण्यासाठी घेतलेल्या जमिनीचा वाढीव मोबदला देण्याचा आदेश न्यायालयाने केला आहे; परंतु शासनाकडून निधीच मिळाला नसल्याने शेतकऱ्यांना दीर्घकाळापासून प्रतीक्षा करावी लागत आहे. शेतकऱ्यांना ही रक्कम देण्यासाठी करण्यात आलेली १२५ कोटी रुपयांची पूरक मागणीही अडगळीत पडली आहे.

बाभूळगाव तालुक्यात असलेल्या बेंबळा प्रकल्पातून बाभूळगाव, कळंब, राळेगाव, मारेगाव आदी तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून दिले जाते. यासाठी मोठे, लहान कालवे तयार करण्यात आले आहे. याकरिता शेतजमिनी घेण्यात आल्या; परंतु मोबदला कमी मिळाल्याने शेतकऱ्यांनी योग्य रकमेसाठी न्यायालयात धाव घेतली. 

बेंबळा प्रकल्पांतर्गत ४५० हून अधिक शेतकरी न्यायालयात गेले होते. यातील बहुतांश शेतकऱ्यांच्या बाजूने न्यायालयाने निकाल दिला. यानुसार वाढीव मोबदल्याकरिता बेंबळा कालवे विभागाने शासनाकडे रकमेची मागणी केली. सुरुवातीला ७५ कोटी, त्यानंतर १२५ कोटींची पूरक मागणी नोंदविण्यात आली. अजूनही ही रक्कम मिळण्याची कुठलीही चिन्हे दिसत नाहीत. त्यामुळे आणखी किती दिवस प्रतीक्षा करायची, हा प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे.

काही भागात कालवे तयार करण्यासाठी जमीन संपादित करण्यात आली आहे. परंतु संपादित केलेल्या जमिनीचा मोबदलाही अद्याप देण्यात आला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. यासाठीची रक्कमही शासनाकडून प्राप्त झालेली नाही.

विभागावर कारवाईची शक्यता शेतकऱ्यांना वाढीव मोबदला देण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. यासाठी संबंधित विभागाने शासनाकडे पाठपुरावा केला आहे. न्यायालयाने दिलेल्या मुदतीत शेतकऱ्यांना रकम अदा करणे गरजेचे आहे; परंतु यासाठी बराच विलंब लावला जात आहे. अशा वेळी न्यायालयाकडून संबंधित विभागावर कारवाई होण्याची शक्यता आहे. यापूर्वी बेंबळा प्रकल्पाशी संबंधित काही विभागांवर जप्तीची नामुष्की ओढविली आहे.

वकिलाची फीसुद्धा अडली भूसंपादनाचा वाढीव मोबदला मिळावा यासाठी शेतकऱ्यांनी न्यायालयात धाव घेतली. प्रकल्प विभागाच्या वतीने या केसेस हाताळण्यासाठी वकिलांची नियुक्ती करण्यात आली आहे; परंतु निधीच मिळाला नसल्याने त्यांची फीसुद्धा अडली आहे. मागील दोन ते तीन वर्षापासून वकील मंडळी संबंधित कार्यालयाकडे ही रक्कम मिळावी यासाठी पाठपुरावा करीत आहे.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रYavatmalयवतमाळ