शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

तेलंगणातून महाराष्ट्रात येतोय प्रतिबंधित गुटखा; तस्करांवर कारवाईची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2024 17:48 IST

Nagpur : प्रशासनाचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्क पांढरकवडा : शासनाने गुटखा विक्रीला प्रतिबंध घातला असला तरी शहरात तसेच तेलंगणाच्या सीमेवरील पाटणबोरी येथे खुलेआमपणे सुगंधित तंबाखू आणि गुटखा विक्री मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. तेलंगणा प्रदेशातून पाटणबोरीमार्गे या गुटख्याची तस्करी होत असून या गोरखधंद्यात दररोज लाखो रुपयांची उलाढाल होत आहे.

गुटख्यामध्ये असलेल्या मॅग्नेशियम कार्बोनेट या विषारी पदार्थामुळे मुखरोग तसेच कर्करोग होत असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे राज्य शासनाने सुगंधित तंबाखू गुटखा तसेच सुगंधित तंबाखू मिश्रित सुपारीच्या विक्रीवर कडक निर्बंध घातले असून या पदार्थांवर बंदी आणली. त्यासाठी कठोर कायदा केला. परंतु शहरात मात्र सुगंधित तंबाखू, गुटखा व सुगंधित तंबाखू मिश्रित सुपारीची खुलेआम विक्री होत आहे. या गोरखधंद्यात एक मोठे रॅकेट सक्रिय आहे. 

पाटणबोरी येथील तस्करांमार्फत आंध्रातून येणारा हा गुटखा पांढरकवडा शहरासह मोहदा, रुंझा, करंजी, पहापळ परिसरात पोहोचविला जातो. अगदी राजरोसपणे सुरू असलेला हा गोरखधंदा मागील कित्येक दिवसांपासून खुलेआम सुरू आहे. परंतु याकडे कोणाचेही लक्ष नाही. पांढरकवडा येथून तेलंगणा प्रदेशाची सीमा केवळ २३ किलोमीटर अंतरावर असून सीमेला लागूनच असलेल्या पाटणबोरीमार्गे या गुटख्याची तस्करी होते. हा गुटखा अगोदर एका छोट्या वाहनाने पाटणबोरी येथे आणला जात होता. परंतु आता मोठ्या वाहनातून तो आणला जातो. पाटणबोरी येथे गुटखा उतरविल्यानंतर हा गुटखा काही ठराविक आणि विश्वासू व्यक्तींमार्फत पांढरकवडा शहरात तसेच तालुक्यातील अनेक गावांमधील पान टपऱ्यांवर नियोजनबद्ध पद्धतीने पोहोचता केला जातो. गुटखा पुड्या पोहोचविण्यासाठी त्यांना चांगली रक्कम दिली जाते. सुगंधी तंबाखू आणि गुटख्यांच्या पुड्या केव्हा पोहोचविल्या जातात याचा सुगावा कुणालाही लागत नाही. 

गुटखा तस्करांवर कारवाईची मागणी गुटखा खाणाऱ्यांचे प्रमाण तरुण वर्गात मोठ्या प्रमाणात आहे. गुटखा खाण्यासाठी ते कितीही पैसे मोजायला तयार आहेत. गुटख्याचे भाव आधीच मोठ्या प्रमाणावर वाढले असून तेलंगणातून तस्करी करून आलेला हा गुटखा त्यापेक्षा कितीतरी जास्त भावाने विकला जातो. हा गुटखा पाटणबोरी येथे नेमका कुणाकडे उतरविला जातो, त्याचा साठा करून तो कशा पद्धतीने विक्री केला जातो, याची चौकशी करून गुटखा तस्करांवर कारवाई करण्याची मागणी पांढरकवडा तालुक्यातील नागरिकांकडून केली जात आहे.

टॅग्स :Tobacco Banतंबाखू बंदीYavatmalयवतमाळ