शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळ येथील प्राचार्य शंकरराव सांगळे यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2018 05:59 IST

यवतमाळच्या सांस्कृतिक, सामाजिक क्षेत्रातील अनेकांचे आधारस्तंभ, अमोलकचंद महाविद्यालयाचे माजी प्राचार्य शंकरराव ठकाजी सांगळे यांचे मंगळवारी सकाळी हृदयविकाराने निधन झाले.

यवतमाळ : यवतमाळच्या सांस्कृतिक, सामाजिक क्षेत्रातील अनेकांचे आधारस्तंभ, अमोलकचंद महाविद्यालयाचे माजी प्राचार्य शंकरराव ठकाजी सांगळे यांचे मंगळवारी सकाळी हृदयविकाराने निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते. त्यांच्या इच्छेप्रमाणे येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला देहदान करण्यात आले. स्वातंत्र्य संग्राम सेनानी, लोकमतचे संस्थापक संपादक जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांचे ते अत्यंत जवळचे स्नेही होते.बुलडाणा जिल्ह्यातील दुसरबीड हे प्राचार्य सांगळे यांचे मूळगाव आहे. त्यांचा जन्म ११ सप्टेंबर १९४० ला झाला. यवतमाळच्या अमोलकचंद महाविद्यालयात प्राचार्य म्हणून त्यांचा कार्यकाळ संस्मरणीय ठरला.त्यांच्या निवासस्थानी लोकमत मीडिया प्रा. लि.चे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा यांच्या अध्यक्षतेत श्रद्धांजली सभा झाली. विजय दर्डा म्हणाले, प्राचार्य सांगळे सर म्हणजे उत्तम सहकारी, उत्कृष्ठ प्राध्यापक, संचालक असे व्यक्तिमत्त्व होते. त्यांचे आणि दर्डा परिवाराचे जुने ऋणानुबंध आहे. बाबूजींवर त्यांचे अगाध प्रेम होते. त्या काळात त्यांनी गावागावात फिरून लोकमतचा प्रचार प्रसार केला.लोकमतचे एडिटर इन चिफ, माजी शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा म्हणाले, सांगळे सरांच्या निधनाने दर्डा परिवारावरही आघात झाला आहे. येत्या २५ नोव्हेंबरला जेव्हा बाबूजींची पुण्यतिथी राहील तेव्हा सांगळे सरांची उणीव सर्वांनाच जाणवणार आहे. कारण १९९७ पासून असे एकही वर्ष नाही, की जेव्हा बाबूजींच्या पुण्यतिथी कार्यक्रमाचे नियोजन, संचालन सांगळे सरांनी केले नाही.रविवारी सामूहिक श्रद्धांजलीगोधनी रोडवरील अमोलकचंद महाविद्यालय येथे रविवार ११ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता सामूहिक श्रद्धांजली अर्पण केली जाणार आहे.

टॅग्स :Yavatmalयवतमाळ