शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

तीन हजार विद्यार्थिनींचे श्वास रोखून विद्यार्जन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2018 21:58 IST

शहराच्या हृदयस्थानी जाणाऱ्या मार्गावर असलेल्या शाळांमधील विद्यार्थिनींना श्वास रोखून विद्यार्जन करावे लागत आहे. शिवाय विद्युत कंपनीचे कर्मचारी, लहान व्यावसायिक आणि ये-जा करणाऱ्या नागरिकांचाही श्वास गुदमरत आहे.

ठळक मुद्देकचरा कोंडी : बसस्थानक ते कन्या शाळा मार्ग ठरतो आहे जीवघेणा

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शहराच्या हृदयस्थानी जाणाऱ्या मार्गावर असलेल्या शाळांमधील विद्यार्थिनींना श्वास रोखून विद्यार्जन करावे लागत आहे. शिवाय विद्युत कंपनीचे कर्मचारी, लहान व्यावसायिक आणि ये-जा करणाऱ्या नागरिकांचाही श्वास गुदमरत आहे. नगरपरिषदेच्या ढिसाळ कारभाराने हे हाल सहन करावे लागत आहे. पालिकेचा गोठा म्हणून ओळख असलेल्या रिकाम्या जागेत टाकला जाणारा कचरा जिवावर उठला आहे.येथील बसस्थानकाला लागूनच नगरपरिषदेची भली मोठी जागा आहे. काही वर्षांपूर्वी याठिकाणी नगरपरिषदेची नादुरुस्त वाहने यासह विविध साहित्य ठेवले जात होते. आता मात्र या जागेला कचरा डेपोचे स्वरुप आले आहे. शहराच्या विविध भागातून गोळा होणारा सर्वप्रकारचा कचरा याठिकाणी आणून टाकला जातो. ओल्या कचऱ्याची आणि आता पावसामुळे ओला झालेल्या कचऱ्यामुळे निर्माण होणारी दुर्गंधी यामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या.कचरा डेपोला लागूनच अभ्यंकर कन्या शाळा, रमाबाई आंबेडकर कन्या शाळा आहे. याठिकाणी जवळपास तीन हजार विद्यार्थिनी शिक्षण घेतात. काही लोकांनी अतिक्रमण करून विविध प्रकारचे व्यवसाय थाटले आहे. किरायाने देण्यासाठीची वाहनेही याठिकाणी उभी राहतात. कचऱ्याची दुर्गंधी सर्वत्र पसरते. रमाबाई आंबेडकर कन्या शाळेच्या अगदी भिंतीला लागूनच कचरा डेपो आहे. या शाळेत तसेच अभ्यंकर कन्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थिनींना श्वास रोखून विद्यार्जन करावे लागत आहे. विद्युत कंपनीच्या इमारतीतील कर्मचाऱ्यांचेही सतत नाकावर हात असतात. या परिसरातील नागरिकांनी ही कचरा कोंडी दूर करण्याची मागणी नगरपरिषदेच्या पदाधिकाऱ्यांसह अधिकाऱ्यांकडे मांडली. मात्र कुणीही गांभीर्याने घेतले नाही. शनिवारी याठिकाणचा कचरा जेसीबीने उचलला जात असताना याभागातून प्रत्येक जण नाक दाबून मार्ग काढत होता. पालिकेने ही समस्या निकाली काढावी, अशी मागणी या परिसरातील व्यावसायिक शेख जाकीर, अशोक सिंघानिया, दिलीप मानेकर, प्रमोद राय, जहूर भाई, रऊफ भाई, बलवंत राऊत, नंदू राऊत, रिजवान भाई आदींनी केली आहे.

टॅग्स :pollutionप्रदूषण