शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
2
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
3
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
4
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
5
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
6
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
7
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
8
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
9
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
10
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
11
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
12
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
13
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
14
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
15
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
16
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
17
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
18
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
19
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
20
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

दिग्रसच्या सूर्यकोटी मंडळातर्फे प्रबोधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2018 10:32 PM

येथील मोठा मारोती मंदिर परिसरातील सूर्य कोटी गणेश मंडळाने सामाजिक प्रबोधनाची परंपरा जोपासत यावर्षी भाविकांना तालुक्यातील पूरग्रस्तांना मदत करण्याची विनवणी केली आहे.

ठळक मुद्देपूरग्रस्तांना मदतीची विनवणी : विविध छायाचित्रातून उभा केला वास्तववादी पट

लोकमत न्यूज नेटवर्कदिग्रस : येथील मोठा मारोती मंदिर परिसरातील सूर्य कोटी गणेश मंडळाने सामाजिक प्रबोधनाची परंपरा जोपासत यावर्षी भाविकांना तालुक्यातील पूरग्रस्तांना मदत करण्याची विनवणी केली आहे.आॅगस्टमध्ये मुसळधार पावसाने शहराच्या मध्यवस्तीतून जाणाऱ्या धावंडा नदीला महापूर आला. नदी कोपल्याने शहरात पुराचे पाणी शिरले. यामुळे हजारो घरांचे नुकसान झाले, शेकडोंचे संसार उघड्यावर आले. पालिकेच्या हलगर्जीपणामुळे १३ वर्षांपूर्वी ९ जुलै २००५ रोजी नांदगव्हाण धरणाची सुरक्षा भिंत तुटल्याने धावंडा नदीला महापूर आला होता. त्यात १४ निष्पापांचे बळी गेले होते. घरातील चीजवस्तू, पैसा-अडका वाहून गेला होता. बायका-मुलांचे जीव वाचविण्यासाठी अनेक कुटुंब प्रमुखांनी जीवाचा आटापिटा केला होता. ज्यांना जमले नाही, त्यांच्या डोळ्यासमोर काळजाचे तुकडे वाहून गेले. त्यांच्या किंकाळ्या आजही कानात घुमत आहे. १३ वर्षे उलटूनही त्या आठवणींमधून दिग्रसकर बाहेर येऊ शकलेले नाही.१३ वर्षांपासून त्यांच्या घरकुलांचे बांधकाम सुरू आहे. मात्र ते अद्याप पूर्ण झालेले नाही. ते तेव्हाच पूर्ण झाले असते, तर आता धावंडेला झालेल्या नुकसानीपासून दिग्रसकरांची सुटका झाली असती. यातील भ्रष्टाचाराची चौकशी करून लवकरात लवकर घरकूल बांधून देत आमचे पुनर्वसन करावे, असा पूरग्रस्तांमधून व्यक्त होणारा सूर मंडळाने नागरिकांसमोरच मांडला.शब्द दर्शवतात पूरग्रस्तांच्या व्यथाधावंडा कोपल्याने हजारोंचा संसार उघड्यावर आला. ९ जुलैच्या त्या काळ रात्रीची आठवण आजही असह्य करून सोडते. आता मलमपट्टी नको, तर कायम उपाययोजना करा मानवतेची, हाक मदतीची-पूरग्रस्तांचे संसार सावरण्यास मदत करा, मदतीसाठी पुढे आलेला एक हात-लाख मोलाच्या सल्ल्यापेक्षा श्रेष्ठ, जो इतरांचे दु:ख समजून घेतो-तोच खरा सज्जन समजावा, आम्हा पूरग्रस्तांना-घर देता घर, आम्ही मेल्यानंतरच देणार का कायमचे घर, अशा शब्दांतून मंडळाने पूरग्रस्तांची व्यथा मांडली आहे. सूर्य कोटी गणेश मंडळाने पूरग्रस्तांचे हाल दिग्रसकरांसमोर मांडून एका महत्त्वाच्या समस्येला नव्याने वाचा फोडल्याबद्दल मंडळाचे कौतुक होत आहे.