शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

राजकीय कार्यकर्तेच ‘मुद्रा लोन’चे लाभार्थी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2020 02:11 IST

नेते-पदाधिकाऱ्यांची बँकांकडे शिफारस : कर्जाचा व्यवसायाऐवजी वैयक्तिक कामासाठी वापर

राजेश निस्ताने

यवतमाळ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाच वर्षांपूर्वी आणलेल्या मुद्रा लोन या योजनेचा बहुतांश लाभ राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनीच घेतला. नेत्यांनीही त्यासाठी बँकांकडे मौखिक शिफारसी केल्या. त्यामुळेच देशात सहा लाख ५० हजार कोटींचे मुद्रा लोन परतफेड न झाल्याने बुडीत खात्यात जाण्याचा धोका निर्माण झाला आहे.

गेल्या पाच वर्षांत १९ कोटी २४ लाख लाभार्थींना नऊ लाख ४५ हजार कोटी रुपयांचे मुद्रा लोन वितरित केले गेले. व्यवसायासाठी हे कर्ज घेतले गेले. प्रत्यक्षात ते घरखर्चात अर्थात वैयक्तिक कामासाठी वापरले गेले. कित्येकांना पीकअप व्हॅन घेण्यासाठी कर्ज देण्यात आले. बहुतांश जिल्ह्यात सत्ताधारी पक्षाच्या नेते, खासदार-आमदार व पदाधिकाऱ्यांच्या निकटवर्तीय कार्यकर्त्यांना कर्जाचे वाटप केले गेले.बँकांनी योजनेची माहिती दडविली राष्टÑीयीकृत बँकांनी मुळात मुद्रा लोन योजनेची माहितीच सामान्य जनतेपर्यंत पोहोचू दिली नाही. राजकीय व्यक्तिंनीच त्याचा लाभ उठविला. कित्येक नेत्यांनी तर आपल्या प्रतिष्ठानांमध्ये काम करणाºया व्यक्तींच्या नावाने या कर्जाची परस्पर उचल केल्याचीही माहिती आहे.बँकेचा एनपीए २० टक्क्यांवरव्यवसाय सुरू केला, पण चालला नाही, अशी कारणे सांगून या कर्जाची परतफेड थांबविली गेली आहे. मुद्रा लोनची परतफेड थांबल्याने प्रत्येक राष्टÑीयीकृत बँकेचा एनपीए २० टक्क्यांवर पोहोचला आहे. सरकार मात्र बँकांचा सरासरी एनपीए अवघा तीन टक्के असल्याचे सांगून वास्तव दडपण्याचा प्रयत्न करीत आहे.कोरोना व लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने २० लाख कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले. त्यासाठी केवळ २५ हजार कोटी रुपयांचा निधी सरकारने उभारला आहे. उर्वरित वाटा बँकांनी कर्जाच्या माध्यमातून उचलण्याच्या सूचना दिल्या गेल्या आहेत. २५ हजार कोटी रुपयांमध्येही मुद्रा लोनचा सहा लाख ५० हजार कोटींचा एनपीए कसा अ‍ॅडजेस्ट करायचा यावर चिंतन केले जात आहे....तर बेरोजगारी कायम कशी ?देशात १९ कोटी २४ लाख लोकांना व्यवसाय सुरू करण्यासाठी नऊ लाख ४५ हजार कोटी रुपयांचे मुद्रा लोन वितरित करून सरकार योजना यशस्वी झाल्याचे सांगत आहे. १९ कोटी लोकांना कर्ज वाटप केले तर मग देशात आजही बेरोजगारी कायम कशी, तेवढी रोजगारनिर्मिती का झाली नाही, असा मुद्दा यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे. २०२५ पर्यंत मुद्रा लोनचा एनपीए हा बँकिंग क्षेत्रातील सर्वात मोठी देयता (लायबिलिटी) ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे बँकांनी मुद्रा लोनचे वास्तव रिझर्व्ह बँकेमार्फत सरकारपर्यंत पोहोचवावे, असा सूर या क्षेत्रातून पुढे आला आहे.

टॅग्स :bankबँकMumbaiमुंबई